परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परशुराम आर्थिक विकास महामंडळ १५ ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषण - दीपक रणनवरे

 परशुराम आर्थिक विकास महामंडळ १५ ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषण - दीपक रणनवरे 


नांदेड दिनांक 10 जून प्रतिनिधी....

      १५ ऑगस्टच्या अगोदर जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी १००० कोटीचा निधी देऊन कार्यरत झाले नाही तर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने पुन्हा दीपक रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करणार आहे.  महामंडळ कार्यरत झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. अशी माहिती ब्राह्मण संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिली आहे. 

        समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे यामधे १ सप्टेंबर २०१८ चे केज तहसीलसमोर धरणे , २८ आक्टोबर २०१८ रोजी केज ते बीड मोटार सायकल मोर्चा , २२ जानेवारी २०१९ चे आझाद मैदानावर धरणे आंदोलन यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील काही केले नाही , त्यानंतर ३ आॕगष्ट २०१९ ला औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन , त्यानंतर २२ जानेवारी २०२० रोजी बीड कलेक्टर आॕफीस समोर धरणे आंदोलन , त्यानंतर केज , बीड जिल्हा व मराठवाडा मधे अनेक ठिकाणी पळी ताम्हण वाजवून आंदोलन त्यानंतर सातत्याने अनेक ठिकाणी आंदोलन झाली , अंबाजोगाई येथील बैठकीत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला व २८ नोव्हेंबर रोजी गांधी चमन जालना येथे दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले जालन्याचे पालक मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेतले व दि १४ डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री अतुल सावे , छगन भुजबळ ,संदिपान भुमरे , संजय राठोड आमदार मनिषा कायंदे आमदार नारायण कुंचे आमदार नमिता मुंदडा यांच्यासह सर्व विभागाचे सचिव यांच्या उपस्थिती मध्ये मुख्यमंत्री महोदयानी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी इतिवृत्त तयार झाले यामधे ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुण असा उल्लेख करून इतिवृत्त तयार वास्तविक पाहता ब्राह्मण समाजातील गरजू ना लाभ मिळायला हवा परंतु तरुण आर्थिकदृष्ट्या मागास या शब्दाचा वापर करून शब्द.छल करत इतिवृत्त तयार केले.

        यावर संघर्ष समितीने हे दुरुस्त करून लवकर प्रस्ताव तयार करावा अशी मागणी केली परंतु त्यानंतर सरकारने संघर्ष समितीच्या व ब्राह्मण समाजाच्या मागणी अजिबात लक्ष दिले नाही. अजूनही परशुराम आर्थिक विकास महामंडळ तयार झाले नाही याचा अर्थ ब्राह्मण समाजाच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता दिसत आहे  तरी १५ आॕगष्ट पर्यत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून १००० कोटी चा निधी तात्काळ देऊन महामंडळ कार्यान्वित करावे अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती १५ आँगष्ट पासून आमरण उपोषण करेल असे संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक  दिपक रणनवरे धनंजय कुलकर्णी, श्रीकांत जोशी, विजयाताई कुलकर्णी इश्वर दिक्षित अँड राजेंद्र पोदार स्वप्नील केळकर , अशोक वाघ , उदय जोशी , ॲड भानुदास शौचे ,  शाम कुलकर्णी, महेश अकोलकर संतोष कुलकर्णी संजय देशपांडे मंदार कुलकर्णी स्वप्निल पिंगळे अनिल डोईफोडे सतीश ईडोळकर ॲड प्रज्ञा भिडे  यांनी सांगितले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!