परळी वैजनाथ: रेल्वेरुळावर आढळला छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह
परळी वैजनाथ: रेल्वेरुळावर आढळला छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह
परळी वैजनाथ: प्रतिनिधी....परळी शहरापासून काही अंतरावर असलेल्या परळी हैदराबाद रेल्वे मार्गावर मलकापूर शिवारात एका व्यक्तीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील मलकापूर शिवारातील जुन्या रेल्वे गेटजवळ सकाळी १०. ३० वाजता एका व्यक्तीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. मयत हा छत्तीसगड येथील असल्याचा परळी ग्रामीण पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वेगाडीतून खाली पडल्याने हा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार गोविंद बडे यांनी भेट दिली. परळी नगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी लांडगे यांच्या मदतीने खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मयत व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम परळी ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान ही अपघाताची घटना असण्याची शक्यता आहे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा