सध्यस्थिती: परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प....

प्रकल्प उभारणीला पूर्णविराम: परळीला मंजूर असलेले नविन औष्णिक विद्युत केंद्र संच उभारणी होणार नसल्याचेच स्पष्ट !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र म्हणून ओळख असलेल्या परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील अनेक संच यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. सध्या केवळ तीन संच सुरू आहेत. दरम्यान परळी औष्णिक विद्युत केंद्रात संच क्रमांक ९ या संचाला मंजुरी देण्यात आलेली होती. त्याची उभारणी होणे बाकी आहे. मात्र औष्णिक विद्युत केंद्रातआता हा मंजूर नवीन संच उभारला जाणार नसल्याचेच प्रशासनाच्या एका पत्रातून स्पष्ट झाले आहे.

         ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी 13 नोव्हेंबर 2009 ला परळी वैजनाथ येथे 660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पास मंजूरी दिलेली होती. मात्र आता ते होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासंबंधी अधीक्षक अभियंता (संचलन) (प्र), महावितरण प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांना परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता यांन दि.27 ऑगस्ट रोजी पत्र पाठवून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जा.क्र.मु.अ. /संवसु/औविकें/परळी 04034 दिनांक 27 ऑगस्ट 2024  नुसार दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्या दिनांक 13.11. 2009 च्या कार्यालयीन निवेदनानुसार पुढील क्षमता वाढ सुपर क्रिटिकल संचाद्वारे असावी असे आदेशित आहे. सद्यस्थितीत 660 मेगावॅट व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या संचासाठी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञान उपलब्ध आहे व 660 मेगावॅट क्षमतेच्या संचासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे पाणी, कोळसा इत्यादींची सद्यस्थितीत उपलब्धता नाही तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्र कोळसा स्त्रोतापासून दूर असल्याने कोळसा वहनासाठी होणारा जास्तीचा व्यय विचारात घेता संचातून निर्माण होणारा विजेचा संभावित अस्थिर आकार जास्त असेल एम ओ डी प्रणालीनुसार जास्त अस्थिर आकार असलेल्या संचातून नियमितपणे वीज निर्मिती होण्याबद्दल साशंकता असते. वरील सर्व कारणामुळे सद्यस्थितीत औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे नवीन संच उभारणे महानिर्मितीच्या विचाराधीन नाही. असा स्पष्ट अभिप्राय कळवण्यात आला आहे. त्यामुळे  परळीतील नियोजित संच क्रमांक  9 हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र  होणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

● सध्यस्थिती: परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प....

        परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक १,२,३,४,५ ते सर्व संच आयुर्मान संपल्यामुळे बंद ठेवून लिलावात काढण्यात आले आहेत. तर संच क्रमांक ६,७,८  हे तीन नवीन संच नवीन परळीऔष्णिक विद्युत केंद्रात चालू आहेत. या तीन संचाची एकूण स्थापित क्षमता  ७५०  मेगावॅटएवढी असून हे तिन्ही संच सध्या क्षमतेच्या जवळपास वीज निर्मिती करीत आहेत.या विद्युत केंद्रातील संच क्रमांक ९ ही मंजूर आहे परंतु त्याची उभारणी अद्याप करण्यात आलेली नाही. हा संच क्रमांक ९ आता होणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

● परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्राचा इतिहास.....

          २९ मे १९६६ रोजी भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते परळी औष्णिक विद्युत केंद्राचा कोनशीला समारंभ झाला. परळी औष्णिक विद्युत केंद्रात १५ नोव्हेंबर १९७१ मध्ये ३० मेगावॅट क्षमतेचा पहिला संच कार्यान्वित करण्यात आला होता. तर १७ मे १९७२ रोजी दुसरा संच ३० मेगावॅटचा कार्यान्वित झाला होता . १० ऑक्टोबर १९८० मध्ये पहिला २१० मेगावॅटचा  संच (संच क्रमांक ३) सुरू करण्यात आला होता.२६ मार्च १९८५  मध्ये २१० मेगावॅटचा संच (संच क्रमांक ४) कार्यान्वित झाला होता तर संच क्रमांक ५ हा ३१ डिसेंबर १९८५  मध्ये कार्यान्वित झाला होता. हे पाच ही संच चालू होते. तेव्हा भारत सरकारचा वीजनिर्मिती बद्दल महत्तम उत्पादकता पुरस्कार तसेच इंधन तेल बचतीचा पुरस्कार १९९८ पर्यंत प्राप्त झाले आहे विविध पुरस्कारांनी परळीचे औष्णिक विद्युत केंद्र गौरविण्यात आलेले आहे. तसेच सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राख बंधाऱ्यावर वनराई उभी केल्याबद्दल वनश्री  प्रथम पुरस्कार १९९५ मध्ये प्राप्त झाला होता. आज हे पाच संच बंद असून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हे संच लिलावात काढले आहे. तसेच राख बंधारा ही नष्ट झाला आहे.

● परळीची अर्थवाहिनी अशी औष्णिक वीज केंद्राची ओळख पुसट...!

          औष्णिक वीज केंद्र हे परळीची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. या विद्युत केंद्रातील संच क्रमांक ९ ही मंजूर आहे परंतु त्याची उभारणी अद्याप करण्यात आलेली नाही.सध्या संच क्रमांक ६,७, व ८ हे तीन संच चालू आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा रेल्वे ट्रॅकने वणी येथून येतो. खडका येथील धरणातून पाणीपुरवठा होतो. तीन संचातून वीज निर्मिती चालू आहे. हे तिन्ही संच अत्याधुनिक असून मनुष्यबळ कमी लागणारे संच आहेत. जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात पाच संच चालू असताना मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी, कामगार वर्ग कार्यरत होता. त्यामुळे परळी बाजारपेठेत भरभराट निर्माण झाली होती. जुने संच बंद झाल्याचा परळीच्या बाजारपेठेवर मोठ्या परिणाम जाणू लागला आहे.एक प्रकारे हे संच बंद झाल्याने परळीची अर्थवाहिनी अशी औष्णिक वीज केंद्राची ओळखही हळुहळु पुसट होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार