पोस्ट्स

पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट

इमेज
पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट वंचितांच्या लढ्यासाठी मी सोबत ; सरकारने हे उपोषण सन्मानाने सोडवावं जालना ।दिनांक १७। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची उपोषण स्थळी जावून भेट घेतली. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. दरम्यान वंचितांच्या लढ्यात मी या दोघांसोबत आहे. सरकारने सन्मानाने त्यांचे उपोषण सोडवून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.   मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. आज संध्याकाळी पंकजाताईंनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.     यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “दोन दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेले आहे. मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण दादा रडायला लागले. ताई, तुमच्या पराभवामुळे चार लोकांनी आत्महत्या केल्या, मला बघून रडू येतंय. परिस्थिती हाताळत असल्याने याला कोणतंही राजकीय

शासनाची भूमिका माय-बापाची असावी

इमेज
प्रा.लक्ष्मण हाके आणि सहकाऱ्यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने बघावे- पंकजा मुंडेंचे ट्विट शासनाची भूमिका माय-बापाची असावी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.अशा प्रकारचे ट्विट भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे.        ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सरकारचे लक्ष वेधले आहे. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला. "राज्याचे शासन आणि

शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत

इमेज
आगामी निवडणूका शिवसेना ताकदीने लढणार व जिंकणार-संजय भांबरे शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत परळी/प्रतिनिधी शिवसेनेचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे हे आज शनिवार दिनांक 15 जुन रोजी परळी शहरात आले असता परळीत शिवसैनिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान आगामी नगर परिषद, विधानसभा तसेच सर्व निवडणूका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ताकदीने लढणार व जिंकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांनी बोलतांना केले. शिवसेना नेते तथा परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांचा आज शनिवारी परळीत दौर्‍यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी आगामी नगर परिषद, विधानसभा निवडणूकासंदर्भात चर्चा केली. प्रारंभी शिवसैनिकांनी त्यांचे भगवी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  यावेळी शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालिवाल, जेष्ठ नेते सतीश जगताप, माजी नगरसेवक रमेश चौडे, युवा नेते संजय कुकडे, संजय सोमणे, श्रीनिवास सावजी, मो

आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!

इमेज
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार - प्रा.टी.पी.मुंडे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा! परळी वैजनाथ, प्रतिनिधी  ओबीसींच्या प्रश्नासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावामध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. या आमरण उपोषणाला त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असल्याने उपोषण स्थगित केले त्याच्या विरोधात ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसीचे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असून ते आरक्षण मराठा समाजाला देता कामा नये व सगेसोयरे

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम ......!

इमेज
डॉक्टर, इंजिनियर विद्यार्थी घडविण्याऐवजी जबाबदार नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी-सौ. श्रद्धा चनाखेकर नांदेड - दि. १५जून २०२४ डॉक्टर इंजिनियर विद्यार्थी घडविण्यापेक्षा या देशाचे जबाबदार व संवेदनशील, पर्यावरण संवर्धक नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अभ्यासेतर उपक्रम, छंद, खेळ यात सहभागी होणे गरजेचे आहे. सध्या पालकांना केवळ मोठ्या इमारती व सूटबूट , टाय मधील विद्यार्थ्यांच्या शाळा पसंत पडत असल्या तरी अशा शाळांमधून केवळ परीक्षार्थी विद्यार्थी घडविले जातात.परंतु भौतिक सुविधा कमी असतानाही लहान शाळांमधूनही संस्कारक्षम शिक्षण व गुणवत्ता मिळू शकते हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित  नांदेडच्या कै. नाना पालकर प्राथमिक शाळेने सिद्ध केले आहे असे प्रतिपादन नांदेड येथील सुप्रसिद्ध गायिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा चनाखेकर यांनी केले. तसेच स्पर्धा परिक्षांमधून यश मिळवणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचे दाखले त्यांनी यावेळी दिले.  भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित कै. नाना पालकर प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमप्रसंगी विद

आर्थिक मदतीसह पोपटराव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे

इमेज
आत्महत्या केलेल्या पोपटराव वायभासे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट निवडणुका, जय-पराजय होत राहतात मात्र त्यातून कुणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब - धनंजय मुंडे आर्थिक मदतीसह पोपटराव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे आष्टी (दि. 14) - लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभासे या तरुणाने आत्महत्या केली होती. आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  निवडणुकांमध्ये जय - पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  दरम्यान मयत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवा

इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

इमेज
  बापाची जिद्द अन् लेकीची मेहनत: शेतमजुराची मुलगी होणार डॉक्टर! इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     महत्त्वकांक्षापुढे भल्या भल्या अडचणीही गुडघे टेकतात, हे फक्त ऐकले होते. पण येथे मात्र ते प्रत्यक्षात बघायला आणि अनुभवायला मिळाले. इंजेगाव येथील एका सालगड्याची मुलगी चक्क नीट परीक्षेत तब्बल 637 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. आई आणि वडील दोघेही दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात आणि त्यांना साधी अक्षर ओळख ही नाही, मात्र वडिलांच्या जिद्दीला आणि मुलीच्या मेहनतीला फळ मिळाले. इंजेगाव येथील वैष्णवी भरत मुंडे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 637 गुण घेऊन घऊघवीत यश मिळवले. या यशाचा ग्रामस्थांना अभिमान असून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. वैष्णवी मुंडे मात्र याचे सर्व श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना देते.         भरत पंढरीनाथ मुंडे आणि चांगुणाबाई मुंडे या इंजेगाव येथील दंपत्याची वैष्णवी ही मुलगी... अल्पभूधारक शेतकरी असलेले भरत मुंडे हे इतरांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात. त्या

आर्थिक मदतीसह पांडुरंगच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे

इमेज
आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनवणेच्या कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट निवडणुका, जय-पराजय होत राहतात मात्र त्यातून कुणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब - धनंजय मुंडे आर्थिक मदतीसह पांडुरंगच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे अंबाजोगाई (दि. 14) - लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ आंबा गावच्या पांडुरंग सोनवणे या तरुणांनी आत्महत्या केली होती आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  निवडणुकांमध्ये जय - पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  दरम्यान मयत पांडुरंग सोनवणे (वय 33) यांस एक मुलगा, मुलगी,
इमेज
  पंकजाताई मुंडे परवा आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबियांना भेटणार बीड ।दिनांक १४। पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे परवादिवशी भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. जीव देऊन भागणार नाही बाळांनो..माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका असं आवाहन काल त्यांनी केलं होतं.    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभर झाले. अशातच हा पराभव जिव्हारी लागल्याने सचिन मुंडे (येस्तार ता. अहमदपूर), पांडुरंग सोनवणे (डिघोळ अंबा ता. अंबाजोगाई), पोपट वायबसे (चिंचेवाडी बीड) यांनी स्वतःचे जीवन संपवले. तरूणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कार्यकर्त्यांच्या मृत्यूने पंकजाताई मुंडेंना अतिशय वेदना झाल्या, त्यांनी दूरध्वनीवरून त्यांचं सांत्वनही केलं होतं. यासंदर्भात   त्यांनी व्हिडिओ शेअर करून तरूणांना संयम राखण्याचे देखील आवाहन केलेले आहे.    दरम्यान, पंकजाताई मुंडे  परळीत येत असून परवा  त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी संबंधित गावात

महिला व मुलींच्या स्वरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा वृक्षारोपण करून समारोप सोहळा

इमेज
महिला व मुलींच्या स्वरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा वृक्षारोपण करून समारोप सोहळा    (परळी वै) :प्रतिनिधी                            येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळा, आर्य समाज यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला व मुली स्वसंरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा समारोप सोहळा पालकांच्या आणि असंख्य शिबिरार्थ्यांच्या उपस्थितीत हर्ष उल्हासात संपन्न झाला. *चांगल्या सवयीने चांगला माणूस घडतो व चांगला माणूस चांगले राष्ट्र घडवतो* हेच जणू काही ब्रीदवाक्य असलेल्या आर्य समाज परळी च्या अध्यक्ष श्री जुगलकिशोरजी लोहिया,मंत्री श्री उग्रसेन राठोड व सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरातील मुली व महिला साठी हे सुसंस्कृत,गुणवान,चरित्रवान, बुद्धिवान व बलवान व्हावेत या उदात्त हेतूने आर्य समाज परळी वैजनाथ अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक बालिका व युवत्नी अगदी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. या शिबिरात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने  शिबिरार्थ्यांना शारीरिक व्यायाम, कसरती, रोप मल्लखांब, दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, लाठी-काठी व विविध खेळाद्वारे शारीरिक व बौद्धिक विकास स

समन्वयातून प्रश्न सोडवा: भाविकांना दिलासा द्या

इमेज
वैजनाथ देवल कमिटी व पुरोहित संघाने आपसात सुसंवाद साधून भाविकांची गैरसोय दूर करावी -अभयकुमार ठक्कर पुरोहितांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यास परवानगी द्यावी परळी वैजनाथ, प्रतिनिधी  वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित संघासाठी अभिषेक संदर्भात घालून दिलेल्या अटी जाचक आहेत या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी पुरोहित संघाने सुरू केलेले आंदोलन योग्य आहे तरी भाविकांची सोय लक्षात घेता देवल कमिटी व पुरोहितांनी आपसामध्ये योग्य समन्वय साधावा व समस्त भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे  वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित वर्गासाठी घालून दिलेले नियम जाचक असून पुरोहित संघाची अभिषेक सुरू ठेवण्याची पूर्वपार व परंपरागत पद्धत सुरू ठेवावी ही मागणी योग्य असून वैजनाथ मंदिर विश्वस्त समिती व त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पुरोहित संघाने भाविकांची सोय लक्षात घेऊन आपसात योग्य समन्वय साधावा अशी मागणी समस्त भाविक वर्ग, परळीकर व आम जनतेतून होत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग असल्याने प्रभू वैजनाथ मंदिरातील

प्रासंगिक लेख>>>>रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे

इमेज
रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे सरांचा आज स्मृतीदिन! आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र वंदन..!! आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे सरांचं असणं आमच्यासाठी लाखमोलाचं होतं..!निष्ठावान प्राध्यापक कसा असावा आणि त्या पेशाला पूर्णत्वाने कसे वाहून घ्यावे, हे जर का कुणाला शिकावयाचे असेल तर त्यांनी आमचे आदरणीय  गुरुवर्य स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या जीवनकार्यावरून शिकावे. सरांचे, मार्गदर्शन आम्हांस लाभले हा आनंद शब्दातीत आहे.अनेक पिढ्यांवर उत्तम संस्कार करून त्यांचे आयुष्य घडविणाऱ्या  प्रा.केशवराव देशपांडे सरांना 'रंगकर्मींचे विद्यापीठ'असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.आज आपण जे काही आहोत ते प्रा.केशवराव देशपांडे सरांमुळे आहोत अशी भावना आजही आमच्या मनात जागृत आहे.  साधेपणाने जगताना जीवनावरची,माणूसकीवरची , कलेवरची श्रद्धा कशी वाढवावी याचे मार्गदर्शन आमच्या पिढीला लाभले ते सरांकडूनच. आपल्या व्यासंगी वृत्तीने आणि सर्जनशीलतेने अवघं  रंगभूमीविश्व व्यापून टाकणारे  गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांच

कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्‍याची आत्महत्या

इमेज
कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्‍याची आत्महत्या  परळी वैजनाथ(प्रतिनिधी)  कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील 60 वर्षे वयाच्या वृध्द शेतकर्याने आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि.5 जुन रोजी घडली असुन याप्रकरणी दि.12 जुन रोजी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे.  परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी संजय ग्यानबा सलगर वय 60 वर्षे हे गावातच आपली शेती करतात.मागील एक वर्षांपासुन शेती पिकत नसल्याने संजय सलगर हे चिंताग्रस्त होते.यातच दि.5 जुन रोजी त्यांनी आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.याप्रकरणी त्यांचा मुलगा भानुदास संजय सलगर यांच्या खबरीवरुन परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केकाण हे करत आहेत.

पक्षविरोधी कामगिरी केल्याप्रकरणी कारवाई

इमेज
  मुंडेंचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन  मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. पण या निवडणुकीत पक्षविरोधी कामगिरी केल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सहा वर्षांसाठी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.       यासंदर्भातील अधिकृत निलंबनाचं पत्र समोर आलं असून यामध्ये म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं विधानपरिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संघटन आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीनं हे पत्र काढण्यात आलं आहे.

या बाबी पुर्ण करा अन्यथा मिळणार नाही अनुदान !

इमेज
  या बाबी पुर्ण करा अन्यथा मिळणार नाही अनुदान: निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना तहसीलदार यांनी जारी केली असुन या सूचनेनुसार सांगण्यात आलेल्या या बाबी पुर्ण करा अन्यथा अनुदान मिळणार नाही.          सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थीना सुचित करण्यात येते कि, माहे. एप्रिल-2024 पासून अनुदान DBT (Direct Beneficiary Trnasfer) ने वितरण करणे आसे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थीनी आधार कार्ड बँक पासबुक लाभार्थीचा मोबाईल नंबर लिंक करण्यात यावे. तसेच योजनेचा प्रकार, जात प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार व दिव्यांग टक्केवारी, राशन कार्ड (पिवळे/केशरी). व तसेच विधवा महिला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र यांची छायांकित प्रत संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे दाखल करण्यात यावी. आपले आधार कार्ड व बँकपासबुकला मोबाईल नंबर ला लिंक नसल्यानंतर आपणास माहे. एप्रिल-2024 पासून अनुदान मिळणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन तहसीलदार परळी वैजनाथ यांनी केले आहे.

BREAKING | जरांगे पाटलांचे उपोषण एक महिन्यासाठी स्थगित

इमेज
सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, जरांगे पाटलांचे उपोषण एक महिन्यासाठी स्थगित मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस असून सरकारकडून शंभूराज देसाई यांनी जरांगेची भेट घेत त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचं असावं दिलं यासोबतच जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन देखील केलं. त्यांच्या या विनंतीचा मान ठेऊन जरांगे पाटलांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असून आपलं उपोषण स्थगित केलं आहे.       

BREAKING |सुनेत्रा पवार विधानभवनात पोहचल्या: राज्यसभेसाठी भरणार अर्ज

इमेज
  सुनेत्रा पवार विधानभवनात पोहचल्या: राज्यसभेसाठी भरणार अर्ज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अखेर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत आमच्याकडून सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या जागेसाठी मी इच्छुक होतो, मात्र पक्षात सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.      राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, "या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे हेदेखील इच्छुक होते. मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याविषयी निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणं शक्य नव्हतं," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, "राज्यात महायुतीचे आ

पंकजाताई मुंडे यांची हळहळ

इमेज
  आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान देणार मदतीचा हात जीव देऊन भागणार नाही बाळांनो.. माझी शपथ आहे तुम्हाला, स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करून घेवू नका - पंकजाताई मुंडे यांची हळहळ बीड ।दिनांक १३।  लोकसभेत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने काही ठिकाणी तरूणांनी आत्महत्या केल्याच्या प्रकाराबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गंभीर चिंता व्यक्त करून हळहळ व्यक्त केली आहे. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, असा जीव देवून भागणार नाही बाळांनो..माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेऊ नका असं आवाहन पुन्हा एकदा त्यांनी केलं आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या तरूणांच्या  मुला बाळांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने घेतली असून लवकरच त्यांना मदत दिली जाणार आहे.    नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पंकजाताई मुंडे यांचा अगदी थोडया मतांनी पराभव झाला पण हा पराभव सहन न झाल्याने काही ठिकाणी  तरूणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. मन सुन्न करणाऱ्या या घटनांनी पंकजाताई मुंडे यांनी तरूणांच्या कुटुंबीयांशी तात्काळ दूरध्वनीवरून सं

खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना खासदारकीचे पहिले पत्र

इमेज
खासदारकीचे पहिले पत्र : मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या:खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना पत्र  केज (बीड) :- पाच दिवसापासून कुणबी मराठा समाजातील सर्व सगळ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना लाभ देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा देत नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपालांनी या आंदोलनाची तात्काळ दाखल घ्यावी यासंदर्भात पहिले पत्र दिले आहे.          राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे यांनी खासदारकीचे पहिले पत्र मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्याच्या संदर्भाने राज्यपालांच्या नावाने दिले आहे. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, मागील पाच दिवसा पासून मराठा संघर्षयोद्धा मनोज  जरांगे पाटील हे सर्व मराठ्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांचा लाभ द्यावा. या मागणीसाठी दि. ८ जून पासून मागील पाच दिवसा पासून उपोषणास बसले आहेत. दिवसें दिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. याची दखल  राज्यपालांनी घ्यावी.त्यांच्या मागण्या संदर्भात राज्य श

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

इमेज
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी..       आज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना परळी गंगाखेड रस्त्यावरील  वडगाव दादाहरी नजीकच्या 33 के.वी.केंद्रासमोरील रस्त्यावर घडली आहे.        परळी गंगाखेड रस्त्यावर सध्या खोदकाम केलेले असून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या  रस्त्यावरून सध्या वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. याच रस्त्यावर काल रात्रीच्या सुमारास बालाजी रायभोळे रा.भीमवाडी, परळी वै.हे  उखळी बु. या आपल्या सासरवाडीला जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. मोटारसायकलवरील बालाजी रायभोळे यांना जोराची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला व शरीराला जबर मारहाण झाली. या अपघातात त्यांचे निधन झाले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद  करण्यात आला आहे.

पोलीसांची पेट्रोलिंग नावालाच; नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

इमेज
चोरट्यांनी सिरसाळ्यात मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबवली;तीन ज्वेलर्ससह दोन खताची दुकानेही फोडली परळी वै./प्रतिनिधी       अज्ञात चोरट्यांनी रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत सिरसाळ्यात रात्रीतून ठिकठिकाणी धुडघूस घातला. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली. त्यानंतर तीन सोन्या-चांदीच्या दुकानांसह दोन खताची दुकानेही फोडली. दरम्यान एकाच रात्री चोरट्यांनी पाच ते सहा ठिकाणी चोरी केल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.            परळी तालुक्यातील सिरसाळा येथे अज्ञात चोरट्यांनी परमपुज्य गुरू वामनानंद महाराज जन्मभूमी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी लक्ष्मण कालिदास निर्मळ पाटील यांच्या लहुदास अॅग्रो सव्हींसेस या दुकानाचे शटर उचकटून तेथून काही बियाणांच्या बॅगा लंपास केल्या. यासह आणखी एका खताच्या दुकानातून माल लांबवला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा ज्वेलर्स दुकानांकडे वळविला. चोरट्यांनी वैद्यनाथ ज्वेलर्स, विठ्ठल ज्वेलर्स, गणेश ज्वेलर्स याठिकाणीही शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून तेथील काही ऐवज लंपास केला. या प्रकरणात दुपारी उशिरा

परशुराम आर्थिक विकास महामंडळ १५ ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषण - दीपक रणनवरे

इमेज
  परशुराम आर्थिक विकास महामंडळ १५ ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषण - दीपक रणनवरे  नांदेड दिनांक 10 जून प्रतिनिधी....       १५ ऑगस्टच्या अगोदर जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी १००० कोटीचा निधी देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने पुन्हा दीपक रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करणार आहे.  महामंडळ कार्यरत झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. अशी माहिती ब्राह्मण संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिली आहे.          समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे यामधे १ सप्टेंबर २०१८ चे केज तहसीलसमोर धरणे , २८ आक्टोबर २०१८ रोजी केज ते बीड मोटार सायकल मोर्चा , २२ जानेवारी २०१९ चे आझाद मैदानावर धरणे आंदोलन यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील काही केले नाही , त्यानंतर ३ आॕगष्ट २०१९ ला औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन , त्यानंतर २२ जानेवारी २०२० रोजी बीड कलेक्टर आॕफीस समोर धरणे आंदोलन , त्यानंतर के

खोट्या पोस्ट करून समाजात विष पेरण्याचं काम करणाऱ्यांविरुद्ध सत्याच्या मार्गाने लढत राहू - वाल्मिक कराड

इमेज
रा.काॅ.नेते वाल्मिक आण्णा कराड यांचा बनावट ईन्स्टाग्राम आयडी तयार केला : अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ,एमबी न्युज वृत्तसेवा...   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते वाल्मिक आण्णा कराड यांचे बनावट ईन्स्टाग्राम तयार केले व त्या बनावट ईन्स्टाग्राम खात्यावरून मनोज जरांगे-पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.          याबाबत परळी पोलीसांनी प्रसिद्धीपत्रक काढले असुन या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, परळी नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) गटनेते  वाल्मीक आण्णा कराड यांच्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट ईन्स्टाग्राम आयडी तयार केला आहे.त्यावरुन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टवर भावपुर्ण श्रध्दांजली अशा प्रकारची प्रक्षोभक पोस्ट सोशल मिडीयावर प्रसारीत केली. त्यामुळे दोन समाजामध्ये शत्रुत्वाची, द्वेषाची भावना निर्माण करुन त्यांची बदनामी होण्याच्या उद्देशाने बनावट सोशल मिडीया अकाऊंट तयार करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने ईन्स्टाग्राम या समाज माध्यमावर प्रसारीत केली. म्हणुन  wa

पंकजाताई मुंडे यांचं कळकळीचे आवाहन

इमेज
  तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा - पंकजाताई मुंडे यांचं आवाहन अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा बीड ।दिनांक ०९। तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा..आई बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तरूणांना  केलं आहे.अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा अशा शब्दांत त्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे.    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काही ठिकाणी तर तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले तर अनेक गावात चुली पेटल्या नाहीत. या साऱ्या घटना कानावर आल्यानंतर पंकजाताई मुंडे प्रचंड व्यथित झाल्या आहेत. येस्तार (अहमदपूर) येथील सचिन कोंडीराम मुंडे या आत्महत्या केलेल्या तरूणाच्या नातेवाईकांश

बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग

इमेज
  बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग  परळी (प्रतिनिधी)  आपल्या बहीणीस चांगले नांदवा,मारहाण करु नका असे सांगण्यासाठी अहमदपुर तालुक्यातुन परळीत आलेल्या आई व मुलीला मारहाण करत मुलीचा विनयभंग केल्याची घटना परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी परिसरात घडली असुन याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी येथील विवाहीतेस सासरच्या मंडळीकडुन त्रास होत असल्याने अहमदपुर तालुक्यातील तिची बहीण व आई सासरच्या मंडळींना समजावुन सांगण्यासाठी दि.27 मे रोजी परळी येथे आल्या.माझ्या बहीणीला मारहाण करु नका,चांगले नांदवा असे म्हणताच आरोपी अजिज महेबुब सय्यद,सुलतानाबाबु सफियोद्दीन शेख,सीमरन इरफान शेख व अन्य एका महिलेने फिर्यादीची बहिण व आईला मारहाण केली.हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस बॅटने मारहाण करत विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी वरील आरोपींविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोह येलमटे हे करत आहेत