कर्तव्यनिष्ठ केंद्रप्रमुख : कमलाकर कापसे सर

 कर्तव्यनिष्ठ  केंद्रप्रमुख : कमलाकर कापसे सर


सक्षम प्रशासक, कार्यक्षम संघटक, उत्तम व्यवस्थापक ,विद्यार्थी आणि समाजासाठी कार्य करणारे आदर्श अध्यापक,कर्तव्यनिष्ठ केंद्रप्रमुख  असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे कमलाकर कापसे सर  होय. श्री. कमलाकर  विश्वांभर कापसे यांचा जन्म ०५/०८/१९६६ साली  गौरगाव ता. कळंब जि. धाराशिव येथे झाला .त्यांनी  बीए. बीएड.पदवीचे शिक्षण घेऊन  इ. १ली ते १० वीच्या वर्गांसाठी अध्यापन कार्य केले. विविध शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक कार्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे . केंद्रप्रमुख म्हणून कार्य करताना शहरातील नामांकित संस्थाशी त्यांचा  संबंध आला. समानतेचे तत्त्व समोर ठेवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अखंड सेवा  केली. आपल्या कार्यकाळात ग्रामीण  भागात शालेय व प्रशासकीय यंत्रणा उभी केली. शालेय प्रशासनात सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी वर्गाचा सहभाग असेल तर एकतेची भावना बळकट होईल आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, अशी कमलाकर कापसे सरांची  धारणा आहे.

 अध्यापक  तथा केंद्रप्रमुख म्हणून कमलाकर  कापसे  यांनी  अत्यंत निष्ठेने सेवा केली. केंद्रप्रमुख  हे पद  शिक्षक व प्रशासन याना जोडणारा दुवा असते.त्या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारा असतो. म्हणून केंद्रप्रमुखात  तेवढी विचारांची,अनुभवाची परिपक्वता असली तर ते विद्यालयाला नंदनवन बनवणारे महत्वाचे घटक ठरतात.बीड जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागात त्यांनी  पायाभरणीपासून योगदान दिले. त्यांच्यातील उत्कृष्ट सारथ्य गुणांमुळे अंबाजोगाई तालुक्यातील अनेक  विद्यालयाचा रथ योग्य प्रगतिपथावरुन ध्येयपूर्तीकडे वाटचाल करीत आहे.  केंद्रप्रमुख कमलाकर कापसे सर हे समाजनिष्ठ,ज्ञाननिष्ठ ,विद्यार्थीनिष्ठ त्याचप्रमाणें कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी  म्हणून सर्वपरिचित आहेत. नाविन्याचा ध्यास असणारे उपक्रमशील ,विद्यार्थीप्रिय  शिक्षक म्हणून आम्ही आजही त्यांना आदराने ओळखतो .जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गिरवली ,ता.अंबाजोगाई येथे त्यांनी आम्हाला घडविले.माझ्यातील सांस्कृतिक कला गुणांना वाव देऊन माझी कलावंत म्हणून जडणघडण करणारे  कमलाकर कापसे  गुरुजी माझे आदर्श  आहेत . त्यांनी माझ्या सांस्कृतिक जाणीव प्रगल्भ केल्या . शिक्षकांच्या योग्यतेप्रमाणे कौतुकाची थाप देऊन वेळप्रसंगी त्यांना खडेबोल सूनविणारे स्पष्टवक्ते अशी त्यांची ख्याती आहे. खऱ्या अर्थाने आदरणीय कापसे  सर  हे नियोजनाचा महामेरू आहेत. नियोजनात सर्व शिक्षकांचा सहभाग असावा म्हणून ते सर्वसमावेशक भूमिका घेत असतात. स्वतः नीतिमान,शिस्तप्रिय,वक्तशीरपणाचे पालन करणारे आदर्श केंद्रप्रमुख  म्हणून कापसे  सर सुपरिचित आहेत.

 सन्माननीय कापसे सरांचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे गुणग्राहकता . योग्य व्यक्तीची पारख त्यांना आहे.शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील गुणाची पारख करून त्या गुणाना प्रोत्साहन देवून विद्यालयाचे नाव उंचावण्यात व विद्यालयाच्या सर्वांगीण विकासात त्याचा यथायोग्य उपयोग करून घेणारे केंद्रप्रमुख  म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे.विद्यार्थी व शिक्षकांच्या कलागुणांना वाव देणारे कापसे  सर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनात सक्रिय असतात. विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यामध्ये सामाजिक भान,सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम,राष्ट्रीयएकात्मता,स्त्रीपुरूष समानता,वक्तशीरपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन,संवेदनशीलता,श्रमप्रतिष्ठा,अशा मूल्यांची रुजवण  करणारे उपक्रम शाळेत राबविण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात.

महत्वाचे म्हणजे ते निर्व्यसनी,सत्शील व्यक्ती म्हणून सर्वप्रिय आहेत .  शाळेच्या विकासासाठी तन मन धनाने धडपडणारे,सर्व शिक्षकाकडून अधिक  जबाबदारीने कार्य पूर्णकरून घेणारे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख  आहेत. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा निर्माण करून या भागाचा   विकास साधला आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासोबत सर्वांगीण विकासाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबविले .कापसे  सरांच्या समवेत मी अनेक वर्षांपासून संपर्कात  आहे. माझ्यावर विश्वास दाखवून कापसे सरांनी आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले आहे.  वैज्ञानिक प्रदर्शने,मेळावे,वाचनसंस्कृती,ग्रंथप्रदर्शने,सांस्कृतिक मेळावे यांचे आयोजन करण्यात आदरणीय कापसे  सरांचे विशेष योगदान  आहे. 

  केंद्रप्रमुख जेवढा  सक्रिय,उपक्रमशील तेवढा त्या विद्यालयांचा प्रगतीचा  आलेख हा उंच असतो.हा आलेख उपक्रमशील कापसे सरांनी उंचावला आहे.अनेक वर्षे अविरतपणे सेवा देऊन आदरणीय कापसे सरांनी अनेक उत्तम विद्यार्थी  घडविले . तेच विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शाळेत  सर्वांशी समजुतीने वागणारे , वेळप्रसंगी सर्वाना सांभाळून घेणारे,उत्तम नेतृत्वगुण असणारे आमचे आदरणीय कमलाकर  कापसे सर  नियमित वयोमानानुसार सेवापूर्ण करून ३१ ऑगस्ट २०२४ रोजी  सेवानिवृत्त होत आहेत.  त्यांना उदंड आयुष्य लाभो. हीच सदिच्छा.!                   

                                                                    ✍️ प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे

 (सिने-नाट्य प्राध्यापक-लेखक-अभिनेता-दिग्दर्शक)

  संवाद : ९८२२८३६६७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार