खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना खासदारकीचे पहिले पत्र

खासदारकीचे पहिले पत्र : मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्या:खा.बजरंग सोनवणे यांचे राज्यपालांना पत्र 

केज (बीड) :- पाच दिवसापासून कुणबी मराठा समाजातील सर्व सगळ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना लाभ देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा देत नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपालांनी या आंदोलनाची तात्काळ दाखल घ्यावी यासंदर्भात पहिले पत्र दिले आहे. 

        राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे यांनी खासदारकीचे पहिले पत्र मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्याच्या संदर्भाने राज्यपालांच्या नावाने दिले आहे. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, मागील पाच दिवसा पासून मराठा संघर्षयोद्धा मनोज  जरांगे पाटील हे सर्व मराठ्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांचा लाभ द्यावा. या मागणीसाठी दि. ८ जून पासून मागील पाच दिवसा पासून उपोषणास बसले आहेत. दिवसें दिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. याची दखल  राज्यपालांनी घ्यावी.त्यांच्या मागण्या संदर्भात राज्य शासन उदासीन असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. हे पत्र त्यांनी राज्यपालांच्या नावाने ईमेलवर पाठविले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !