चौथा श्रावण सोमवार:आ. पंकजाताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथ, सोमेश्वराचे दर्शन
चौथा श्रावण सोमवार:आ. पंकजा मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथ, सोमेश्वराचे दर्शन
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज श्रावण सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथ तसेच जिरेवाडी येथील श्री सोमेश्वराचे दर्शन घेतले. दोन्ही मंदिरात आज दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
आ. पंकजाताई मुंडे तसेच त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी आज सकाळी चौथ्या श्रावण सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन अभिषेक केला व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. आ. पंकजाताईंना पाहताच दर्शनासाठी आलेल्या अनेक महिला व पुरूष भाविकांची त्यांचेसोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती. सर्वांना भेटून त्यांनी प्रत्येकांची सेल्फीची इच्छा पूर्ण केली.
श्री सोमेश्वराचेही घेतले दर्शन
-------
आ. पंकजाताई मुंडे व प्रज्ञाताई मुंडे यांनी जिरेवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री सोमेश्वराचेही मनोभावे दर्शन घेतले. याठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनातही त्यांनी हजेरी लावली. दोन्ही ठिकाणी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा