इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावरील वाहनांमुळे रुग्णवाहिकेस अडथळा -अश्विन मोगरकर 

परळी वैजनाथ...

    उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या कार, ऑटोरिक्षा मुळे रुग्णाला घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेलाच आत जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने गंभीर रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. बेजबाबदार वाहनचालक व गायब असलेले वाहतूक पोलीस यासाठी जबाबदार ठरवण्यात यावेत व त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची कायम गर्दी असते.  जवळच स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस असल्याने या परिसरात कायम गर्दी असते. बँकेत, पोस्टात जाणारे अनेक ग्राहक रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन लावत असतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी झाली आहे. बुधवार दि 9 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास एक रुग्णवाहिका रुग्णास घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आलेली असताना रुग्णालयात जाण्याच्या वाटेत एक कार व ऑटोरिक्षा उभी असल्याने रुग्णवाहिकेस दवाखान्यात लवकर जाता आले नाही. उपस्थित नागरिकांनी रिक्षा बाजूला करून रुग्णवाहिकेस आत जाण्यास वाट करून दिली. 

उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात कायम वाहने उभी रहात असल्याने गंभीर रुग्णाच्या बाबतीत वाईट घटना घडण्याची शक्यता आहे. या रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होत असते. या महत्वाच्या रोडवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी होत असते. शहरातील या महत्वाच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी व बेजबाबदार पणे वाहने रस्त्यावर लावणाऱ्या वाहनचालकांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या