आपघात: कारने दिली धडक ; दुचाकीवरील एकजण ठार
आपघात: कारने दिली धडक ; दुचाकीवरील एकजण ठार
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा....
परळी वैजनाथ तालुक्यातील इंजेगाव येथे घडलेल्या आपघातात एकजण ठार झाला आहे. परळी- सोनपेठ मार्गावर क्रिएटा व दुचाकीची समोरासमोर धडक होवुन झालेल्या अपघातात इंजेगाव येथील एकजण ठार झाल्याची घटना शुक्रवार दि.30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडली.
इंजेगाव येथील ज्ञानोबा पंडित कराड हे आपल्या शेतात काम करुन दुचाकीवरुन घरी येत असताना समोरुन येणाऱ्या क्रिएटा गाडीने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. गावकर्यांनी त्यांना रात्री 8.30 वाजता उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताचे वृत्त कळताच नातलगांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा