खोट्या पोस्ट करून समाजात विष पेरण्याचं काम करणाऱ्यांविरुद्ध सत्याच्या मार्गाने लढत राहू - वाल्मिक कराड

रा.काॅ.नेते वाल्मिक आण्णा कराड यांचा बनावट ईन्स्टाग्राम आयडी तयार केला : अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ,एमबी न्युज वृत्तसेवा...

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते वाल्मिक आण्णा कराड यांचे बनावट ईन्स्टाग्राम तयार केले व त्या बनावट ईन्स्टाग्राम खात्यावरून मनोज जरांगे-पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

         याबाबत परळी पोलीसांनी प्रसिद्धीपत्रक काढले असुन या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, परळी नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) गटनेते  वाल्मीक आण्णा कराड यांच्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट ईन्स्टाग्राम आयडी तयार केला आहे.त्यावरुन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टवर भावपुर्ण श्रध्दांजली अशा प्रकारची प्रक्षोभक पोस्ट सोशल मिडीयावर प्रसारीत केली. त्यामुळे दोन समाजामध्ये शत्रुत्वाची, द्वेषाची भावना निर्माण करुन त्यांची बदनामी होण्याच्या उद्देशाने बनावट सोशल मिडीया अकाऊंट तयार करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने ईन्स्टाग्राम या समाज माध्यमावर प्रसारीत केली. म्हणुन  walmik_karad_1717 अशी बनावट आयडी बनवुन वापरत असलेल्या वापरकर्त्याविरुध्द पोलीस स्टेशन परळी शहर येथे  गुन्हा रजि. नंबर 85/2024 कलम 505(2), 500 भादवी सह कलम 66 (क) IT Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा तपास पोलीस करीत आहेत.

  खोट्या पोस्ट करून समाजात विष पेरण्याचं काम करणाऱ्यांविरुद्ध सत्याच्या मार्गाने लढत राहू - वाल्मिक कराड

        माझ्या नावाने इन्स्टाग्राम या सोशल साईटवर अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार करून दोन समाजात तेढ व वितुष्ट निर्माण होईल अशा स्वरूपाची फेक पोस्ट व्हायरल करण्यात आली असून, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार हा कुणीतरी जाणीवपूर्वक व खोडसाळ वृत्तीने केवळ बदनामी व दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केला असल्याचे वाल्मिक कराड यांनी म्हटले आहे. दोन समाजात विष पेरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस योग्य कारवाई करतील असा आपल्याला विश्वास असून, अशा समाज कंटकांविरुद्ध सत्याच्या मार्गाने लढत राहू, असे वाल्मिक अण्णा कराड यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

      सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते की, कोणीही सोशल मिडीया वरुन सामाजिक सलोखा बिघडवणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करु नये तसेच कुठलीही अफवा पसरवु नये. अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारीत केल्यास संबंधीतांवर कडक कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असे बीड पोलीस दलातर्फे अवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार