
महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सह पतसंस्थेस मार्च २०२५ अखेरपर्यंत रुपये तीन लक्ष एवढा निव्वळ नफा अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :- अंबाजोगाई पंचक्रोशीतील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या उदात्त हेतूने केवळ महिलांनी महिलांसाठी नऊ वर्षा पूर्वी सुरू करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत रुपये ३ लक्ष एवढा नफा झाल्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ . सुनीता राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. .आपला भारत देश हा पुरुष प्रधान देश आहे . या देशात महिलांना जरी दुय्यम स्थान देण्यात आले असले तरीही आजची महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करणाऱ्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नेहमी घर, चूल आणि मूल यामध्येच गुरफटून पडलेल्या महिलांना काही प्रमाणात आर्थिक स्वायत्तता मिळवून देण्यासाठी व महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्याचा फायदा कुटुंबाला व्हावा याच पवित्र हेतूने केवळ महिलांसाठीच राजकिश...