इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

पंकजाताई मुंडे यांची हळहळ

 आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान देणार मदतीचा हात



जीव देऊन भागणार नाही बाळांनो.. माझी शपथ आहे तुम्हाला, स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करून घेवू नका - पंकजाताई मुंडे यांची हळहळ


बीड ।दिनांक १३। 

लोकसभेत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने काही ठिकाणी तरूणांनी आत्महत्या केल्याच्या प्रकाराबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गंभीर चिंता व्यक्त करून हळहळ व्यक्त केली आहे. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, असा जीव देवून भागणार नाही बाळांनो..माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेऊ नका असं आवाहन पुन्हा एकदा त्यांनी केलं आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या तरूणांच्या  मुला बाळांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने घेतली असून लवकरच त्यांना मदत दिली जाणार आहे.


   नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पंकजाताई मुंडे यांचा अगदी थोडया मतांनी पराभव झाला पण हा पराभव सहन न झाल्याने काही ठिकाणी  तरूणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. मन सुन्न करणाऱ्या या घटनांनी पंकजाताई मुंडे यांनी तरूणांच्या कुटुंबीयांशी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या. घरातील तरूणांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने घेतली आहे, त्यांना प्रतिष्ठान मार्फत मदत दिली जाणार आहे.


*माझी शपथ आहे तुम्हाला, स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करून घेवू नका*

------

पंकजाताई मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर करून तरूणांना  आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या, काय बोलू, मी तुमच्या सगळ्यांशी हे कळत नाही. मी आवाहन केले, माझं आवाहन तुमच्या दुःखाच्या, नैराश्याच्या पलीकडे ते आवाहन पोहोचत नाही की काय, असं दिसत नाही. गेल्या काही दिवसांत ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या, या घटनांनी मी जेवढी खचले तेवढं कदाचित कोणी कोणी खचलं नसेल. मी अहमदपूरमधल्या त्या तरुणाच्या आईशी बोलले, ती माऊली म्हणाली की, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा तुमच्यावर खूप जीव होता. इतकं प्रेम याला मला शब्द सापडत नाहीत. कदाचित तुम्ही माझ्यावर अघोरी प्रेम करताय. प्रत्येकक्षणी एक-एक कर्ज माझ्यावर चढवत आहात.तुम्ही मला पाहिलंय, गेली २०-२२ वर्षात, मुंडे साहेबांसारख्या

पहाडासारख्या नेत्याला मी भावनिक होताना पाहिलं आहे, मी त्यांना आधार दिला. मी त्यांना आधार देण्याइतकी मोठी नाही. पण मी आधार द्यायचा भाव आणला, कारण त्यांना वाटायला नको की,आपल्याला मुलगी आहे आणि ती खूप कोमल आहे. नाही बाबा, मी

खूप कठीण आहे, कर्मठ आहे, मी तुमच्यासाठी लढायला मागे

हटणार नाही. ४ जूनला मुंडेसाहेब गेले तो दिवस आठवा, दगडं पडत होती सगळ्यांच्या डोक्यावर, पण मी धावत जाऊन माईक हातात

घेतला, जीवाची पर्वा केली नाही. कोणाचाही विचार केला नाही,विचार केला समाज चेंगरेल, अनेक जीव जातील, याचा केला. तेव्हा मी तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ दिली, ती शपथ तुम्ही पाळली. आता

जे काही झालं ते तुमच्या जीवाला लागलं आहे, पण तुम्ही असं जिव्हारी लावून घेणार असाल आणि अशा रस्त्यावर जाणार असाल तर, माझी शक्ती बनण्यापेक्षा असं पाऊल उचलणार असाल तर मला

राजकीय पाऊल उचलताना मला प्रश्न पडतो.माझ्या राजकारणात स्वार्थ नाही, माझं आजपर्यंतचं राजकारण उद्देशाचं होतं, जेव्हा पद मिळालं तेव्हा गरिबांसाठी काम केलं, नाही मिळालं तेव्हा ती गोष्ट हसतखेळत झेलली. हे राजकारण आहे, राजकारणात अशी वेळ येत असते. आतापर्यंतच्या इतिहासात थेटपणे एखाद्या व्यक्तीला, वर्णाला हीन लेखून प्रचार झाला नाही, ते तुमच्या जिव्हारी लागलं आहे, हे मला माहिती आहे. आपल्याला वंचितांचा आवाज बनायचं आहे, आपल्याला त्या सगळ्यांना ताकदी देणारी फौज बनायचं आहे. असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, मग मी कसं काम करु, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुमच्याकडे यायलेय, पण माझा पायच उचलत नाही, सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी येत आहे. कृपा करुन माझी शपथ आहे तुम्हाला, मी साहेबांची शपथ घालून पाहिली, पण स्वतःच्या जीवाला काही करुन घेऊ नका, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या