आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात
बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा खून !
आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात
केज (बीड) :- केज तालुक्यातील शेतात एका महिलेचा चारित्र्याच्या संशया वरून खून झाला असून हा खून तिच्या नवऱ्यानेच केला आहे. खून करून तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ३१ ऑगस्ट रोजी आंनदगाव (सारणी) ता. केज येथील शेतात आज दुपारी विलास नामदेव आघाव रा. नागझरी ता. धारूर या सालगड्याने त्याची पत्नीचे एका पुरूषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या चारित्र्याच्या संशया वरून डोक्यात काठी मारून जागीच खून केला.
खून केल्या नंतर आरोपी विलास आघाव हा पळून जात असताना पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे घटनास्थळी पोहोचले असुन कार्यवाही करीत आहेत. घटना स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देणार आहेत. मृतदेह अद्याप घटनास्थळीच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा