पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस गाडीत आढळला मृतदेह
पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस गाडीत आढळला मृतदेह
परळी /प्रतिनिधी-आज सकाळी परळी स्टेशनवर दाखल झालेल्या पनवेल- हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस मध्ये एस -१ एक मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह बोगीच्या दारत होता.हे दार उघडत नसल्यामुळे गाडीचे टीटी यांनी दुसऱ्या बाजूने जाऊन पाहिले असता सदर बॉडी दारात आढळून आली.
पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस गाडी नंबर 17 613 सकाळी ५.३० च्या सुमारास परळी स्थानकांवर आली. कोच- एस -१ मध्ये मृतदेह असल्याची प्रथम खबर टीटीने गार्डला देऊन गार्डणे नंतर परळी स्टेशन मास्टर न संपर्क केला स्टेशन मास्तरांच्या लेखी सूचनेनंतर परळी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी परळी स्थानकावर सदर बॉडी पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतली.
मृताचे वर्णन वय अंदाजे 40 ते 45 वर्ष. अंगात डार्क निळ्या रंगाची जीनची पॅन्ट फिक्या पिवळ्या आणि निळ्या रंगाचा आडव्या लाईनिंगचा टी-शर्ट, हातावर (दिल) बदामाचे चित्र गोंदलेले, उजव्या हाताचे मनगटाजवळ एक गोल जखमेची खून, उजव्या हातात काळा दोरा बांधलेला आढळून आला. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही.
सदर मृतदेह जवळ कुठलीही ओळखीचा पुरावा ओळखपत्र त्याच्याजवळ आढळून आले नाही. त्याच्या खिशात कागदावर एक मोबाईल नंबर लिहिल्या ची चिट्ठी आढळून आली.
सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी ठेवण्यात आलेला आहे. पंचनामावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पीएसआय किशोर मलकुनाईक, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गांगुर्डे उपस्थित होते. , एस. एस.वाघमोडे (ए एस आई) यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एम. सय्यद (ए.एस.आई. रेल्वे पोलीस) हे अधिक तपास करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा