स्कॉलर केजी स्कूलचे दशकपूर्ती वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात!

लाईक आणि लव्ह यातला फरक अतिशय महत्वाचा -साहित्यिक प्रभाकर साळेगावकर परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... लाईक आणि लव्ह यातला फरक अतिशय महत्वाचा असतो, जे तुम्हाला आवडते ते तुम्ही तोडूनही घेऊ शकता पण ज्याच्यावर तुमचे प्रेम असते त्याची तुम्ही काळजी करता, निगा राखता, स्कॉलर केजी स्कूलने जाणीवपूर्वक निवडलेले स्वतःचे ब्रीद वाक्य "वी टीच वुईथ लव्ह" हे शाळेचे वातावरण आणि या शाळेतील शिक्षकांचा विद्यार्थ्यांप्रती असलेला व्यवहार सांगते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक श्री प्रभाकर साळेगावकर यांनी स्कॉलर केजी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी काढले. श्री साळेगावकर यांनी आपल्या बाल कवितांच्या काही ओळीही इथे सादर केल्या आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. स्कॉलर केजी स्कूलचा दशकपूर्ती वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा लोकनेते नटराज रंगमंदिर सभागृहात गुरुवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रभाकर साळेगावकर, प्रसिद्ध गझलकार श्री प्रा डॉ मुकुंद राजपंखे, शनैश्चर अर्बन निधीची अध्यक्ष श्री वैजनाथ बेंडे तर अध्यक्षस्थानी श्री भीमाशंकर फुटके गुरुजी यांची उपस्थिती होती....