प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, जोमाने कामाला लागा

 आ. पंकजा मुंडे यांचा  निलंगा, तुळजापूर, अक्कलकोट मतदारसंघांत कार्यकर्ता संवाद दौरा ; विधानसभा मतदारसंघाचाही घेतला आढावा


वलांडीत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेत सहभाग


पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, जोमाने कामाला लागा


लातूर /धारशीव ।दिनांक २७।

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर   भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज निलंगा, तुळजापूर आणि अक्कलकोट मतदारसंघांत कार्यकर्ता संवाद दौरा करून मतदारसंघांचा आढावा घेतला. वलांडी येथे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला. येणाऱ्या निवडणुकीत जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.


   आ. पंकजाताई मुंडे यांनी सकाळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुरु केलेल्या जनसन्मान पदयात्रेत वलांडी ता. देवणी येथे सहभागी होऊन उपस्थित असंख्य जनसमुदायाशी संवाद साधला.


  यावेळी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यात जमा केलेली सर्व सामान्य माणसाच्या प्रेमाची शिदोरी जपायची असेल तर मन मोठं ठेवावं लागेल. मुंडे साहेब गेल्यावर मी कधीच रडणार नाही अशी शपथ घेतली होती. पण ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला आणि तो  जिव्हारी लागून  माझ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या त्यांना बघून मला अश्रू अनावर झाले. कारण तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये अश्रू आणि स्वप्न आहेत. संभाजीराव तुम्ही पदयात्रेची चांगली संकल्पना राबवली, तुम्हाला जनतेचे आशीर्वाद नक्की मिळतील. या भागातील देवणी गावाला तालुक्याचा दर्जा देण्याचे काम लोकनेते मुंडे साहेबांनी केल्यामुळे येथील लोकांचं साहेबांवर विशेष प्रेम आहे, या निःस्वार्थ प्रेमाची प्रचिती  त्यांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतातून आली.

माझ्या महाराष्ट्रातील लेकींचा विश्वास ढळू देणार नाही

-------

याप्रसंगी उपस्थित महिलांनी ‘उमेद' या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या संस्थेचा विशेष उल्लेख केला. यावेळी पंकजाताई म्हणाल्या, मी राज्याची महिला व बालविकास मंत्री असताना आम्ही या संस्थेची सुरुवात केली. राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहोत, यापुढेही करत राहू. माझ्या महाराष्ट्र ची लेक विश्वासाने भरलेली मला पाहायची आहे आणि हे माझं स्वप्न आहे, यासाठी सतत कार्य करत राहूअसा विश्वास यावेळी उपस्थितांना देऊन आ. निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या.


पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे

-------

पदाधिकाऱ्यांशी बोलताना पंकजाताई म्हणाल्या, आरक्षण भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असताना दिल गेलं हे ठणकावून सांगण्याची गरज आहे.

आपल्याला पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, परत एकदा येथील आमदार आपल्याला निवडून आणायचा आहे. पक्षाने दिलेल्या सूचना, कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करा.

पक्ष आपल्या कामाचं कौतुक करतो, आपल्या भावना ऐकून घेतो त्यामुळे जोमाने कामाला लागा.

संवादातून मतदारसंघांचा आढावा

------

आ. पंकजाताई मुंडे यांनी निलंगा, तुळजापूर आणि अक्कलकोट याठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यांची मतं जाणून घेतली. तुळजापूर येथे आ. राणा जगजितसिंह पाटील, अक्कलकोट येथे आ. सचिन कल्याणशेट्टी तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 


तुळजापूर, अक्कलकोट येथे घेतले दर्शन

------

आ. पंकजाताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी तुळजापूर व अक्कलकोट येथे भवानी आई आणि स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या