अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
आज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना परळी गंगाखेड रस्त्यावरील वडगाव दादाहरी नजीकच्या 33 के.वी.केंद्रासमोरील रस्त्यावर घडली आहे.
परळी गंगाखेड रस्त्यावर सध्या खोदकाम केलेले असून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून सध्या वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. याच रस्त्यावर काल रात्रीच्या सुमारास बालाजी रायभोळे रा.भीमवाडी, परळी वै.हे उखळी बु. या आपल्या सासरवाडीला जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. मोटारसायकलवरील बालाजी रायभोळे यांना जोराची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला व शरीराला जबर मारहाण झाली. या अपघातात त्यांचे निधन झाले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा