माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार
ऋषीकेश सोमनाथ गडेकर यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड
माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार
परळी/प्रतिनिधी
ऋषीकेश सोमनाथ गडेकर यांची जिल्हा परिषद बीड येथे भटक्या जमाती ब या प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा आज माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माणिकनगर येथील रहिवाशी ऋषीकेश गडेकर यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची नुकतीच परिक्षा दिली होती. यात भटक्या जमाती ब या प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी माणिकनगर येथे माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार व पेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवाजी नरसिंगराव गडेकर, काँगे्रस आयचे शहर उपाध्यक्ष वैजनाथराव गडेकर, ज्ञानेश्वर खर्डे, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर खर्डे, सोमनाथ गडेकर, गजानन गडेकर, ओम खर्डे, गजेंद्र गडेकर, राजकुमार गडेकर, अतुल गडेकर, अजय गडेकर, विठ्ठल गडेकर, अभिजीत गडेकर, दत्ता गडेकर, चंदु गडेकर यांच्यासह माणिकनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा