परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

BREAKING |सुनेत्रा पवार विधानभवनात पोहचल्या: राज्यसभेसाठी भरणार अर्ज

 सुनेत्रा पवार विधानभवनात पोहचल्या: राज्यसभेसाठी भरणार अर्ज



राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अखेर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत आमच्याकडून सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या जागेसाठी मी इच्छुक होतो, मात्र पक्षात सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
     राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, "या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे हेदेखील इच्छुक होते. मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याविषयी निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणं शक्य नव्हतं," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, "राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही, असं मला वाटतं," असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!