23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

चाळीस विजेत्यांना देववाणी पारितोषिके वितरण

संस्कृत दिन समारंभात प्राचीन ज्ञानवैभवाचा गौरव


चाळीस विजेत्यांना देववाणी पारितोषिके वितरण



      परळी वैजनाथ दि.२५-

                    त्रिविध दुःखांनी त्रस्त झालेल्या जगातील मानव समूहाला शाश्वत सुखाची अमृतवल्ली प्रदान करणारी संस्कृत भाषा ही ज्ञानाचा अथांग सागर आहे, अशा शब्दात विद्वान पंडितांनी येथील संस्कृत दिन समारंभात या संस्कृतच्या प्राचीन भाषेचा गौरव केला.

         येथील आर्य समाजात नुकताच सामूहिक संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी किल्लेधारूर येथील संस्कृतप्रेमी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोदकुमार तिवारी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृतचे अभ्यासक पंडित ज्ञानप्रकाश शास्त्री, आचार्य सत्येंद्र विद्योपासक,पंडित भूपेंद्रसिंह आर्य, पंडित लेखराज आर्य, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विकासराव डुबे हे उपस्थित होते.  यावेळी  मान्यवरांनी संस्कृत  भाषा ही भारतीय ज्ञानवाङ्मयाचा आत्मा असून ती सर्व भाषांची जननी आहे. या भाषेच्या वैदिक साहित्यात भौतिक व आध्यात्मिक उन्नतीची तत्वे दडली आहेत. तिचा नव्याने शोध घेऊन प्रसार केल्यास संपूर्ण जगाला सुख समृद्धी लाभू शकते, असे गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन किशोर पवार व प्रा. वीरेंद्र शास्त्री यांनी केले, तर आभार लक्ष्मण आर्य  यांनी मानले.

   

   ----संस्कृतस्पर्धेतील ४० विजेत्यांना देववाणी पारितोषिके  ---

                       संस्कृत दिनानिमित्त संस्कृत भाषा समितीच्या वतीने श्लोकगायन व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .या सर्व स्पर्धा वयोगटांनुसार पाच विभागात संपन्न झाल्या. श्लोकगायन स्पर्धेत  (बालगटातून) श्राव्या बेलुरे, सान्वी सुरवसे, गणेश मुंडे ,(प्राथमिक गटातून) आर्या मुंडे ,भक्ती कराड, खुशी आचार्य, (माध्यमिक गटातून) मृणाल चिक्षे, सिद्धी पोरे, आदिल कुरेशी ,अक्षरा तामटे, (महाविद्यालयीन गटातून) काशिनाथ मरगीळ, अल्फिया शेख, रूपाली साखरे, सायली चाटोरीकर , (गुरुकुल गटातून) अनुदीप आर्य, गजानन शिंदे ,पवन भारती, अनुवेद आर्य, अज्ञेय कुरुडे यांना अनुक्रमे प्रथम ,द्वितीय ,तृतीय अशी विविध पारितोषिके तर भाषण स्पर्धेतून विविध गटांतून गणेश मुंडे, अनन्या पाठक ,सोनाक्षी क्षीरसागर, संध्या कराड, रूपाली साखरे, काशिनाथ मरगीळ ,सायली चाटोरीकर, राचय्या स्वामी, रुपेश कावळे, संविधान गायकवाड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. ही पारितोषिके आर्य समाजाचे उपसचिव श्री जयपाल लाहोटी यांनी आपले दिवंगत वडील स्व. श्री नंदलालजी लाहोटी यांच्या स्मरणार्थ प्रदान केली, तर रोख रकमेच्या स्वरूपातील दहा हजार रुपयांची पारितोषिके सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोदकुमार तिवारी (किल्ले धारूर ) यांनी आपल्या दिवंगत मातु:श्री श्रीमती प्रकाशवतीबाई शरदकुमार तिवारी यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आली होती.

   या स्पर्धांना परीक्षक म्हणून सर्वश्री दयानंद शास्त्री, दिगंबर देवकते, आचार्य सत्येंद्र विद्योपासक, प्रशांतकुमार शास्त्री, अतुल नरवाडकर, किशोर पवार, मनीषा आचार्य आदींनी कार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?