परळी वैजनाथ गीतापरिवाराचे आवाहन.......

 श्रीकृष्ण जन्माष्टमी: गीता परिवारच्या वतीने मराठवाडा स्तरीय ऑनलाईन स्पर्धा: मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गीता परिवार यांच्या वतीने मराठवाडास्तरीय 'श्रीकृष्णाची नटखट बाललीला यशोदेच्या सोबत' अशा संकल्पनेची ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गीता परिवार परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

        'श्रीकृष्णाची नटखट बाललीला यशोदेच्या सोबत' अशा संकल्पनेची ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे.तालुकास्तर,जिल्हास्तर यामधून निवड करुन जिल्ह्यामधून आलेले पहिले तीन क्रमांकाचे वीडियो मराठवाडास्तरीय स्पर्धेत पाठवले जातील.यामधून मराठवाडास्तरीय विजेत्यांची निवड होईल.गट १.पहीली ते चौथी व गट २.पाचवी ते सातवी असा राहील.या स्पर्धेत श्रीकृष्णाच्या बाललीलेचा वीडियो बनवुन पाठवायचा आहे. कृष्णाची बाललीला आई यशोदाच्या सोबत प्रस्तुत करायची आहे.वीडियो  दिड मिनिटांचा  बनवायचा आहे.वीडियो पाठवायची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेची प्रवेश फी 30रू असुन गुगलपे क्रमांक ९४२२३२९०४५ यावर फीस पाठवावी लागेल.
       मराठवाडा स्तरावर स्पर्धेतील विजेत्यांना गीता परिवार च्या वतीने प.पु.गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते सेलू येथे आयोजित करण्यात आलेल्याकार्यक्रमात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.अधिक माहिती साठी संपर्क -सौ राजकन्या मंत्री  : 9422329045 सौ. डाॅ  मीनल लोहिया : 9422241953 यांच्याशी संपर्क साधावा.या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन गीता परिवार मराठवाड़ा विभाग अध्यक्ष: लक्ष्मीकांत करवा,सचिव: सौ. संगीता तिवारी,गीता परिवार परळी-वैद्यनाथ अध्यक्षा:सौ.श्वेता काबरा सचिव: सौ. राजकन्या मंत्री यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार