धनंजय मुंडेंच्या विरोधातील 'ते' वक्तव्य मनोज जरांगेंना भोवले; परळीत गुन्हा दाखल 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एकेरी भाषेचा उल्लेख करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. "मुंड्या फिंड्या, हरामखोर अवलादी" अशा प्रकारचे असंवैधानिक व  गैर असे शब्दप्रयोग संवैधानिक पदावरील व्यक्तीबाबत वापरले होते. त्यामुळे बदनामीकारक वक्तव्य व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाच्या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्याविरुद्ध असंज्ञेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         याबाबत माहिती अशी की, परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाषण करताना मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. याच भाषणात बोलताना "मुंडया-फिंड्या हरामखोर अवलादी" असे शब्दप्रयोग केले होते. यावरून मुंडे समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात होता. याच अनुषंगाने आज सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने मुंडे समर्थक जमा झाले. मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोरच या जमावाने ठिय्या धरला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची आक्रमक भूमिका या शेकडो नागरिकांनी घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने तक्रार अर्ज घेत त्याबाबतची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर अखेर तुकाराम बाबुराव आघाव यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे यांच्या विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 174 अंतर्गत असंज्ञेय अपराध(एनसीआर) अशा प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना