प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 परळीत बनावट ग्रीस तयार करणार्या कारखान्यावर छापा



आठ लाखाचे साहित्य जप्त,एकाविरुध्द गुन्हा 

परळी (प्रतिनिधी)

 परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी भागातील एका घरात बनावट ग्रीस तयार करुन त्याची पॅकिंग सुरु असलेल्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत ग्रीस तयार करण्याचे साहित्य,पदार्थ व इतर असा 7 लाख 82 हजार 85 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकास ताब्यात घेतले.

 परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी भागात बनावट ग्रीस तयार करणारा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उस्मान शेख,विष्णु सानप,परळी शहर पोलिस ठाण्याचे सपोनि शिंदे,गड्डेवार,गित्ते,यलमट्टे,भाताने आदींच्या पथकाने छापा टाकला असता रियाज रहिमत शेख हा इसम आढळुन आला.मुळचा धारुर येथील असलेल्या शेख याने परळी येथील आपल्या आत्याच्या घरी बनावट ग्रीस तयार करण्याचा कारखाना सुरु केला होता.पोलिसांच्या या छाप्यात ग्रीस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,डब्बे,कच्चे मटेरिअल,मिक्सर,इलेक्ट्रीक मशिन,पांढरी भुकटी व वाहतुक करण्यासाठी लागणारा छोटा टेम्पो असा एकुण 7 लाख 82 हजार 85 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी विष्णु सानप यांच्या फिर्यादीवरुन रियाज रहिम शेख याच्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या