इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

अन् महिला महाविद्यालयात अचानक लागली आग...विद्यार्थिनींनी केली कमाल

 कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात मॉकड्रील प्रात्यक्षिक


परळी, दि.30/08/2024 (प्रतिनिधी)

   येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आपत्कालीन स्थितीत त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे आणि लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मॉकड्रील व्यवस्थापन कसे केले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सेफ इंटरप्राइजेस परळी वैजनाथचे संचालक शेख शरीफभाई यांनी दिले.आपत्कालीन व्यवस्थेमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी दिलेले हे सुंदर असे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पाहिले.यावेळी काही विद्यार्थिनींनी या मॉडलचे स्वतःही प्रात्यक्षिक केले. यावेळी श्री अनिल जठार यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष मा. संजयजी देशमुख ,संचालिका तथा प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे , संचालिका सौ. छायाताई देशमुख , प्राध्यापक व विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या