केवायसीसाठी लाडक्या बहिणींना अगोदरच मनस्ताप ;परळीच्या इंडिया बँकेत कर्मचारीच गायब
केवायसीसाठी लाडक्या बहिणींना अगोदरच मनस्ताप ;परळीच्या इंडिया बँकेत ईकेवायसी करणारा कर्मचारीच नाही
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपये रक्कम प्राप्त करून घेण्यासाठी बँकांच्या बाहेर केवायसी करायला रांगा लावलेल्या व घंटोन् घंटे प्रतीक्षा केलेल्या लाडक्या बहिणींना अगोदरच मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यातच आता परळीच्या इंडिया बँकेतील केवायसी करणारा कर्मचारीच उपलब्ध नसल्याने या सर्व महिलांचे केवायसी चे काम ठप्प झाले आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 हजारांची रक्कम मिळत आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक कारणांमुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आणि पैसे जमा झाले असले तरी बँकेतून ते पैसे हातात येऊ शकलेले नाही. पैसे मिळविण्यासाठी महिलांनी बँकेच्या बाहेर गर्दी केली आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकले आहेत. मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे बँक खाते बंद झाले आहेत. बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी सर्वच बँकेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ज्या महिलांचे केवायसी झाले असेल त्याच महिलांना या योजनेच्या लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभ घेण्यासाठी अनेक महिला सकाळपासून बँकेच्या बाहेर रांग लावून ई-केवायसी करण्यासाठी उभ्या राहत आहेत. याचा महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर,यात ग्राहकाचा पत्ता आणि ओळखपत्र हे बँक किंवा कर्ज देणाऱ्या कोणत्याही वित्तीय संस्थेला ग्रााहकाने देणे अपेक्षित असते.केवायसी बँक, वित्तीय संस्था आणि ग्राहक यांच्यात एका दुव्याप्रमाणे काम करत असते. त्यामुळे ते करणे अत्यंत आवश्यक आहे.. पण 'देव देतो पण कर्म नेते' या म्हणीचा प्रत्यय सध्या या लाडक्या बहिणींना येऊ लागला आहे. घंटून घंटी बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहून कसेतरी आत मध्ये गेल्यानंतर परळीच्या इंडिया बँकेच्या शाखेत ही केवायसी कर्म करणारा कर्मचारी उपलब्ध नसल्याने हे काम ठप्प होऊन बसले आहे केवायसी साठीच्या कागदपत्रांचे कट्टे बँकेत जमा झाल्याचे बघायला मिळाले आहे
कशी कराल e-KYC?
बँकेत गेल्यानंतर खातेदाराला आपला आधार नंबर अपलोड करावा लागतो. आधार कार्ड नंबर अपलोड करताना आधार कार्डची झेरॉक्स आणि ग्राहकाचे थम्ब देखील घेतले जातात. त्यानंतर ग्राहकाच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो. हा ओटीपी दिल्यानंतर ग्राहकाची केवायसी पूर्ण होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा