सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या परळी तालुका अध्यक्षपदी ए. तु.कराड तर सचिव- पदी दिनकर येवतेकर
सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या परळी तालुका अध्यक्षपदी ए. तु.कराड तर सचिव- पदी दिनकर येवतेकर
परळी वै.....
परळी पंचायत समिती सभागृहात ए. तु. कराड यांच्या अध्यक्षतेखाली व बीड जिल्ह्याचे अध्यक्ष -बाबुराव नागरगोजे, राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव धायजे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष जी आर घाटूळ, संघटनेचे राज्य संघटक टी. एल. बादाडे यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक होऊन परळी तालुका अध्यक्षपदी -ए. तु. कराड, सचिव पदी -दिनकर येवतेकर, उपाध्यक्ष पदी अखिल सर, व दिलीप कुलकर्णी, सहसचिव -नावके कर सर, कोषध्यक्षपदी -प्रकाश मस्के
तर जिल्हा प्रतिनिधी -ढवळे पाटील यांची सर्वांणूमते निवड करण्यात आली.
प्रथमत :जिल्हा कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्षांनी कार्यकारणी करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर सर्वांचे कार्यकारिणी तयार करण्यात आली. जिल्हाध्यक्षांनी त्या कार्यकारिणीचे वाचन केले. व सर्व संबंधिताचे सत्कार करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रश्नासाठी लढा देणे आवश्यक असल्याने, या कार्यकारणीची स्थापना करणे आवश्यक होते असे जिल्हा अध्यक्षांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले. शिवाजीराव धायजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी जिल्ह्यातील कोषागार कार्यातून कशा पद्धतीने फण्ड रीवाईज केले जातात या संदर्भात माहिती दिली. हेड्स खाली दिलेल्या बजेटला वारंवार वळती करणे हे वित्त व लेखा अधिकारी यांच्या कामकाजाविरुद्ध कार्य असते. हे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्या त्या हेड्स खाली आलेली रक्कम तालुका लेवल ला पाठविणे हेच यांचे कार्य असते. असे शिवाजीराव धायजे यांनी सांगितले. व त्यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
राज्य संघटक बादाडे, डाके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अखिल सर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार दिलीप कुलकर्णी यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा