शांतता कमिटी बैठकीत आवाहन

 उत्सव काळात शांतता अबाधीत ठेवणे सर्वांचीच जवाबदारी - अति. पो. चेतना तिडके


प्रत्येकाने  आपापले कर्तव्य पार पडल्यास इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही - अनिल चोरमाले 


परळी/ प्रतिनिधी


उत्सव काळात शांतता अबाधीत ठेवणे ही सर्वच नागरिकांची जवाबदारी आहे असे प्रतिपादन अंबाजोगाईच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक चेतना तिडके यांनी परळी येथे गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलादच्या अनुषंगाने येथील श्रद्धा मंगल कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.   

 या वेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमाले, शहर पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश शिंदे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि समाधान कवडे, संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, महावितरणचे सहायक अभियंता पवन देऊळकर, कनिष्ठ अभियंता आकाश कांबळे, नप चे एम.एम. घुगे आदी उपस्थित होते. 

 प्रत्येकाने  आपापले कर्तव्य पार पाडल्यास इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही असे  प्रतिपादन  उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमाले यांनी केले. चोरमले यांनी याप्रसंगी  सडीतोड आणि स्पष्ट उत्तरे दिली. मुफ्ती अशफाक यांनी ईद मिलादची मिरवणूक समाजाला विश्वासात घेऊन एक दिवस नंतर घेण्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याबद्दल उपस्थित सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिला.  गणेश उत्सवाच्या दरम्यान अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश चेतना तिडके मॅडम यांनी संबंधितांना  दिले. शांतता बैठकीत ध्वनी प्रदूषण नियंत्रण संदर्भात सखोल चर्चा झाली. या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी केले .या बैठकीस मोठ्या संख्येने परळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध गणेश उत्सव समितीचे पदाधिकारी, पत्रकार, शांतता समितीचे सदस्य ,पोलीस विष्णू फड, पोलीस रुपेश शिंदे, पोलीस विष्णू घुगे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार