परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पंकजाताई मुंडे यांचं कळकळीचे आवाहन

 तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा - पंकजाताई मुंडे यांचं आवाहन


अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा


बीड ।दिनांक ०९।

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा..आई बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तरूणांना  केलं आहे.अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा अशा शब्दांत त्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे.


   नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काही ठिकाणी तर तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले तर अनेक गावात चुली पेटल्या नाहीत. या साऱ्या घटना कानावर आल्यानंतर पंकजाताई मुंडे प्रचंड व्यथित झाल्या आहेत. येस्तार (अहमदपूर) येथील सचिन कोंडीराम मुंडे या आत्महत्या केलेल्या तरूणाच्या नातेवाईकांशी काल रात्री त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.


   यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी तरूणाईला कळकळीचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही ...मी लढत आहे संयम ठेवत आहे तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा..कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी??मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे ... मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्हीही पचवा!! ..अंधाऱ्या रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा, प्लिज, प्लिज.. माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा... आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची...१५ जूनपासून मी आभार दौरा करत आहे.. तोपर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा असं आवाहन पंकजाताईंनी केलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!