धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया....

अजितदादा बीडचे पालकमंत्री: धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया काय? परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आज जाहीर करण्यात आले यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले आहे. अजित दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळेल असा आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांचे नेमके ट्विट काय आहे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः ब...