दुःखद वार्ता: सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन
सौ. उज्वला नंदकुमार रामदासी यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
येथील पुरातन श्रीगोराराम मंदिरचा पुजारी परिवार असलेल्या रामदासी परिवारातील नंदकुमार रामदासी यांच्या पत्नी सौ. उज्वला रामदासी यांचे आज दि. 26 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी त्या 65 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सौ. उज्वला रामदासी या अतिशय संयमी, मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या होत्या. स्नेही जनांमध्ये त्या प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाने रामदासी परिवारातील एक प्रेमळ व्यक्तिमत्व हरवले आहे.सौ. उज्वला रामदासीपार्थिवावर उद्या दि 27 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मोक्षधाम स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोराराम मंदिर, गणेशपार येथील निवासस्थानापासूअंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या निधनाने रामदासी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा