निश्चितच यशस्वी व्हाल, अभ्यासाचे कष्ट बनवतात श्रेष्ठ- दशरथ सिरसाठ
तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच यशस्वी व्हाल, अभ्यासाचे कष्ट बनवतात श्रेष्ठ- दशरथ सिरसाठ
परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)
तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच यशस्वी व्हाल असे प्रतिपादन दशरथ सिरसाट यांनी केले. महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य व जीवनविद्या प्रबोधनीचे सदस्य दशरथ सिरसाठ (मुंबई ) बोलत होते
येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शुक्रवारी (दि.३०) विशेष विद्यार्थी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, जीवन विद्या मिशनचे दशरथ सिरसाठ, डॉ.किशोर संख्ये, रमाकांत निर्मळे, श्री शेवलकर, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना श्री सिरसाठ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मनात विचार पक्का केला की , अंतर्मन त्या दिशेने कार्य करते. तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि अंतर्मनात रुजवा निश्चितच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार आपल्या अंतर्मनात पेरल्यानंतर स्वराज्य निर्माण झाले.
जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार मिळत असतो अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. डॉ.किशोर संख्ये यांनी आपली मुलगी आयएएस डॉ कश्मीरा संख्ये हिच्या यशाची प्रेरणादायी कहाणी सांगितली आणि माणसाने ध्येय निश्चित केल्यानंतर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे किती गरजेचे आहे. या अनुषंगाने मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करत असताना संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी अशा प्रबोधनपर कार्यक्रमाची पुन्हा पुन्हा विद्यार्थिनींना गरज आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण नव्हाडे यांनी तर आभारप्रकटन प्रा.प्रवीण फुटके यांनी केले .या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.ह
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा