पोलीसांची पेट्रोलिंग नावालाच; नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

चोरट्यांनी सिरसाळ्यात मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबवली;तीन ज्वेलर्ससह दोन खताची दुकानेही फोडली

परळी वै./प्रतिनिधी

      अज्ञात चोरट्यांनी रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत सिरसाळ्यात रात्रीतून ठिकठिकाणी धुडघूस घातला. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली. त्यानंतर तीन सोन्या-चांदीच्या दुकानांसह दोन खताची दुकानेही फोडली. दरम्यान एकाच रात्री चोरट्यांनी पाच ते सहा ठिकाणी चोरी केल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

           परळी तालुक्यातील सिरसाळा येथे अज्ञात चोरट्यांनी परमपुज्य गुरू वामनानंद महाराज जन्मभूमी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी लक्ष्मण कालिदास निर्मळ पाटील यांच्या लहुदास अॅग्रो सव्हींसेस या दुकानाचे शटर उचकटून तेथून काही बियाणांच्या बॅगा लंपास केल्या. यासह आणखी एका खताच्या दुकानातून माल लांबवला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा ज्वेलर्स दुकानांकडे वळविला. चोरट्यांनी वैद्यनाथ ज्वेलर्स, विठ्ठल ज्वेलर्स, गणेश ज्वेलर्स याठिकाणीही शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून तेथील काही ऐवज लंपास केला. या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान दानपेटी फोडतांनाचे चोरट्यांने सीसीटीव्ही फुटेज समोर आले असुन त्यामध्ये दोन चोरटे मंदिराच्या गेटसह दानपेटी फोडतांना दिसत आहेत. या प्रकाराने सिरसाळा आणि परिसरात भितीचे वातावरण पसरले असुन पोलीसांनी या प्रश्न लक्ष घालावे अशी मागणी होवू लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?