एक हजार सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान

कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे कधीच वाटलं नाही मी एकटी आहे जालन्यात ना. पंकजा मुंडे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद एक हजार सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा केला सन्मान शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानीही दिली भेट जालना ।दिनांक ०१। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जाण्यानंतर जबाबदारी वाढली, यात काम करत असतांना कार्यकर्त्यांचे एवढे प्रेम मिळाले की कधीच वाटलं नाही मी एकटी आहे, त्यामुळे माझ्यात आणि कार्यकर्त्यांत कधीच अंतर पडू देणार नाही असे भावोदगार राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे काढले. ना. पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील भाजप संपर्क कार्यालयास भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. संतोष दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भास्कर दानवे, सुनील आर्दड, अवधूत खडके आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, सर्व तालुक्याचे मंडलाध्यक्ष यावेळी उपस्थित होते. जिल्हयाच्या पालकमंत्री झाल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यां...