पोस्ट्स

फेब्रुवारी २३, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना (लाल बावटा) च्या वतीने संघटनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर दि. 24 फेब्रुवारी रोजी आर्य समाज मंदिर येथे  घेण्यात आले.     बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आरोग्य तपासणी पथकाने 220 बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी केली व त्यांना कार्ड वाटप केले. तपासणी शिबीरत कामगारांचे रक्त तपासणीसाठी घेतले जाते व आठ दिवसानंतर रिपोर्टसह गोळ्या औषध दिले जाते. कामगारांस पुढील उपचारासाठी परळीत कराड हास्पिटलची निवड केलेली आहे. बीड मध्ये तीन अद्ययावत हाॅस्पिटलची निवड केलेली आहे. आरोग्य तपासणी शिबिरात कामगारांच्या लिव्हर  तपासणी अत्याधुनिक उपकरणा द्वारे केली.आरोग्य पथकात डॉ. मनीषा महाजन, ब्रदर शरद परके, व सिस्टर रोहिणी चिंचनकर  सहह इतर सहा कर्मचारीवर्ग  सहभागी झाला. आरोग्य तपासणी शिबीर सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरु होते. शिबीरात उपस्थित बांधकाम कामगारांना नाष्ट्याची व्यवस्थ...
इमेज
  अंबाजोगाई कृषी तंत्र विद्यालयातील वसतिगृहांसाठी तीस कोटींचा निधी आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश अंबाजोगाई – (वसुदेव शिंदे); अंबाजोगाई येथील कृषि तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह इमारतींसाठी तब्बल तीस कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी दोन कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषि तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांन निवासासाठी चांगली इमारत असावी यासाठी आ. नमिता मुंदडा प्रयत्नशील होत्या. वसतिगृह इमारती बांधण्याकरिता निधी मिळविण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांचा सातत्यपूर्ण आग्रह आणि पत्रव्यवहार लक्षात घेऊन शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह इमारतींसाठी प्रत्येकी १४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. यापैकी प्रत्येकी एक कोटी असा एकूण दोन ...
इमेज
ताल मार्तंड प्रकाश बोरगांवकर यांची पर्यावरण दूत " म्हणून निवड अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे)...        तालमार्तंड श्री प्रकाशजी बोरगावकर यांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली.          राज्य शासनाद्वारे पृथ्वी,जल,तेज,वायू आणि आकाश यावर आधारित पर्यावरण संरक्षण करीत 'माझी वसुंधरा अभियान ५.० ची सुरवात केलेली असून श्री प्रकाशजी बोरगावकर हे स्वतः, परिवारातील सदस्य,मित्र,नातेवाईक यांना सोबत घेऊन स्वच्छतेसोबतच निसर्ग बचाव,पर्यावरण, वृक्षारोपण असे अनेक असामान्य कार्य करतात.       त्यांच्या विविध घटकातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व स्वच्छते आणि स्वयं मदतीने केलेल्या अतुलनीय कार्याची व्याप्ती पाहता माझी वसुंधरा अभियान ५.० अंतंर्गत अंबाजोगाई शहरातील नागरिकांमध्ये व्यापक व्यक्तिगत स्वछता, नदी स्वछता,श्रमदान कचरा विलीगिकरण घरोघरी ओल्या कचऱ्यापासून कम्पोस्ट खत बनवणे,वृक्ष लागवड व संगोपन,नवी करनिय ऊर्जा स्तोत्रांचा वापर करणे, पाण्याची बचत,पर्यावरण संतुलन व संवर्धन आदी बाबत जनजागृती करिता अंबाजोगाई नगरपरिषद मार्फत "पर्यावरण दूत"म्हणून निवड...

आजारी तरीही कामावर.!!!

इमेज
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील इष्टांक वाढीसंदर्भात धनंजय मुंडे यांनी घेतला जिल्हानिहाय आढावा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचा मंत्री मुंडेंनी घेतला सविस्तर आढावा बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीबाबत ही घेतली सर्वंकष माहिती मुंबई (प्रतिनिधी) - राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे होणार असून या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात विभागाचा जिल्हा निहाय आढावा घेतला.  अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील विविध जिल्ह्यात इष्टांक वाढवणे, ई पॉस मशीन सह सर्व अन्य समस्या याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या.  विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे तसेच ज्या जिल्ह्याने इष्टांक पूर्ती केली आहे त्यांना वाढीव मागणी असल्यास इष्टांक देण्यासंदर्भात तसेच ईष्टाकाची पूर्ती न केलेल्या जिल्ह्यातील उर्वरित इष्टांक हा अन्य आवश्यकता असलेल्या ठिकाणी हस्तांतरित करण्याबाबत...
इमेज
मायेचा ओलावा:नागनाथ (नाना) बडे यांचे पक्ष्यांसाठी पाणवठे उन्हाळ्याच्या रखरखत्या दिवसांत, जेव्हा सूर्य आग ओकत असतो, तेव्हा नागनाथ (नाना) बडे मायेची सावली धरून उभे असतात. ज्येष्ठ साहित्यिक, माजी केंद्रप्रमुख आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले नागनाथ बडे (नाना), पशु-पक्ष्यांच्या हृदयात आदराने कोरले गेलेले नाव आहे. उन्हाच्या तडाख्यात जेव्हा धरणीमाताही कोरडी पडते, तेव्हा नाना आपल्या हातांनी पाणवठे तयार करतात. तहानलेल्या जिवांना पाणी पाजतात आणि त्यांच्यात नवं चैतन्य निर्माण करतात. नानांच्या पाणवठ्याजवळ एक लहानगं चितर पक्षाचं पिल्लू तहानेने व्याकुळ होऊन पडलेलं दिसलं. नानांनी त्याला आपल्या हातांनी उचललं, पाणी पाजलं आणि त्याच्या पंखात पुन्हा बळ भरलं. त्या लहानग्या जीवात जेव्हा पुन्हा शक्ती आली, तेव्हा ते आनंदाने उडून गेलं. हे दृश्य पाहताना निसर्ग आणि माणूस यांचं नातं किती घट्ट आहे, याची प्रचिती येते. नानांसारखे लोक जेव्हा निसर्गाची काळजी घेतात, तेव्हा ते केवळ पशु-पक्ष्यांनाच नाही, तर आपल्या सर्वांना जगण्याचा खरा अर्थ शिकवतात. आजच्या जगात जिथे माणूस स्वार्थात बुडाला आहे, तिथे नानांसारखे लोक माणु...
इमेज
पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचा आज सायंकाळी पालखी सोहळा; नगर प्रदक्षिणेत प्रभू वैद्यनाथाच्या स्वागतासाठी गावभागात उत्साह  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभु वैद्यनाथाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे महाशिवरात्रीचा पर्वकाळ असतो. या अनुषंगाने महाशिवरात्रीच्या पर्व काळातील प्रमुख व समारोपाचा उत्सव म्हणजे पालखी सोहळा असतो. आज दि. 28 रोजी सायंकाळी सहा वाजता पारंपारिक पद्धतीने प्रभु वैद्यनाथाचे पालखी सोहळ्याचे मंदिरातून प्रस्थान होईल. मंदिरातून पालखी सोहळा निघाल्यानंतर वैद्यनाथ गल्ली- देशमुखपार येथे विसावा होईल. या ठिकाणी लोक कलावंतांची हजेरी या पारंपारिक कार्यक्रमांतर्गत पुणे येथील प्रसिद्ध गायिका चैत्राली अभ्यंकर यांचे भावगीत व भक्तीगीत गायन सादरीकरण कार्यक्रम होईल.          या कार्यक्रमानंतर देशमुख पारापासून प्रभू वैद्यनाथचा पालखी सोहळा गाव भागाकडे मार्गस्थ होईल. देशमुखपार ते अंबेवेस  दरम्यान सरस्वती चौक येथे पारंपारिक पद्धतीने शोभेची दारू उडवून पालखी सोहळ्याचा पार...

या माजी सैनिकाने माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या गाडीवर पाच वर्षे चालक म्हणून केली होती सेवा

इमेज
वयोवृद्ध माजी सैनिकाला परळीच्या बस स्टँडवर'गुलीगत धोका': गावचा ग्रामसेवक असल्याचे भासवून केली फसवणूक परळी वैजनाथ दि.२७ (प्रतिनिधी)          परळीत सध्या वेगवेगळ्या बतावण्या करुन लुटमार व फसवणूक करण्याचे बरेच प्रकार घडतांना दिसत आहेत. असाच एक प्रकार एका वयोवृद्ध  माजी सैनिकाबरोबर घडला. परळीच्या बसस्थानकात प्रवासासाठी निघालेल्या पती पत्नीला काही कळण्याआधीच त्यांची रोख रक्कम ४ हजार फसवणूक करुन लुटून नेण्यात आली.फसवणूक करणारा, त्याच्या बतावणीला बळी पडलेलं हे जोडपं आणि घडलेला प्रसंग व झालेली फसवणूक एखाद्या '४२०' चित्रपटाच्या कथेपेक्षाही कल्पक दिसुन येते.         परळी वैजनाथ बसस्थानकात गुरुवारी (दि.२७) सकाळी ८ च्या दरम्यान घडलेली ही कथानक वाटावी पण प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. नागदरा (ता.अंबाजोगाई) येथील वयोवृद्ध माजी सैनिक अंकुश नागरगोजे (वय ६५) हे त्यांची पत्नी मिना नागरगोजे यांच्यासह आपल्या मुलीला भेटण्यासाठी माणगाव जिल्हा रायगड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्थानकात थांबले. बसची वाट बघत असतांना एक अनोळखी ...
इमेज
  शिवजयंती उत्सव:जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर परळी वैजनाथ – जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समिती, परळी वैजनाथ यांच्या वतीने यावर्षीही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या समितीचे मार्गदर्शक श्री. अभयकुमार ठक्कर (माजी नगराध्यक्ष, परळी वैजनाथ) आणि प्रा. श्री.अतुल दुबे (जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, परळी वैजनाथ) यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या अध्यक्षस्थानी श्री. मोहन परदेशी तर कार्याध्यक्ष म्हणून श्री. बबन ढेंबरे जबाबदारी सांभाळणार आहेत. समितीमध्ये उपाध्यक्षपदी लक्ष्मण मुंडे, योगेश जाधव, माऊली मुंडे, तर सचिवपदी मनीष जोशी यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सहसचिवपदी प्रकाश देवकर, नवनाथ वरवटकर, कोषाध्यक्षपदी जगदीश कावरे , सह कोषाध्यक्ष  म्हणून सोमनाथ गायकवाड, योगेश घेवारे संघटक सिद्धार्थ गायकवाड , सहसंघटक ओम धोत्रे , संस्कार पालीमकर , प्रसिद्धी प्रमुख सचिन लोढा सहप्रसिद्धीप्रमुख अमित कचरे यांची निवड करण्यात आली तर सल्लागार म्हणून माजी नगरसेवक रमेश चौंडे, सतीश जगताप, संजय कुकडे, ...

वडखेल येथे १ मार्चची 'शाम' होणार 'सुंदर' : 'सोन्नर' कुटुंबांचा होणार गौरव

इमेज
वडखेलच्या एकाच कुटुंबातील तिनही भावंडं बनले अधिकारी ! ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन   परळी-वैद्यनाथ (प्रतिनिधी) : वडखेल येथील शेतकरी कांताबाई शामसुंदर सोन्नर यांची तीन मुलं वेगवेगळ्या अस्थापनामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी झाले आहेत. हे तिन्ही अधिकारी आणि त्यांना घडविणारी आई कांताबाई शामसुंदर सोन्नर यांचा सत्कार वडखेल ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे. याच सोहळ्यात निवृत्त नायब तहसीलदार बी. एल.रुपनर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. वडखेल येथील मुख्य चौकात 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान सरपंच भारतबाई व्यंकटराव देवकते या भूषविणार आहेत.  तर यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश चव्हाण, माजी शासकीय अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, भाजप युवा मोर्चा बीड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, युवा नेते, शासकीय अधिकारी रत्नाकर देवकते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भटकेविमुक्त परळी तालुका अध्यक्ष गणेश देवकते, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष माऊली महाराज आगलावे, युवा नेते गोविंदराव देवकते, माजी सरपंच अंगद गंगणे, सूर्यकांत देवकते, ज्येष्ठ ...
इमेज
  महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश ना  पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने पर्यावरण विभागाने घेतला निर्णय शेतीपूरक ई-वाहनामुळे शेतकऱ्यांना होणार लाभ मुंबई, ।दिनांक २७। राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले होते. मात्र, सुरुवातीला या धोरणात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश नव्हता. त्यावर विचार करून, मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनांचा समावेश धोरणात केला आहे. यासंबंधीच्या शासन निर्णयाचे शु...

१० ते १२ हजार मजुरांवर बेरोजगार होण्याचा धोका !

इमेज
१० ते १२ हजार मजुरांवर बेरोजगार होण्याचा धोका ! आम्हाला राख मोफत द्या अन्यथा ५ मार्च पासून उपोषण-वीटभट्टी चालक व मजूरांचा इशारा परळी वैजनाथ  प्रतिनिधी...        सध्या संपूर्ण राज्यामध्ये परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचा राखचा विषय जोरदार चर्चेत असतानाच या राखेवर  आधारित परळी व परिसरातील अनेक व्यवसायांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचेही एक वास्तव आहे.या राखे मधून चालणारे छोटे छोटे उद्योग व व्यावसायिक अडचणीत आले आहेत.परळी व परिसरात चालवल्या जाणाऱ्या वीट भट्टी चालकांसह या वीटभट्ट्यांवर काम करणारे जवळपास दहा ते बारा हजार मजूर बेरोजगार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे उद्योग व व्यवसाय वाचविण्यासाठी केंद्र शासनाच्या सन २००२ च्या धोरणानुसार वीटभट्टी धारकांना मोफत राख द्यावी अशी मागणी आता पुढे आली आहे.       परळी व परिसरात मोठ्या प्रमाणावर वीट उद्योग आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार या भागात निर्माण झालेला आहे.वीट उद्योगासाठी औष्णिक विद्युत केंद्रातील राख अत्यंत उपयुक्त असल्याने दर्जेदार वीट बनते. त्यामुळे परळीच्या वीटेला महाराष्...
इमेज
  रंगकर्मींचे विद्यापीठ गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे सरांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र वंदन..!! आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे सरांचं असणं आमच्यासाठी लाखमोलाचं होतं..!निष्ठावान प्राध्यापक कसा असावा आणि त्या पेशाला पूर्णत्वाने कसे वाहून घ्यावे, हे जर का कुणाला शिकावयाचे असेल तर त्यांनी आमचे आदरणीय  गुरुवर्य स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या जीवनकार्यावरून शिकावे. सरांचे, मार्गदर्शन आम्हांस लाभले हा आनंद शब्दातीत आहे.अनेक पिढ्यांवर उत्तम संस्कार करून त्यांचे आयुष्य घडविणाऱ्या  प्रा.केशवराव देशपांडे सरांना 'रंगकर्मींचे विद्यापीठ'असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलेले प्रा. केशव देशपांडे प्रारंभी ( १९७४) योगेश्वरी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक होते. त्यानंतर योगेश्वरी संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख झाले. त्यांनी आपल्या कार्यकालात अनेक विद्यार्थी घडवले. याबरोबरच त्यांनी अंबाजोगाईची नाट्यचळवळ वृध्दींगत करण्याचे काम केल...

रुद्राभिषेक का केला जातो?

इमेज
महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते  पारंपारिक पद्धतीने विधीवत रुद्राभिषेक             बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे सध्या महाशिवरात्री पर्व सुरू आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला.           बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वैद्यनाथ देवस्थान च्या वतीने पारंपारिक पद्धतीने उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत वैद्यनाथ प्रभूंचे पारंपारिक उत्सव होणार आहेत. रुद्राभिषेक का केला जातो?       ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रुपात शिवलिंगात प्रगट झाले आहेत. ज्योतिर्लिंग याचा अर्थ आत्मज्योत असा आहे. ही उपासनेसाठी आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजे लिंगावर रुद्राभिषेक करणे....

यंदा दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी !

इमेज
ओम नम: शिवायच्या जयघोषात वैद्यनाथनगरी दुमदुमली : महाशिवरात्र पर्वकाळात वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी परळी वैजनाथ,प्रतिनिधी:        येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची काल (२५)मध्यरात्रीपासूनच विक्रमी गर्दी पहायला मिळाली.हर हर महादेव! प्रभू वैद्यनाथ महाराज की जय! अशा जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमून गेला. देशाच्या कानाकोपऱ्यातून व  महाराष्ट्र राज्य, परराज्यासह ग्रामीण भागातील भाविकांनी महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला. मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत सुमारे पाच लाखाच्यावर भाविकांनी वैद्यनाथप्रभुंचे दर्शन घेतले. महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान व पोलीस प्रशासनाने नेहमीप्रमाणेच अत्यंत चांगली सुविधा देण्यासोबतच पोलीसांनी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.        महाशिवराञीच्या महापर्व काळात लाखो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गुजरात, मध्य प्रदेश येथील  भाविक परळीत मोठ्या प्रमाणात दाखल झाले. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्...

Mahashivratri 2025: महाशिवरात्र पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. !!!!

इमेज
महाशिवरात्र पर्व : परळीत पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात नयनरम्य पुष्पसजावट ! परळी वैजनाथ, ..         महाशिवरात्र पर्वानिमित्त मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिर विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.            महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे अनन्य साधारण महत्व आहे.महाशिवरात्र पर्वकाळात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. आज(दि.२५) मध्यरात्रीनंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. रात्री ९ वा.पासूनच दर्शन रांगामध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले आहेत. महाशिवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील 7 क्विंटल फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.  सुटसुटीत दर्शन व्यवस्था       ...

उर्मिला फुलचंद मुंडे यांचे दुःखद निधन

इमेज
  कन्हेरवाडी येथील राशन दुकानदार संजय मुंडे यांना मातृशोक उर्मिला फुलचंद मुंडे यांचे दुःखद निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कन्हेरवाडी येथील राशन दुकानदार संजय फुलचंद मुंडे यांच्या मातोश्री उर्मिला फुलचंद मुंडे यांचे दिर्घ आजाराने पुणे येथे आज दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्ष होते.       श्रीमती उर्मिला मुंडे या धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर पुणे येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दि. 25 फेब्रुवारी रोजी कन्हेरवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील गावकरी, नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते        कै. उर्मिला मुंडे यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कै. उर्मिला मुंडे या अंबेजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती माधवराव गणपतराव मुंडे यांच्या भावजयी तर परळीचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांच्या...

काय काळजी घ्यावी ?

इमेज
महाशिवरात्र पर्व:   उपवास करणारांची मोठ्या प्रमाणावर संख्या:मात्र उपवासासाठी घ्या 'ही' काळजी ! उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना महाराष्ट्रात निदर्शनास येत आहेत.        भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस (Aspergillus) प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन (Fumigaclavine) यासारखी विषद्रव्ये (Toxins) तयार होतात. ऑक्टोंबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी प्रादुर्भाव भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. भगर खाताना काय काळजी घ्यावी. 1) बाजारातुन भगर आणल्यानंतर ती निवडुन स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीट बंद भगर घ्या. बँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली पाकीटे व सुटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग व अंतिम दिनांक तपासा. 2) भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी व्यवस्थीत झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. तसेच जास्त दिवस भगर साठवू नका व जास्त दिवस साठवल...
इमेज
नेत्रदान ही काळाची गरज :प्रा. डॉ. एकनाथ शेळके यांचे प्रतिपादन आंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-     नेत्रदान ही काळाची गरज असून भारतात नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण अत्यल्प आहे. यात मारवाडी, गुजराती व जैन समाजात नेत्र दान करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण अधिक आहे. या साठीच जनजागृती ही आवश्यक असून एक व्यक्तीने नेत्र दान केले तर तो दोन व्यक्तीला जग दाखवू शकतो असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील स्वा रा ती रुग्णालयाच्या नेत्र रोग विभागाचे प्रा डॉ एकनाथ शेळके यांनी केले.       अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना व गृह विज्ञान विभागाच्या वतीने दहा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या "चॉकलेट मेकिंग व पॅकेजिंग सर्टिफिकेट कोर्स" च्या समारोप प्रसंगी नामांकित नेतृरोगतज्ञ डॉ एकनाथ शेळके हे बोलत होते.      या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रीती पोहेकर, उप प्राचार्य डॉ दीपक फुलारी, कार्यक्रम अधिकारी डॉ मानीत कुमार वाकळे, डॉ नागेश यमगीर, डॉ प्रतीक मसारे यांची उपस्थिती होती.      "*नेत्रदान एक वरद...

वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगले

इमेज
  महाशिवरात्र पर्व:पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे नयनरम्य विद्युत रोषणाई वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगले परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे महाशिवरात्र पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते.तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक महाशिवरात्र पर्वावर प्रभु वैद्यनाथ दर्शनासाठी दाखल होत असतात. या अनुषंगानेच परळीत सध्या महाशिवरात्र पर्वाची जोरदार तयारी करण्यात आली असुन वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगले आहे.         धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मंदिर व परिसरात वेगवेगळ्या सजावटी करण्यात येत आहेत. दरवर्षीच विद्युत रोषणाई व नेत्र दीपक फुलांची सजावट करण्यात येते. संपूर्ण मंदिर परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असुन वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगांच्या विद्युत रोषणाईने झगमगित झालेला आहे.  बदलत्या रंगछटांनी मंदिराला क्षणाक्षणाला रंगीबेरंगी स्वरूप आल्या...

कॅबिनेटची मंजूरी अन् तरतूद

इमेज
ना.पंकजा मुंडे यांचे परळीला नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट ; पशुवैद्यकीय महाविद्यालयास मिळाली कॅबिनेटची मंजूरी ५६४ कोटी ५८ लाख रूपयांच्या तरतूदीस राज्य सरकारची मान्यता मुंबई।दिनांक २५। राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदारसंघाला महाशिवरात्री व नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट दिलं आहे. परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिला असून यासाठी ५६४ कोटी ५८ लाख रूपयांच्या तरतूदीस  मंजूरी दिली आहे.   ना. पंकजाताई मुंडे पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी  जिल्ह्यात परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आपल्या विकासाभिमुख कामाची चुणूक दाखवून दिली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या टीमने ९ फेब्रुवारी रोजी परळी शहरातील मेरू पर्वतावर आणि लोणी येथे यासाठी जागेची पाहणी केली होती व तसा अहवाल शासनाकडे सादर केला होता. महाविद्यालय स्थापन होण्याकरिता लागणाऱ्या मुलभूत सोयी सुविधा, पाण्याची उपलब्धता तसेच इतर आवश्यक बाबी या दोन...

15 वर्षापासून घेतली जाते परिक्षा..

इमेज
वसंतराव नाईक विद्यालय आयोजित PTNTS परीक्षा उत्साहात  तालुक्यातील तब्बल 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग : 15 वर्षापासून घेतली जाते परिक्षा पाटोदा /अमोल जोशी....           शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित पाटोदा तालुका नवानिर्माण प्रज्ञाशोध PTNTS परीक्षेचा उद्घाटन सोहळा शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .   गत पंधरा वर्षापासून पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन वसंतराव नाईक विद्यालयात केले जात आहे आज झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी रत्नाकर जायभाय हे होते तर प्रमुख पाहुणे नगरसेवक नय्युम पठाण ,नगरसेवक महादेव जाधव पत्रकार इद्रीस चाऊस पत्रकार महेश बेंद्रे, हमीद  पठाण, विजय जाधव ,शेख जावेद  , सचिन गायकवाड,पाटोदा शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख श्रीहरी येवले शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेचे भीती नाहीशी होऊन स्पर्धा परीक्षेला सक्षमपनाने सामोरे जाण्यासाठी व भविष्यात यशस्वी होण्यासा...
इमेज
महाशिवरात्रीपुर्वी परळी पोलीसांची मोठी कारवाई: वाहतूक होणाऱ्या अैवध दारुसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत  परळी वैजनाथ:प्रतिनिधी.....       परळी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली असुन शहरातून वाहतूक होणारी अवैध दारू एका वाहनासह पकडण्यात आली आहे.या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.     परळीत सध्या महाशिवरात्र पर्वाची जोरदार तयारी आहे.उद्या दि.२६ रोजी महाशिवरात्र मुख्य पर्वाचा दिवस आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी  देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक परळीत दाखल होत असतात.या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अवघ्या एका दिवसावर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या अनुषंगाने पोलीस आणि प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क झाले असुन परळी शहर पोलिसांनी आझाद चौकात वाहतूक होणारी लाखोंची अवैध दारू पकडली आहे. अंबाजोगाई कडून परळी कडे येत असताना आझाद चौकात परळी शहर पोलीसांनी  एमएच २४ इ 65 80 या गाडीमधून मॅकडॉल, ओसी आदी तीन प्रकारच्या अवैध दारूचा साठा पकडला. या मोठ्या कारवाईत वाहनासह एकूण चार लाख 14 हजार 332 रु...

Mahashivratri 2025 : १२ ज्योतिर्लिंगमधील पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, जाणून घ्या त्याचे धार्मिक महत्त्व

इमेज
केवळ स्पर्शदर्शनाने होते आरोग्यदायी फलश्रुती: अमृत व धन्वंतरी एकरुप असलेले एकमेव ज्योतिर्लिंग श्री.वैद्यनाथ ✍️ -भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर ----------------------------------------------- सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम् । सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे । हिमालये तु केदारम् घृष्णेश्च च शिवालये ॥३॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः । सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥     आ द्य शंकराचार्यांनी रचना केलेले हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. या स्तोत्रात स्पष्टपणे 'परल्यां वैद्यनाथंच' असा परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर स्वतः आद्य शंकराचार्यांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा केली होती. या यात्रेदरम्यानही ज्योतिर्लिंग म्हणून आद्य शंकराचार्य हे परळी वैजनाथ येथे दर्शन घेऊन, भेट देऊन गेल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. आद्य शंकराचार्य परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आल्याची नोंद श्रृंगेरी य...

कला आणि समाजप्रबोधनाचा संगम हरवला !

इमेज
भावपूर्ण आदरांजली:भीम ललकारी देणारे शाहीर प्रभाकर पोखरीकर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात आपल्या लेखणीतून आणि वाणीतून क्रांती घडवणारे ज्येष्ठ गीतकार, संगीतकार, समाजप्रबोधनकार आणि आंबेडकरी चळवळीतील आधारस्तंभ प्रभाकर पोखरीकर (दादा) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान कलावंत आणि प्रखर प्रबोधनकार गमावला आहे. कला आणि समाजप्रबोधनाचा संगम:- विविध कलेच्या माध्यमातून कलाकारांनी आंबेडकरी विचार चळवळ तळागाळात पोहोचविण्याचे काम केले आहे. भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच जनजागृतीचे आणि प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे महान कार्य केले. ते केवळ कवी-गायक नव्हते, तर एक प्रखर समाजसुधारक आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या कविता आणि गाण्यांमधून त्यांनी सामाजिक विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धा यांवर जोरदार प्रहार केला. त्यांनी आपल्या कलेचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता, समाजप्रबोधनासाठी केला. ज्येष्ठ गीतकार प्रभाकर पोखरीकर यांच्या कविता आणि गाण्यांमध्ये समाजातील दुर्बल घटकांच्या वेदना आणि व्यथांना वाचा फो...