परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परळीचा ईमानदार रिक्षावाला: दर्शनाला आलेल्या भाविकाचे २५ हजाराचा मोबाईल व किंमती सामान केले परत

 परळीचा ईमानदार रिक्षावाला: दर्शनाला आलेल्या भाविकाचे २५ हजाराचा मोबाईल व किंमती सामान केले परत



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
     बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे सध्या श्रावण महिन्याचा पर्वकाळ सुरू असुन या निमित्ताने राज्य व परराज्यातून असंख्य भाविक परळी दाखल होत असतात. अतिशय गर्दी व मंदिर परिसरात असलेल्या घाईगडबडीत अनेकांचे किंमती सामान, दागिने, पाकीट वगैरे गहाळ होते. मात्र परळी येथील स्थानिक नागरिक याबाबत नेहमीच सकारात्मक व इईमानदार असल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी बघायला मिळाली आहेत. अशाच प्रकारचे एक उदाहरण परळीच्या एका ईमानदार रिक्षावाल्यानेही आज दाखवून दिले आहे.
           तेलंगाना राज्यातील बिदर येथील भाविक सहकुटुंब प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेण्यासाठी परळी वैजनाथ येथे आले होते. त्यांचे किमती सामान व मोबाईल किंमत 25000 असे रोडवर पडले. ते भाविक तसेच निघून गेले प्रभू वैजनाथ दर्शनानंतर या भाविकांच्या ही बाब लक्षात आली. मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या परळीतील रिक्षा चालक अमोल गित्ते रा. परळी वैजनाथ यांना रस्त्यावर मोबाईल वही किमती सामान दिसले या रिक्षाचालकाने कोणाचे सामान पडले का याची चौकशी केली मात्र लागला नाही त्यामुळे त्याने ईमानदारी दाखवून पोलीस स्टेशन परळी शहर येथे ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार मुजमुले पोलीस अमलदार मोहन दुर्गे यांच्याकडे आणून दिले. दरम्यान शहर पोलिसांनी या भाविकांचा शोध घेऊन व शहानिशा करून  त्यांचे किमती सामान व मोबाईल त्यांना परत केले. मंदिर व परिसरात असलेली गर्दी व घाईगडबडीच्या व सार्वजनिक ठिकाणी गाळ झालेल्या रस्त्यावर पडलेल्या किमती वस्तू अतिशय सकारात्मकता दाखवून इमानदारीने पोलिसांपर्यंत व भाविकांना ते परत करण्यापर्यंत भूमिका घेणाऱ्या या रिक्षाचालकाचे शहर पोलीस ठाण्याचे पो.नी  लोहकरे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!