परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रांसाठी रा.काँ.शरदचंद्र पवार पक्षाचे थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र
परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रांसाठी रा.काँ. शरदचंद्र पवार पक्षाचे थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र
हा नियोजित खोडसाळपणा ; प्रकल्प उभा राहू नये यासाठी वस्तुस्थिती सोडून कारणं :मंजूर नवीन थर्मल परळीतच उभारा-ॲड.जीवनराव देशमुख
परळी वैजनाथ ,प्रतिनिधी....
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या परळी वैजनाथ येथील संच क्रमांक नऊच्या उभारणीबाबत शासन-प्रशासन स्तरावर नियोजित खोडसाळपणा करून परळी येथे मंजूर असलेला हा प्रकल्प उभाच राहू नये यासाठी वस्तुस्थिती सोडून कोणतीही कारणे समोर आणली जात आहेत. प्रशासनाकडून वस्तुस्थिती सोडून कारणे दाखवून हा प्रकल्प उभाच राहू नये असा प्रयत्न होत आहे. मात्र मंजूर असलेला औष्णिक विद्युत केंद्राचा संच क्रमांक नऊ हा प्रकल्प परळीतच उभारला गेला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाची 47 वी बैठक दिनांक 16.09.2023 रोजी छञपती संभाजीनगर येथे झाली व या बैठकीत परळी वै. येथे वाढीव 600 मे. वॅट विद्युत निर्मित्ती प्रकल्प उभारणीला मंजुरी दिली होती. मात्र आता परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाण्याची उपलब्धता नसल्याने व कोळसा हाताळणी स्त्रोतापासून दूर असल्याने वहनासाठी खर्च येत असल्याने सदरचे नवीन संच उभारणी सद्यस्थितीत विचाराधीन नाही असे कळविले आहे.हे वस्तुस्थितीला धरून नाही. वास्तविक पाहता परळी तालुक्यातील पुर्ण जलप्रकल्प ओसांडून वाहत आहेत तसेच जायकवाडी प्रकल्पात 65% पाणी साठा झाला आहे. तसेच गोदावरी नदीवर खडका येथे विद्युत प्रकल्पासाठी बंधारा ही केलेला आहे. ज्यामळे औ. वि. केंद्रासाठी पाण्याचा मुबलक साठा आहे.
संबंधित बातमी:click:प्रकल्प उभारणीला पूर्णविराम: परळीला मंजूर असलेले नविन औष्णिक विद्युत केंद्र संच उभारणी होणार नसल्याचेच स्पष्ट !
त्याचबरोबर परळी नगर पालिकेला भुयारी गटारमधून पाण्याचे शुध्दीकरण करुन वाया जाणारे पाणी प्रक्रिया करुन वापरण्यासाठी भुयारी गटार योजनेसाठी 150 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. या निधीचा वापर हा गैरमार्गाने झालेला आहे.अद्याप भुयारी गटार योजनेमुळे परळी शहरातील पुर्ण रस्ते हे फोडलेले असून कोठेही भुयारी गटारातून पाणी जात नसल्याची स्थिती आहे.याचीही सखोल चौकशी करावी.परळी शहरातील बिना वापराचे पाणी है औ.वि. केंद्रास मिळण्यासाठी आदेश द्यावेत. जेणेकरून प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची पाण्याची टंचाई राहणार नाही. तसेच दुहेरी रेल्वे मार्ग हा विद्युत ऊर्जेवर चालणाराही केलेला आहे. त्यामुळे कोळसा वाहतुकीचा खर्चही निश्चितच कमी होणार आहे.
त्यामुळे परळी वै. येथील वाढीव क्षमतेचा 600 मे. वॅट चा संच उभारणी करीता योग्य ती कार्यवाही करावी व प्रकल्प परळीतच उभारावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी दिला आहे.
त्यामुळे परळी वै. येथील वाढीव क्षमतेचा 600 मे. वॅट चा संच उभारणी करीता योग्य ती कार्यवाही करावी व प्रकल्प परळीतच उभारावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा