23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

सविस्तर वाचा: ● कोण आहेत स्वामी शिवानंद?

 पद्मश्री पुरस्कार प्राप्त १२८ वर्षीय स्वामी शिवानंद यांनी परळीत घेतलं प्रभु वैद्यनाथाचे दर्शन





परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

          वयाच्या १२८ व्या वर्षीही नित्यनेमाने योगासने करणारे प्रसिद्ध योगाचार्य व देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले स्वामी शिवानंद यांनी आज परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभुवैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.  योग्य आहार  विहार व योगाच्या माध्यमातून निरामय आयुष्य कसे जगावे यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी शिवानंद हे आहेत.



            देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही ज्यांचे फॅन आहेत असे प्रसिद्ध योगाचार्य स्वामी शिवानंद हे आज परळी येथे आले होते. सध्या श्रावण पर्वकाळ सुरू असून या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग व आरोग्याची देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी ते परळीत आले होते. यावेळी त्यांनी वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे देवस्थानच्या वतीने वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वागत केले. यावेळी माजी आ. डाॅ.मधुसूदन केंद्रे, श्री.भताने ,परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, माजी नगरसेवक राजेंद्र सोनी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

● कोण आहेत स्वामी शिवानंद?

      वारणासीच्या स्वामी शिवानंद यांना योगगुरु म्हणून ओळखले जाते. स्वामी शिवानंद त्यांच्या दीर्घायुष्याचं श्रेय योगासनांना देतात. त्यांच्या दिनचर्चेत योगाचं खास स्थान आहे. योग, प्राणायाम आणि घरगुती उपचार हा निरोगी राहण्याचा मूलमंत्र आहे, असं ते सांगतात. ते रोज पहाटे 3 वाजता उठतात आणि योगासनं करतात. मुळचे बंगलाचे असलेले स्वामी शिवानंद बनारसमध्ये आले. त्यांनी गुरु ओंकारनंद यांच्याकडून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी योगासनामध्ये प्रावीण्य मिळवलं. योगासनाचं शिक्षण झाल्यानंतर गुरुंच्या आदेशानुसार 34 वर्ष जगभरातील अनेक देशांचा दौरा केला. स्वामी शिवानंद यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, रशियासह अनेक युरोपीयन देशांचा दौरा केला आहे. ते अगदी साधं आयुष्य जगतात. त्यांची धर्मावर मोठी श्रद्धा आहे. त्यांचं वय १२८ वर्षे  आहे,  आधार कार्डनुसार त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी फाळणीपूर्वीच्या पूर्व बंगालमध्ये झाला. 

पद्मश्रीनं सन्मान.....

     योगासनातील उत्कृष्ठ कार्यासाठी स्वामी शिवानंद यांना २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. ज्या वयात लोकांना चालणही शक्य नाही त्या वयात स्वामी शिवानंद नियमित योगासनं करतात. 

पंतप्रधान मोदीही फॅन.......

     स्वामी शिवानंद यांना २०२२ मध्ये पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्यापुढं नतमस्तक झाले होते. स्वामी शिवानंद हा सन्मान घेण्यासाठी उभे राहिले त्यावेळी संपूर्ण दरबार हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान मोदी देखील त्यावेळा उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधानांनी खाली वाकून त्यांना अभिवादन केलं. स्वामी शिवानंद यांनी अनवाणी राष्ट्रपतींकडून पद्ध पुरस्कार स्विकारला. त्यानंतर त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा झाली.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?