बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग

 बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग 

परळी (प्रतिनिधी)

 आपल्या बहीणीस चांगले नांदवा,मारहाण करु नका असे सांगण्यासाठी अहमदपुर तालुक्यातुन परळीत आलेल्या आई व मुलीला मारहाण करत मुलीचा विनयभंग केल्याची घटना परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी परिसरात घडली असुन याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 परळी येथील विवाहीतेस सासरच्या मंडळीकडुन त्रास होत असल्याने अहमदपुर तालुक्यातील तिची बहीण व आई सासरच्या मंडळींना समजावुन सांगण्यासाठी दि.27 मे रोजी परळी येथे आल्या.माझ्या बहीणीला मारहाण करु नका,चांगले नांदवा असे म्हणताच आरोपी अजिज महेबुब सय्यद,सुलतानाबाबु सफियोद्दीन शेख,सीमरन इरफान शेख व अन्य एका महिलेने फिर्यादीची बहिण व आईला मारहाण केली.हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस बॅटने मारहाण करत विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी वरील आरोपींविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोह येलमटे हे करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार