पोस्ट्स

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

अन् महिला महाविद्यालयात अचानक लागली आग...विद्यार्थिनींनी केली कमाल

इमेज
 कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मॉकड्रील प्रात्यक्षिक परळी, दि.30/08/2024 (प्रतिनिधी)    येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आपत्कालीन स्थितीत त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे आणि लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मॉकड्रील व्यवस्थापन कसे केले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सेफ इंटरप्राइजेस परळी वैजनाथचे संचालक शेख शरीफभाई यांनी दिले.आपत्कालीन व्यवस्थेमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी दिलेले हे सुंदर असे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पाहिले.यावेळी काही विद्यार्थिनींनी या मॉडलचे स्वतःही प्रात्यक्षिक केले. यावेळी श्री अनिल जठार यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मा. संजयजी देशमुख ,संचालिका तथा प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे , संचालिका सौ. छायाताई देशमुख , प्राध्यापक व विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती .

केवायसीसाठी लाडक्या बहिणींना अगोदरच मनस्ताप ;परळीच्या इंडिया बँकेत कर्मचारीच गायब

इमेज
  केवायसीसाठी लाडक्या बहिणींना अगोदरच मनस्ताप ;परळीच्या इंडिया बँकेत ईकेवायसी करणारा कर्मचारीच नाही परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपये रक्कम प्राप्त करून घेण्यासाठी बँकांच्या बाहेर केवायसी करायला रांगा लावलेल्या व  घंटोन् घंटे प्रतीक्षा केलेल्या लाडक्या बहिणींना अगोदरच मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यातच आता परळीच्या इंडिया बँकेतील केवायसी करणारा कर्मचारीच उपलब्ध नसल्याने या सर्व महिलांचे केवायसी चे काम ठप्प झाले आहे.      राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 हजारांची रक्कम मिळत आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आणि पैसे जमा झाले असले तरी बँकेतून ते पैसे हातात येऊ शकलेले नाही. पैसे मिळविण्यासाठी महिलांनी बँकेच्या बाहेर गर्दी केली आहे.  राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकले आहेत. मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे बँक खाते बंद झाले आहेत.  बँक ख

आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात

इमेज
  बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा खून ! आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात केज (बीड) :- केज तालुक्यातील शेतात एका महिलेचा चारित्र्याच्या संशया वरून खून झाला असून हा खून तिच्या नवऱ्यानेच केला आहे. खून करून तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. ३१ ऑगस्ट रोजी आंनदगाव (सारणी) ता. केज येथील शेतात आज दुपारी विलास नामदेव आघाव रा. नागझरी ता. धारूर या सालगड्याने त्याची पत्नीचे एका पुरूषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या चारित्र्याच्या संशया वरून डोक्यात काठी मारून जागीच खून केला.  खून केल्या नंतर आरोपी विलास आघाव हा पळून जात असताना पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे घटनास्थळी पोहोचले असुन कार्यवाही करीत आहेत. घटना स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देणार आहेत. मृतदेह अद्याप घटनास्थळीच आहे.

माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार

इमेज
  ऋषीकेश सोमनाथ गडेकर यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार परळी/प्रतिनिधी ऋषीकेश सोमनाथ गडेकर यांची जिल्हा परिषद बीड येथे भटक्या जमाती ब या प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा आज माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माणिकनगर येथील रहिवाशी ऋषीकेश गडेकर यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची नुकतीच परिक्षा दिली होती. यात भटक्या जमाती ब या प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट  रोजी माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार व पेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी नरसिंगराव गडेकर, काँगे्रस आयचे शहर उपाध्यक्ष वैजनाथराव गडेकर, ज्ञानेश्वर खर्डे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर खर्डे, सोमनाथ गडेकर, गजानन गडेकर, ओम खर्डे, गजेंद्र गडेकर, राजकुमार गडेकर, अतुल गडेकर, अ

आपघात: कारने दिली धडक ; दुचाकीवरील एकजण ठार

इमेज
  आपघात: कारने दिली धडक ; दुचाकीवरील एकजण ठार परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा....   परळी वैजनाथ तालुक्यातील इंजेगाव येथे घडलेल्या आपघातात एकजण ठार झाला आहे. परळी- सोनपेठ मार्गावर क्रिएटा व दुचाकीची समोरासमोर धडक होवुन झालेल्या अपघातात इंजेगाव येथील एकजण ठार झाल्याची घटना शुक्रवार दि.30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडली.          इंजेगाव येथील ज्ञानोबा पंडित कराड हे आपल्या शेतात काम करुन दुचाकीवरुन घरी येत असताना समोरुन येणाऱ्या क्रिएटा गाडीने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. गावकर्‍यांनी त्यांना रात्री 8.30 वाजता उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त कळताच नातलगांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

परळी वैजनाथ: संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर

इमेज
परळी वैजनाथ: संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जाहीर     परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यावरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नेमणुका जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या आहेत.          संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची संख्या 12 (शासकीय व अशासकीय अध्यक्ष व सदस्यासह) इतकी आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे शिफारस पत्रानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्यात राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरिता शासन निर्णयाच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना समीती गठीत करण्यात आली आहे. अध्यक्षपदी चंद्रकांत मधुकरराव कराड रा. तपोवन, ता. परळी वै., जि.बीड,प्रा. विनोद जगतकर रा. जगतकर गल्ली, परळी वै., जि. बीड, सौ. संगिता इंद्रजित होळंबे रा. हेळंब, ता. परळी वे., जि.बीड,सौ. वनिता भगवंत मुंडे रा. बहादुरवाडी, ता. परळी वै., जि. बीड, नितीन जिवराज ढाकणे रा. आस्वलांबा, ता. परळी वै., जि. बीड,श्रीमती साजन धोंडीराम लोहिया रा. परळी वै., जि. बीड व्यंकटेश बाबुराव शिंदे रा. परळी,तुकाराम मदन आचार्य रा. आचार्य ट

शांतता कमिटी बैठकीत आवाहन

इमेज
  उत्सव काळात शांतता अबाधीत ठेवणे सर्वांचीच जवाबदारी - अति. पो. चेतना तिडके प्रत्येकाने  आपापले कर्तव्य पार पडल्यास इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही - अनिल चोरमाले  परळी/ प्रतिनिधी उत्सव काळात शांतता अबाधीत ठेवणे ही सर्वच नागरिकांची जवाबदारी आहे असे प्रतिपादन अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक चेतना तिडके यांनी परळी येथे गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने येथील श्रद्धा मंगल कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.     या वेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमाले, शहर पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश शिंदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि समाधान कवडे, संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, महावितरणचे सहायक अभियंता पवन देऊळकर, कनिष्ठ अभियंता आकाश कांबळे, नप चे एम.एम. घुगे आदी उपस्थित होते.   प्रत्येकाने  आपापले कर्तव्य पार पाडल्यास इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही असे  प्रतिपादन  उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमाले यांनी केले. चोरमले यांनी याप्रसंगी  सडीतोड आणि स्पष्ट उत्तरे दिली. मुफ्ती

निश्चितच यशस्वी व्हाल, अभ्यासाचे कष्ट बनवतात श्रेष्ठ- दशरथ सिरसाठ

इमेज
  तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच यशस्वी व्हाल, अभ्यासाचे कष्ट बनवतात श्रेष्ठ- दशरथ सिरसाठ परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)      तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच यशस्वी व्हाल असे प्रतिपादन दशरथ सिरसाट यांनी केले. महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य व जीवनविद्या प्रबोधनीचे सदस्य दशरथ सिरसाठ (मुंबई ) बोलत होते      येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शुक्रवारी (दि.३०) विशेष विद्यार्थी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, जीवन विद्या मिशनचे दशरथ सिरसाठ, डॉ.किशोर संख्ये, रमाकांत निर्मळे, श्री शेवलकर, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना श्री सिरसाठ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मनात विचार पक्का केला की , अंतर्मन त्या दिशेने कार्य करते. तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्म

दारुच्या नशेत एकाने घेतला गळफास

इमेज
  दारुच्या नशेत एकाने घेतला गळफास परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      दारूच्या नशेत राहत्या घरीच एका युवकाने गळफास घेतल्याची घटना शहरातील गणेश पार भागात घडली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.              याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि. 30/08/2024 रोजी सायं 01.00 वा. गणेश पार रोड शेटे यांच्या वाड्यात राहणारा प्रविण देवानंद काळे वय 34 वर्ष याने दारुच्या नशेत गळफास घेवुन आत्महत्या केली. मयताचा भाऊ वैभव देवानंद काळे यांनी दिलेल्या खबरीवरुन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोना  नागरगोजे हे पुढील तपास करीत आहेत.

पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस गाडीत आढळला मृतदेह

इमेज
पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस गाडीत आढळला मृतदेह परळी /प्रतिनिधी-आज सकाळी परळी स्टेशनवर दाखल झालेल्या पनवेल- हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस  मध्ये एस -१ एक मृतदेह  आढळून आला. सदर मृतदेह बोगीच्या दारत होता.हे दार उघडत नसल्यामुळे गाडीचे टीटी यांनी दुसऱ्या बाजूने जाऊन पाहिले असता सदर बॉडी दारात आढळून आली.  पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस गाडी नंबर 17 613 सकाळी ५.३० च्या सुमारास परळी स्थानकांवर आली. कोच- एस -१ मध्ये मृतदेह असल्याची प्रथम खबर टीटीने गार्डला देऊन गार्डणे नंतर परळी स्टेशन मास्टर न संपर्क केला स्टेशन मास्तरांच्या लेखी सूचनेनंतर  परळी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी परळी स्थानकावर सदर बॉडी पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतली.  मृताचे वर्णन वय अंदाजे  40 ते 45 वर्ष. अंगात डार्क निळ्या रंगाची जीनची पॅन्ट फिक्‍या पिवळ्या आणि निळ्या रंगाचा आडव्या लाईनिंगचा टी-शर्ट, हातावर (दिल) बदामाचे चित्र गोंदलेले, उजव्या हाताचे मनगटाजवळ एक गोल जखमेची खून, उजव्या हातात काळा दोरा बांधलेला आढळून आला. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. सदर मृतदेह जवळ कुठलीही ओळखीचा पुरावा ओळखपत्र  त्याच्याजवळ
इमेज
  परळीत बनावट ग्रीस तयार करणार्या कारखान्यावर छापा आठ लाखाचे साहित्य जप्त,एकाविरुध्द गुन्हा   परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी भागातील एका घरात बनावट ग्रीस तयार करुन त्याची पॅकिंग सुरु असलेल्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत ग्रीस तयार करण्याचे साहित्य,पदार्थ व इतर असा 7 लाख 82 हजार 85 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकास ताब्यात घेतले.  परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी भागात बनावट ग्रीस तयार करणारा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उस्मान शेख,विष्णु सानप,परळी शहर पोलिस ठाण्याचे सपोनि शिंदे,गड्डेवार,गित्ते,यलमट्टे,भाताने आदींच्या पथकाने छापा टाकला असता रियाज रहिमत शेख हा इसम आढळुन आला.मुळचा धारुर येथील असलेल्या शेख याने परळी येथील आपल्या आत्याच्या घरी बनावट ग्रीस तयार करण्याचा कारखाना सुरु केला होता.पोलिसांच्या या छाप्यात ग्रीस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,डब्बे,कच्चे मटेरिअल,मिक्सर,इलेक्ट्रीक मशिन,पांढरी भुकटी व वाहतुक करण्यासाठी लागणारा छोटा टेम्पो असा एकुण 7 लाख 82 हजार 85 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी विष्णु सानप य

सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या परळी तालुका अध्यक्षपदी ए. तु.कराड तर सचिव- पदी दिनकर येवतेकर

इमेज
  सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या परळी तालुका अध्यक्षपदी ए. तु.कराड तर सचिव- पदी दिनकर येवतेकर   परळी वै.....  परळी पंचायत समिती सभागृहात ए. तु. कराड यांच्या अध्यक्षतेखाली व बीड जिल्ह्याचे अध्यक्ष -बाबुराव नागरगोजे, राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव धायजे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष जी आर घाटूळ, संघटनेचे राज्य संघटक  टी. एल. बादाडे यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक होऊन परळी तालुका अध्यक्षपदी -ए. तु. कराड, सचिव पदी -दिनकर येवतेकर, उपाध्यक्ष पदी अखिल सर, व दिलीप कुलकर्णी, सहसचिव -नावके कर सर, कोषध्यक्षपदी -प्रकाश मस्के  तर जिल्हा प्रतिनिधी -ढवळे पाटील यांची सर्वांणूमते निवड करण्यात आली.  प्रथमत :जिल्हा कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्षांनी कार्यकारणी करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर  सर्वांचे कार्यकारिणी तयार करण्यात आली. जिल्हाध्यक्षांनी त्या कार्यकारिणीचे वाचन केले. व सर्व संबंधिताचे सत्कार करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रश्नासाठी लढा देणे आवश्यक असल्याने, या कार्यकारणीची स्थापना करणे आवश्यक होते असे जिल्हा अध्यक्ष

कर्तव्यनिष्ठ केंद्रप्रमुख : कमलाकर कापसे सर

इमेज
  कर्तव्यनिष्ठ  केंद्रप्रमुख : कमलाकर कापसे सर सक्षम प्रशासक, कार्यक्षम संघटक, उत्तम व्यवस्थापक ,विद्यार्थी आणि समाजासाठी कार्य करणारे आदर्श अध्यापक,कर्तव्यनिष्ठ केंद्रप्रमुख  असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे कमलाकर कापसे सर  होय. श्री. कमलाकर  विश्वांभर कापसे यांचा जन्म ०५/०८/१९६६ साली  गौरगाव ता. कळंब जि. धाराशिव येथे झाला .त्यांनी  बीए. बीएड.पदवीचे शिक्षण घेऊन  इ. १ली ते १० वीच्या वर्गांसाठी अध्यापन कार्य केले. विविध शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक कार्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे . केंद्रप्रमुख म्हणून कार्य करताना शहरातील नामांकित संस्थाशी त्यांचा  संबंध आला. समानतेचे तत्त्व समोर ठेवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अखंड सेवा  केली. आपल्या कार्यकाळात ग्रामीण  भागात शालेय व प्रशासकीय यंत्रणा उभी केली. शालेय प्रशासनात सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी वर्गाचा सहभाग असेल तर एकतेची भावना बळकट होईल आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, अशी कमलाकर कापसे सरांची  धारणा आहे.  अध्यापक  तथा केंद्रप्रमुख म्हणून कमलाकर  कापसे  यांनी  अत्यंत निष्ठेने सेवा केली. केंद्रप

परळी वैजनाथ: रेल्वेरुळावर आढळला छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह

इमेज
  परळी वैजनाथ: रेल्वेरुळावर आढळला छि न्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह परळी वैजनाथ: प्रतिनिधी....            परळी शहरापासून काही अंतरावर असलेल्या परळी हैदराबाद रेल्वे मार्गावर मलकापूर शिवारात एका व्यक्तीचा छि न्न विच्छिन्न   अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.     परळी तालुक्यातील मलकापूर शिवारातील जुन्या रेल्वे गेटजवळ सकाळी १०. ३० वाजता एका व्यक्तीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. मयत हा छत्तीसगड येथील असल्याचा परळी ग्रामीण पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वेगाडीतून खाली पडल्याने हा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.            घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार गोविंद बडे यांनी भेट दिली. परळी नगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी लांडगे यांच्या मदतीने खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मयत व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम परळी ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान ही अपघाताची घटना असण्याची

परळी वैजनाथ गीतापरिवाराचे आवाहन.......

इमेज
  श्रीकृष्ण जन्माष्टमी: गीता परिवारच्या वतीने मराठवाडा स्तरीय ऑनलाईन स्पर्धा: मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गीता परिवार यांच्या वतीने मराठवाडास्तरीय 'श्रीकृष्णाची नटखट बाललीला यशोदेच्या सोबत' अशा संकल्पनेची ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गीता परिवार परळीच्या वतीने करण्यात आले आहे.         'श्रीकृष्णाची नटखट बाललीला यशोदेच्या सोबत' अशा संकल्पनेची ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे.तालुकास्तर, जिल्हास्तर या मधून निवड करुन जिल्ह्यामधून आलेले पहिले तीन क्रमांकाचे वीडियो मराठवाडास्तरीय स्पर्धेत पाठवले जातील.यामधून मराठवाडास्तरीय विजेत्यांची निवड होईल.गट १. पहीली ते चौथी व गट २. पाचवी ते सातवी असा राहील. या स्पर्धेत श्रीकृष्णाच्या बाललीलेचा वीडियो बनवुन पाठवायचा आहे. कृष्णाची बाललीला आई यशोदाच्या सोबत प्रस्तुत करायची आहे. वीडियो  दिड मिनिटांचा  बनवायचा आहे. वीडियो पाठवायची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेची प्रवेश फी 30रू असुन गुगल

परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रांसाठी रा.काँ.शरदचंद्र पवार पक्षाचे थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

इमेज
  परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रांसाठी रा.काँ. शरदचंद्र पवार पक्षाचे थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र हा नियोजित खोडसाळपणा ; प्रकल्प उभा राहू नये यासाठी वस्तुस्थिती सोडून कारणं :मंजूर नवीन थर्मल परळीतच उभारा-ॲड.जीवनराव देशमुख परळी वैजनाथ ,प्रतिनिधी....          केंद्र सरकारने मंजूर केलेल्या परळी वैजनाथ येथील संच क्रमांक नऊच्या उभारणीबाबत शासन-प्रशासन स्तरावर नियोजित खोडसाळपणा करून परळी येथे मंजूर असलेला हा प्रकल्प उभाच राहू नये यासाठी वस्तुस्थिती सोडून कोणतीही कारणे समोर आणली जात आहेत. प्रशासनाकडून वस्तुस्थिती सोडून कारणे दाखवून हा प्रकल्प उभाच राहू नये असा प्रयत्न होत आहे. मात्र मंजूर असलेला औष्णिक विद्युत केंद्राचा संच क्रमांक नऊ हा प्रकल्प परळीतच उभारला गेला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.     याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाची 47 वी बैठक दिनांक 16.09.2023 रोजी छञपती संभाजीनगर ये

सध्यस्थिती: परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प....

इमेज
प्रकल्प उभारणीला पूर्णविराम: परळीला मंजूर असलेले नविन औष्णिक विद्युत केंद्र संच उभारणी होणार नसल्याचेच स्पष्ट ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र म्हणून ओळख असलेल्या परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील अनेक संच यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. सध्या केवळ तीन संच सुरू आहेत. दरम्यान परळी औष्णिक विद्युत केंद्रात संच क्रमांक ९ या संचाला मंजुरी देण्यात आलेली होती. त्याची उभारणी होणे बाकी आहे. मात्र औष्णिक विद्युत केंद्रातआता हा मंजूर नवीन संच उभारला जाणार नसल्याचेच प्रशासनाच्या एका पत्रातून स्पष्ट झाले आहे.          ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी 13 नोव्हेंबर 2009 ला परळी वैजनाथ येथे 660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पास मंजूरी दिलेली होती. मात्र आता ते होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासंबंधी अधीक्षक अभियंता (संचलन) (प्र), महावितरण प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांना परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता यांन दि.27 ऑगस्ट रोजी पत्र पाठवून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जा.क्र.मु.अ. /संवसु/औविकें/परळी 04034 दिनांक 27 ऑगस्ट 2024

राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्काराने संपादक बालासाहेब फड सन्मानित

इमेज
  राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्काराने संपादक बालासाहेब फड सन्मानित परळी (प्रतिनिधी) अहमदनगर येथे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या वतीने जगत् विख्यात तत्वज्ञानी थोर समाजसुधारक प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात वितरण वार रविवार रोजी गंगा लान्स राष्ट्रसंत भगवानबाबा चौक निर्मल नगर अहमदनगर येथे शानदार सोहळ्यात संपन्न झाला.   समारंभ प्रसंगी सकाळी 100 ढोल ताशांच्या गजरात पाहुणे  भगवान बाबा चौक येथुन ग्रंथ दिंडीत स्वागत करून पाहुणे यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.        या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर विधान सभा मतदार संघाचे आमदार संग्राम भैया जगताप, शिवाजीराव कर्डिले चेअरमन जिल्हा मध्यवर्ती बँक अहमदनगर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पिठाचे राज्यपाल नियुक्त आधि सभा सदस्य डॉ. गजानन घुगे, संमेलनाध्यक्ष अध्यक्ष कवयित्री संगीता घुगे ,साहित्यिक तथा आयोजक गणेश खाडे, प्रा वा .ना. आंधळे, विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव,  राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य प्राचार्य नवनाथ आघाव, डॉ. नियुक्त आधीसभ

पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, जोमाने कामाला लागा

इमेज
  आ. पंकजा मुंडे यांचा  निलंगा, तुळजापूर, अक्कलकोट मतदारसंघांत कार्यकर्ता संवाद दौरा ; विधानसभा मतदारसंघाचाही घेतला आढावा वलांडीत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेत सहभाग पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, जोमाने कामाला लागा लातूर /धारशीव ।दिनांक २७। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर   भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज निलंगा, तुळजापूर आणि अक्कलकोट मतदारसंघांत कार्यकर्ता संवाद दौरा करून मतदारसंघांचा आढावा घेतला. वलांडी येथे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला. येणाऱ्या निवडणुकीत जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.    आ. पंकजाताई मुंडे यांनी सकाळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुरु केलेल्या जनसन्मान पदयात्रेत वलांडी ता. देवणी येथे सहभागी होऊन उपस्थित असंख्य जनसमुदायाशी संवाद साधला.   यावेळी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यात जमा केलेली सर्व सामान्य माणसाच्या प्रेमाची शिदोरी जपायची असेल तर मन मोठं ठेवावं लागेल. मुंडे साहेब गेल्यावर मी कधीच रडणा

सविस्तर वाचा: ● कोण आहेत स्वामी शिवानंद?

इमेज
  पद्मश्री पुरस्कार प्राप्त १२८ वर्षीय स्वामी शिवानंद यांनी परळीत घेतलं प्रभु वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           वयाच्या १२८ व्या वर्षीही नित्यनेमाने योगासने करणारे प्रसिद्ध योगाचार्य व देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले स्वामी शिवानंद यांनी आज परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभुवैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.  योग्य आहार  विहार व योगाच्या माध्यमातून निरामय आयुष्य कसे जगावे यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी शिवानंद हे आहेत.             देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही ज्यांचे फॅन आहेत असे प्रसिद्ध योगाचार्य स्वामी शिवानंद हे आज परळी येथे आले होते. सध्या श्रावण पर्वकाळ सुरू असून या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग व आरोग्याची देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी ते परळीत आले होते. यावेळी त्यांनी वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे देवस्थानच्या वतीने वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वा

परळीतील गित्ते दाम्पत्यांनी साजरा केला गोमातेचा डोहाळजेवण कार्यक्रम

इमेज
  परळीतील गित्ते दाम्पत्यांनी साजरा केला गोमातेचा डोहाळजेवण कार्यक्रम  नातेवाईक, मित्रमंडळी सह गल्लीतील ४०० लोकांना दिले जेवण परळी वै. ता.२६ प्रतिनिधी  आपण नेहमीच कुणीतरी आपल्या लेकीचे, सुनाचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करुन त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला असे आपण ऐकतो. मात्र परळी शहरात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने चक्क आपल्या गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम रविवारी (ता.२५) मोठ्या उत्साहात साजरा करून जवळपास ३०० ते ४०० आप्तस्वकीय, नातेवाईक, परिसरातील नागरिकांना डोहाळे कार्यक्रमानिमित्त जेवण दिले. ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील जलालपुर जवळील आयोध्या नगर  भागात दत्ता रामकिशन गित्ते नावाचे अल्पभूधारक युवक शेतकरी राहतात. रामकिशन गीत्ते यांचे शहरालगतच ब्रम्हवाडी शिवारात जवळपास अडीच एकर शेत आहे. गीत्ते यांना लाल कंधार जातीची एक गाय आहे ही गाय प्रथम गर्भवती झाली असून तिला नऊ महिन्याचा गर्भ आहे. ह्या प्रकाराने शेतकरी दत्ता रामकिशन गीत्ते अत्यंत खुष झाले आणि चक्क त्यांनी रविवारी (ता.२५) आपल्या गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

परळीचा ईमानदार रिक्षावाला: दर्शनाला आलेल्या भाविकाचे २५ हजाराचा मोबाईल व किंमती सामान केले परत

इमेज
  परळीचा ईमानदार रिक्षावाला: दर्शनाला आलेल्या भाविकाचे २५ हजाराचा मोबाईल व किंमती सामान केले परत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे सध्या श्रावण महिन्याचा पर्वकाळ सुरू असुन या निमित्ताने राज्य व परराज्यातून असंख्य भाविक परळी दाखल होत असतात. अतिशय गर्दी व मंदिर परिसरात असलेल्या घाईगडबडीत अनेकांचे किंमती सामान, दागिने, पाकीट वगैरे गहाळ होते. मात्र परळी येथील स्थानिक नागरिक याबाबत नेहमीच सकारात्मक व इईमानदार असल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी बघायला मिळाली आहेत. अशाच प्रकारचे एक उदाहरण परळीच्या एका ईमानदार रिक्षावाल्यानेही आज दाखवून दिले आहे.            तेलंगाना राज्यातील बिदर येथील भाविक सहकुटुंब प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेण्यासाठी परळी वैजनाथ येथे आले होते. त्यांचे किमती सामान व मोबाईल किंमत 25000 असे रोडवर पडले. ते भाविक तसेच निघून गेले प्रभू वैजनाथ दर्शनानंतर या भाविकांच्या ही बाब लक्षात आली. मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या परळीतील रिक्षा चालक अमोल गित्ते रा. परळी वैजनाथ यांना रस्त्यावर मोबाईल वही किमती सामान दिसले य

चौथा श्रावण सोमवार:आ. पंकजाताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथ, सोमेश्वराचे दर्शन

इमेज
  चौथा श्रावण सोमवार:आ. पंकजा मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथ, सोमेश्वराचे दर्शन परळी वैजनाथ।दिनांक२६। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथ तसेच जिरेवाडी येथील श्री सोमेश्वराचे दर्शन घेतले. दोन्ही मंदिरात आज दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.    आ. पंकजाताई मुंडे तसेच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी आज सकाळी चौथ्या श्रावण सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन अभिषेक केला व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. आ. पंकजाताईंना पाहताच दर्शनासाठी आलेल्या अनेक महिला व पुरूष  भाविकांची त्यांचेसोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती. सर्वांना भेटून त्यांनी प्रत्येकांची सेल्फीची इच्छा पूर्ण केली.  श्री सोमेश्वराचेही घेतले दर्शन  ------- आ. पंकजाताई मुंडे व प्रज्ञाताई मुंडे यांनी जिरेवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री सोमेश्वराचेही मनोभावे दर्शन घेतले. याठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनातही त्यांनी हजेरी लावली. दोन्ही ठिकाणी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच

दुःखद वार्ता: सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन

इमेज
  सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        येथील पुरातन श्रीगोराराम मंदिरचा पुजारी परिवार असलेल्या रामदासी परिवारातील नंदकुमार रामदासी यांच्या पत्नी सौ. उज्वला रामदासी यांचे आज दि. 26 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी त्या 65 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.        सौ. उज्वला रामदासी या अतिशय संयमी, मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या होत्या. स्नेही जनांमध्ये त्या प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाने रामदासी परिवारातील एक प्रेमळ व्यक्तिमत्व हरवले आहे.सौ. उज्वला रामदासीपार्थिवावर उद्या दि 27 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मोक्षधाम स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोराराम मंदिर, गणेशपार येथील निवासस्थानापासूअंत्ययात्रा निघणार आहे.  त्यांच्या निधनाने रामदासी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

चाळीस विजेत्यांना देववाणी पारितोषिके वितरण

इमेज
संस्कृत दिन समारंभात प्राचीन ज्ञानवैभवाचा गौरव चाळीस विजेत्यांना देववाणी पारितोषिके वितरण       परळी वैजनाथ दि.२५-                     त्रिविध दुःखांनी त्रस्त झालेल्या जगातील मानव समूहाला शाश्वत सुखाची अमृतवल्ली प्रदान करणारी संस्कृत भाषा ही ज्ञानाचा अथांग सागर आहे, अशा शब्दात विद्वान पंडितांनी येथील संस्कृत दिन समारंभात या संस्कृतच्या प्राचीन भाषेचा गौरव केला.          येथील आर्य समाजात नुकताच सामूहिक संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी किल्लेधारूर येथील संस्कृतप्रेमी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोदकुमार तिवारी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृतचे अभ्यासक पंडित ज्ञानप्रकाश शास्त्री, आचार्य सत्येंद्र विद्योपासक,पंडित भूपेंद्रसिंह आर्य, पंडित लेखराज आर्य, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विकासराव डुबे हे उपस्थित होते.  यावेळी  मान्यवरांनी संस्कृत  भाषा ही भारतीय ज्ञानवाङ्मयाचा आत्मा असून ती सर्व भाषांची जननी आहे. या भाषेच्या वैदिक साहित्यात भौतिक व आध्यात्मिक उन्नतीची तत्वे दडली आहेत. तिचा नव्याने शोध घेऊन प्रसार केल्यास संपूर्ण जगाला सुख समृद्धी लाभू शकते, असे गौरवोद्गार का