पोस्ट्स

जानेवारी १९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्कार: प.पु. गणेश्वर द्रविड शास्त्री पद्मश्री नवी दिल्ली (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील गणेशशास्त्री द्रविड त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार मि...

भीमनगरात आला आरतीच्या रूपाने पहिला लाल दिवा !

इमेज
  परळीच्या शिरपेचात राज्य सेवेचा मानाचा तुरा:हमालाची पोरगी राज्य अधिकारी! भीमनगरात आला आरतीच्या रूपाने पहिला लाल दिवा! परळी प्रतिनिधी :- परळी शहरातील अतिशय सामान्य कुटूंबातील मुलगी आरती बोकरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2023 दिली होती त्याचा निकाल नुकताच जाहिर झाला असून आरतीने त्या परीक्षेत यशस्वी गरुड झेप घेतली असून ती आता अन्न औषध या विभागात काम करणार असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे  आरती बोकरे ही परळी शहरातील भीमनगर मधील अतिशय सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील एक खाजगी दुकानात हमाल म्हणून काम करतात तर तिची आई ही महापारेषण वीज पुरवठा केंद्रात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते आशा परिस्थितीत तिने कोणत्याही प्रकारची क्लास ना कोणाचे मार्गदर्शन घेतले नाही फक्त आई वडील आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द मनाशी बाळगून अतिशय कष्टने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देण्याचं स्वप्न मनात ठेवून त्यावर मेहनत घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत होणाऱ्या परिक्षा 2023 वर्षात दिली आणि त्याचा निकाल आता नुकताच लागला असून तिने कुटूंबाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे तिने लोकस...
इमेज
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, उल्लेखनिय काम करणाऱ्या 3 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारनं आज पद्म पुसरस्करांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातअनोखे काम करणाऱ्यांच्या पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे या...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारत निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी 2025 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. नव्याने नोंदणी झालेल्या 18 वर्षाच्या वयोगटातील मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग करून घेणे. लोकशाही प्रक्रियेतील मतदान जनजागृती  हा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून  मतदारांसाठीची प्रतिज्ञा  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. ए आर चव्हाण  यांनी सर्व प्राध्यापकांसमवेत दिली. हा कार्यक्रम परळी तहसीलमार्फत घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ. ए आर चव्हाण, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.पी एल कराड, उपप्राचार्य, डॉ.व्ही बी गायकवाड, प्रा. डी के आंधळे, प्रा. हरीश मुंडे, समन्वयक प्रा. उत्तम कांदे  यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्ताने ९ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई शहरात सहकार दिंडीचे आयोजन अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :- जागतिक युनो संघटनेने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सहकार विभाग , असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडिट युनियन,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन साईबाबाच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी येथे करण्यात आलेले आहे. या सहकार परिषदेचे उद्घाटन  देशाचे  गृहमंत्री तथा केंद्रीय सहकार मंत्री मा. ना. अमित शहा यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  मा.अजित दादा पवार,  मा.एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट चे अध्यक्ष सुरेश यांना वाबळे, त्याचबरोबर महाराष्ट्र...
इमेज
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर: वसंतनगर येथे संविधान रॅली ! भारतीय संविधानचे आचरण हेच प्रत्येकचे कर्तव्य पाहिजे- प्राचार्या अर्चना चव्हाण परळी - वैः - वसंतनगर येथे  वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी  युथ फॉर भारत ॲन्ड युथ फॉर डिजिटल लिटरसी ही संकल्पना घेऊन  सात दिवशीय निवासी शिबीर  उद्घाटन  माझा भारत माझे संविधान माझे आचरण संविधान रॅली द्वारे प्राचार्या अर्चना चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण पवार , तर प्रमुख पाहुणे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला कॉलेजच्या प्राचार्या विद्या देशमुख  , सरपंच विजय राठोड, उपसरपंच कुंडलीकराव जाधव ,प्रा. डॉ माधव  रोडे,  उपप्राचार्य  प्रा. हरिश मुंडे, प्रा. डॉ. रमेश राठोड, प्रा. भिमानंद गजभारे , प्रा. डॉ. एम. जी. लांडगे अदि.  उपस्थिती होते.  यावेळी भारतीय संविधान आणि आपले कर्तव्य याविषयावर प्राचार्या अर्चना चव्हाण व्याख्यान दिले. त्याप्रसंगी त्या म्हणाल्या भारतीय संविधानने आपल्याला जीवन जगण्याचे  मुलभुत अधिकार दिले....

सहभाग घ्या - पर्यावरण संवर्धनात योगदान द्या

इमेज
पं.दीनदयाल नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई च्या  वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा संकलन अभियान परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      पं. दीनदयाल नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे.नागरिकांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या घरातील ई कचरा आमच्या संकलन केंद्रावर जमा करून पर्यावरण संवर्धनासाठी  आपला अमूल्य सहभाग आपण नोंदवावा ही विनंती.      आपण काय देऊ शकता... बंद पडलेले संगणक,लँपटाँप, सीडी कँसेटस मोबाईल  चार्जर वायर टेप रेकाँर्डर स्पीकर, केबल ओव्हन फुड प्रोसेसर, मिक्सर वाँशिंग मशिन  प्रिंटर स्कॅनर  E-Yantran -ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान  तारीख- २६ जानेवारी २०२५, वेळ- सकाळी १०:०० ते  दुपारी १:००  ई - यंत्रण आपल्या शहरात होत आहे, यात पर्यावरण रक्षणासाठी शहरांमधील नागरिकांना आवाहन आहे की, जास्तीत जास्त संख्येनी ई-कचरा नजीकच्या संकलन केंद्रांवर आणून द्यावा आणि सुयोग्य कचरा व्यवस्थापनाला चालना देत पर्यावरण संवर्धनात आपला वाटा उचलाव...
इमेज
  उस्मानाबाद बँकेच्या परळी वैजनाथ शाखेला 25 वर्षे पुर्ण: वर्धापन दिनानिमित्त स्नेहमिलन उत्साहात  परळी वैजनाथ....उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या परळी वैजनाथ शाखेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने परळी शाखेत पूजा व अल्पोपहार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनेक ग्राहक व हितचिंतकांनी बँकेत भेट देऊन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात नावाजलेल्या उस्मानाबाद जनता सरकारी बँकेच्या परळी शाखेला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवार, दि 25 जानेवारी रोजी बँकेत पूजा व अल्पोपहार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अनेक ग्राहक व हितचिंतकांनी बँकेस भेट देत शुभेच्छा दिल्या. बँकेचे व्यवस्थापक प्रशांत गरड यांनी, परळीच्या बँकिंग क्षेत्रात ग्राहकांना विविध सुविधा देत अल्पावधीतच उस्मानाबाद बँक विश्वासू बँक म्हणून ग्राहकांच्या आवडीची बँक झाली आहे. सर्वच ग्राहक बँक देत असलेल्या सेवेबाबत समाधानी आहेत. यापुढेही बँकेकडून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असे यावेळी बोलताना सांगितले. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने उस्मानाबाद बँकेचे परळी शाखा व्यवस्था...

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ

इमेज
  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक शपथ भारत हा लोकशाही प्रधान देश आहे - व्यंकटेश मुंडे परळी प्रतिनिधी  भारत निवडणूक आयोगाद्वारे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत सामूहिक शपथ घेण्यात आली.  नाथ शिक्षा संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ, व्याख्यान, मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून याची सुरुवात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत सामूहिक शपथ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी बोलताना तहसीलदार वेंकटेश मुंडे म्हणाले की जगाच्या पाठीवरती आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे ही आदर्श लोकशाही पुढे नेण्याचे कार्य येणाऱ्या पिढीला करावयाचे आहे यासाठी आपल्या परिसरातील एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही व 18 वर...

भावपूर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
  व्यंकटराव कुलकर्णी यांचे निधन लातूर दिनांक 24 लातूर येथील सावेवाडी भागातील श्री व्यंकटराव अण्णाराव कुलकर्णी मासुर्डीकर (90) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातू, दोन बहीण, एक भाऊ असा मोठा परिवार आहे.  भूकंपग्रस्त भागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला होता. संपूर्ण औसा तालुक्यात ते तात्या नावाने प्रसिद्ध होते. ब्रेनटेक मल्टी सर्विसेसचे संचालक दत्तात्रय कुलकर्णी यांचे ते वडील होते व बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री शिवाजीराव कुलकर्णी यांचे सासरे होते. तर  अंबाजोगाई  येथिल  सुप्रसिद्ध  टेलर  शाम कुलकर्णी यांचे मामा होते

विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद !!!

इमेज
  मिलिंद माध्यमिक विद्यालयात आनंदनगरीमध्ये ३२ स्टॉल्सवर ४० हजारांच्या वर उलाढाल  विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद दि.२५ जानेवारी २०२५ (प्रतिनिधी): परळी वै. येथील नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी ३२ विविध पदार्थ विक्रीसाठी स्टॉल लावले. शाळेच्या प्रांगणात भरवलेल्या आनंदनगरीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वेगवेगळी दुकाने मांडून व्यावहारिक कौशल्य दाखवले. विद्यार्थ्यांनी एकूण ३२ दुकाने थाटली होती, ज्यात चाळीस हजार रूपयांच्यावर  उलाढाल झाली. या आनंदनगरीत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी मनमुराद आनंद लुटला.  आनंदनगरीतील विविध खाद्य पदार्थांचा सर्वांनी माफक दरात आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवहारिक ज्ञान मिळावे, त्यांना खरेदी- विक्रीचा अनुभव यावा, व्यवहारिक ज्ञान विकसीत व्हावे या अनुषंगाने सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    विद्यार्थी स्टॉल धारकांनी पाणीपुरी, भेळ, खिचडी, भजे, खिर,गुलाब जामुन, कोरडी भेळ, फ्रूट स्टॉल, वडापाव, पॅटीस, चायनीज अन्नपदार्थ, मोमोस, फ्लॉवर वडे, भेळ, मिसळ पाव, पावभाजी,थंड पेये ...
इमेज
मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- मलकापुर येथे भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तरी भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मलकापूर ग्रामस्थ यांनी केले आहे.          परळी तालुक्यातील मलकापुर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कथा परिसता रामायण | पूर्वज उद्धरती | पुर्वजांचे नवल कोण | उद्धरे जाण त्रिजगती ||  भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन मलकापुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.  रामायण ग्रंथातील अध्याय वाचनास सकाळी ५ वा प्रारंभ होऊन, सांगता ४ वा होणार आहे. त्यानिमित्त रात्री ९ ते ११ ह.भ.प.रामायणार्य विजय महाराज वाघ बनकर हिंगोलीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मण शक्ती कार्यक्रमास रामभक्त ह.भ.प.विनायक महाराज गुट्टे गुरूजी अध्यक्ष श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नोट : वाचक, सुचक मंडळीनी १ वाजन्याच्या अगोदर उपस्थितीत रा...
इमेज
धारासुर येथील भागवतकथा ज्ञानयज्ञात कु. स्नेहल रमेशराव मुंडीकचा प्रासादिक गौरव! प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीनेही संतपुजन व नवनिर्वाचितांचा सत्कार गंगाखेड, प्रतिनिधी....      तालुक्यातील धारासुर येथे भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांच्या सुमधुर वाणीतून  श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व  अखंड हरिनाम सप्ताह  सुरू आहे. या सप्ताहात धारासुर येथील मूळ रहिवासी व हल्ली मुक्काम परळी येथील प्रसिद्ध सराफ व्यापारी रमेश मुंडलिक यांची सुकन्या स्नेहल मुंडिक ने अभियांत्रिकी परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचा महाराजांच्या हस्ते प्रासादिक गौरव करण्यात आला.  त्याचबरोबर परळी वैजनाथ येथील प्रेमभक्ती साधना केंद्राच्या वतीनेही भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचे संत पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर व गावचे नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.          धारासुर येथेअंखड हरिनाम सप्ताह  सोहळा  सुरू असुन भागवताचार्य  ह. भ. प. बाळू महाराज उखळीकर  यांच्या  स...
इमेज
  बीडचे भूमिपुत्र: माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन, अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज (25 जानेवारी) निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. ते वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते. साहित्यविश्वातून दुःख व्यक्त ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी चपळगावकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले, "नरेंद्र चपळगावकर हे बलदंड वैचारिक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक होते. त्यांनी मराठी वैचारिक लेखनाला प्रतिष्ठा मिळवून दिली. तसेच महाराष्ट्राला वैचारिक वळ देण्याचं काम केलं." "चपळगावकर यांचं लेखन वैचारिक स्वरुपाचं होतं. त्यांनी अनेक उत्तम पुस्तकं लिहिली. 'गांधी आणि संविधान' या पुस्तकात त्यांनी संविधान कसं गांधी विचाराचं होतं यावर संशोधनपर लेखन केल...
इमेज
संगीतसूर्य केशवराव भोसले कला-क्रीडा आणि सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय समन्वयक पदी डॉ. वैजनाथ राठोड (छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर येथील स्टेपिंग स्टोन इंग्लिश स्कुलचे नृत्य शिक्षक व प्रसिद्ध रंगकर्मी  डॉ. वैजनाथ राठोड यांची मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले कला-क्रीडा आणि सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले कला-क्रीडा आणि सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश पावडे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना कार्यभार सुपूर्द केला आहे. डॉ. वैजनाथ राठोड यांनी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. नृत्य-नाट्य कलाविष्कारात पारंगत असलेले डॉ. वैजनाथ राठोड यांनी अनेक विद्यार्थी घडवून कला क्षेत्रात सक्षमपणे उभे केले आहेत. आजही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य ते करीत आहे. नाटक आणि बंजारा संस्कृतीचा अनुबंध या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. डॉ. वैजनाथ राठोड यांच्या...
इमेज
  विद्यार्थिनींना स्व संरक्षण ही काळाची गरज- प्राचार्य अतुल दुबे परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)       आजच्या काळात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना पाहता विद्यार्थिनींना स्व संरक्षण करणे काळाची गरज निर्माण झाली असल्याचे मत यशवंतराव चव्हाण कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे व्यक्त केले आहे.               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील सेलू (परळी) येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात प्राचार्य अतुल दुबे बोलत होते. या कार्यक्रमात पत्रकार प्रा रविंद्र जोशी, कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ राजश्री कल्याणकर, प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा डॉ विना भांगे, प्रा पी एम फुटके उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य दुबे म्हणाले की, आज संपूर्ण भारतात महिला व युवतीवरील अत्याचारात वाढ झाली आहे. यासाठी विद्यार्थिनींनी स्व संरक्षण करण्यासाठी तयार झाले पाहिजे. तर प्रा जोशी यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीत महिलांना सहजीवन साथी म्हणून ...
इमेज
शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी-अभयकुमार ठक्कर स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने बाळासाहेब ठाकरे चौकात अभिवादन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन परळी (प्रतिनिधी) शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी अशी समाज सेवा केली तरच खर्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी केली असे होईल असे प्रतिपादन श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, परळीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार पप्पू ठक्कर यांनी केले. दरम्यान  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले तसेच भगव्या ध्वजाचे  अनावरण  अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. विश्वहिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त गुरूवार दि. 23 जानेवारी रोजी परळी वैजनाथ येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री ठक्कर बोल...
इमेज
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती राजकिशोर मोदी ,अँड. विष्णुपंत सोळंके व श्री. प्रकाश सोळंकी यांच्याकडून अभिनंदन   परळी वैजनाथ/प्रतिनिधी  बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालकराजकिशोर मोदी कॉटन फेडरेशन माजी उपाध्यक्ष अँड. विष्णुपंत सोळंके आणि अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हा. चेअरमन श्री. प्रकाश सोळंकी यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. या भेटीवेळी अंबेजोगाई विकासा संदर्भात तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर  चर्चा करण्यात आली. मा ना अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाची निवड ही बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची  युवकांचे रोजगानिर्मिती ची संधी असल्याचे राजकिशोर मोदी अँड. विष्णुपंत सोळंके यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस ,, सोयाबीन  चे हमी भावाने खरेदी मधील शेतकऱ्यांचे अडचणी सांगून त्या दुर करणे साठी दादांना विनंती केली शिक्षण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यासंबंधी उपमुख...

दिल्लीत गाजवणार बीड जिल्ह्याचे नाव......!

इमेज
  दामिनीताई  आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे, नाही फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक व अभिनंदन बीड जिल्ह्याची लेक प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर ध्वजावर करणार हवाई पुष्पवृष्टी  मुंबई (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून प्रजासत्ताक दिनाच्या राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावरील मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात बीड जिल्ह्याची लेक, फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर हवाई पुष्पवृष्टी करणार आहे. याबद्दल मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर दामिनी देशमुख यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे, हा सोहळा पाहताना बीड जिल्हा वासीय म्हणून आमच्या सर्वांच्या हृदयात आनंद आणि अभिमान दाटून येईल एवढं नक्की! असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे. तसेच दामिनी ताई आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे, तुझ...

परळीच्या भूमिपुत्राची कंपनी सुपा व अहिल्यानगर येथे उभारणार दोन प्रकल्प

इमेज
  परळी तालुक्यातील भरत गित्ते यांच्या टॉरल इंडिया कंपनीचा दावोस मध्ये महाराष्ट्र शासनाशी करार मंत्री धनंजय मुंडे यांनी पोस्ट शेअर करत भरत गित्ते यांचे समस्त परळीकर यांच्या वतीने केले अभिनंदन आणि कौतुक परळीच्या भूमिपुत्राची कंपनी सुपा व अहिल्यानगर येथे उभारणार दोन प्रकल्प, बाराशे पेक्षा अधिक रोजगार निर्मिती, तर जागतिक स्तरावर निर्यात क्षम उत्पादने करणार तयार मुंबई (प्रतिनिधी) - परळी तालुक्यातील नंदागौळ या छोट्याशा गावात जन्मलेले परळीचे भूमिपुत्र भरत गित्ते यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाऊशे ते सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्र शासनाची दोन प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत सामंजस्य करार केला असून, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत पोस्ट शेअर करत भरत गित्ते व त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.  भरत गित्ते यांच्या टरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुपा व अहिल्यानगर या ठिकाणी अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन निर्माण करून ते जगभरात निर्यात करता येईल अशा पद्धतीचे प्रकल्प उभारण...

औष्णिक विद्युत केंद्र परळी वै : जाहीर सुचना

इमेज
  जाहीर सुचना: औष्णिक विद्युत केंद्र परळी वै. येथील राख बंधाऱ्यातील २०% राखीव राखेची विक्री केंद्रीय पर्यावरण वनखात्याच्या अधिसूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचा मंडळ ठराव दि.12.07.2024 खालील गोष्टीची पूर्तता करणाऱ्या प्रकल्प बाधित व्यक्ति / प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन अधिग्रहण झालेले / वीट-उद्योग / लघु-उद्योग यांना परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राख बंधारा क्रं-2 मधून उपलब्ध असलेल्या 72,646 मे.टन (20%) राखेची उचल व वाहतुक करण्याची परवानगी सवलतीच्या दरात 100 रु प्रती मे.टन देण्यासाठी खालील अटी पूर्ण करणाऱ्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 1. अर्जदार हा प्रकल्प बाधित / प्रकल्पामध्ये ज्यांची जमीन अधिग्रहण झालेला / स्थानिक वीट उत्पादन करणारा असावा, बंधाऱ्यातील राखेचा उपयोग हा सीमेंट/वीट / टाईल्स /ब्लॉक / पाइप्स / फायबर सीमेंट शिट्स / बोर्डस् यासाठी करण्यात यावा आणि संबंधित दस्तावेज (करारनामा/विक्रीखत) कार्यालयात सादर करणे अर्जदारास बंधनकारक राहील. 2. अर्जदाराकडे प्रकल्प बाधित प्रमाणपत्र असावे, नसल्यास जमीन अधिग्रहण केलेले प्रमाणपत्र असावे. जमीन अधिग्रहण प्रमाणपत्र मधील ...
इमेज
  पद्माकर वाघरूळकर यांना तेजस फाऊंडेशनचा आदर्श शिक्षक, साहित्यिक, पत्रकार पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर दि. २३ (प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध साहित्यिक पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) यांना तेजस फाऊंडेशन नाशिकचा आदर्श शिक्षक, आदर्श साहित्यिक व आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.          हा पुरस्कार सोहळा डॉ.मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे अशोक कपूर (सिने अभिनेता व दिग्दर्शक, मुंबई), राजू मोरे (अभिनेता व दिग्दर्शक, मुंबई), विनोद सदानंद खंडारे (सिने अभिनेता, नागपूर), सुरेशभाऊ डोळस (ज्येष्ठ अभिनेता, पुणे) आणि तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री व कवयित्री मेघा डोळस यांच्या उपस्थितीत पार पडला.        पद्माकर वाघरूळकर यांच्या या यशाचे कौतुक श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्था छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस सुप्रसिद्ध नेत्ररोगजतज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे, बिडकीन शाखेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले सर्व साहित्यिक, शिक्षक व पत्रकार मित्रांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचे उद्घाटन

इमेज
  श्रमदान, स्वच्छतेचे महत्त्व राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळते- तहसीलदार व्यंकटेश मुंडे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीराचे सेलू (परळी) येथे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)     राष्ट्रीय सेवा योजनेमुळे समाजशिल वृती यातून जोपासली जाते, श्रमदान, स्वच्छतेचे महत्त्व राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळते असे प्रतिपादन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले. ते लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवती शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोत होते.          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने सेलू (परळी) येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय विशेष युवती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायबतहसीलदार बाबूराव रुपनर, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र (बाळू) फड,प्राचार्या विद्या देशपांडे, पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, उपसर...

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

इमेज
  नेताजींचा त्याग आणि बाळासाहेबांचा विचार तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे"-प्राचार्य अतुल दुबे यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी. परळी (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन, धूप-दीप व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. प्राचार्य अतुल दुबे यांनी या वेळी मार्गदर्शन करताना म्हटले की, "नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्य संग्रामातील त्याग आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा तरुण पिढीला राष्ट्रसेवा आणि आदर्श जीवनासाठी प्रेरणा देते. त्यांच्या कार्यातून आम्ही सर्वांनी शिकण्याची गरज आहे." कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. यु. एन. फड, प्रा. ए. डी. शेख, प्रा. एस. आर. कापसे, प्रा. पी. पी. तिडके मॅडम, प्रा. पी. पी. परळीकर, प्रा. ए. ए. मुंड...
इमेज
इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेत स्कॉलर केजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  तेरा गोल्ड मेडल आणि एक टॉपर मेडल  नॅशनल ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभागी होत स्कॉलर केजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण होऊन तेरा गोल्ड मेडल आणि एक टॉपर मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.  स्कॉलर केजी स्कूल परळी वैजनाथच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आमच्या शाळेने यावर्षी प्रथमच इंटरनॅशनल ओलंपियाड स्पर्धेत विद्यार्थ्यांना बसवले आणि त्यांची तयारी करून घेतली होती.  इंग्रजी गणित हिंदी विज्ञान फोनिक्स या विषयात विद्यार्थ्यांनी 13 गोल्ड मेडल्स एक टॉपर मेडल मिळवत एकूण 14 मेडल्स ची प्राप्ती केली आहे.  सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे कु राजलक्ष्मी परमेश्वर गुट्टे हिने विज्ञान विषयात 9 वा इंटरनॅशनल रँक मिळवला आहे! कुमारी राजलक्ष्मी हिने इंग्लिश, हिंदी, गणित फोनिक्स आणि विज्ञान या वेगवेगळ्या विषयांमध्ये ही स्पर्धा दिली आणि उत्तीर्ण झाली.  कु आराध्या अशोक...

विशेष बातमी / अमोल जोशी

इमेज
 श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती येथे वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी  विशेष बातमी / अमोल जोशी  मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती (लघु आळंदी) येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री श्री परमपूज्य सद्‌गुरु नराशाम महाराज मठ संस्थांनच्यावतीने वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नुकतेच करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षिक संजीवनी समाधीकाल महोत्सवास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सद्गुरु नराशाम महाराज मठात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथे सद्गुरु नराशाम महाराज जागृत मठ संस्थान आहे या मठ संस्थानात प्रतिवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. श्रीक्षेत्र येवती येथील मठात आयोजित सप्ताह भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.मठ संस्थांनच्या वतीने वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  या उत्सवात नियमित कार्यक्रम पुढीलप्रमाणे झाले आहेत.  या सप्ताहात दररोज समाधी रुद्र अ...

धार्मिक पर्वणी....

इमेज
  परळीत प्रथमचश्री संत एकनाथ महाराज दर्शन त्रिदिवशीय प्रवचनमाला व किर्तन सोहळा- भास्करमामा चाटे संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज श्री.ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर करणार विवेचन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज श्री.ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या सुमधूर वाणीतून परळीत प्रथमच श्री संत एकनाथ महाराज दर्शन प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे.त्याचबरोबर किर्तन सोहळा होणार आहे. कलियुगातील भुकैलास परळी वैजनाथ येथे आयोजित या धार्मिक पर्वणीचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भास्करमामा चाटे यांनी केले आहे.           मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालय, परळी-बीड रोड, चेंबरी रेस्ट हाऊसच्या बाजुला, परळी वैजनाथ, जि.बीड येथे मातृ-पितृ स्मृतीप्रित्यर्थ श्री संत एकनाथ महाराज दर्शन त्रिदिवशीय प्रवचनमाला  दि.३१/१/२०२५ ते दि.२/२/२०२५ या कालावधीत  दररोज  दुपारी १ ते ३ या वेळेत होणार आहे.शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे  कथाप्रवक्ते आहेत.कार्यक्रमाची रुपरेषा :द...

प्रशासनाने दखल घ्यावी !!!!

इमेज
  पं.स.समोर तीन दिवसांपासून उपोषण: आंदोलकाची प्रकृती बिघडली; उपजिल्हा रुग्णालयात हलविले परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  १५ वा वित्त आयोग या अंतर्गत जी कामे झाली आहेत. त्या कामाची चौकशी करा गावा अंतर्गत पाणंद रस्ते व खडीकरणाच्या रस्त्याची चौकशी करावी या प्रमुख मागण्यांसाठी पं.स.समोर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे.आंदोलक विजय बडे यांची प्रकृती बिघडली असुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रेवली येथील ग्रामपंचायत सदस्य विजय बडे यांनी विविध मागण्यांबाबत तीन दिवसांपासून उपोषण सुरु केलेले आहे.आज त्यांची प्रकृती बिघडली आहे.  भ्रष्ट व कामचुकार,  सतत अपमान जनक वागणुक देणा-या ग्रामसेवकांना निलंबीत करण्यात यावे, 15 वा वित्त आयोग, 9010, 2545 अंतर्गत सर्व कामांची चौकशी करुन संबंधीत अधिकारी वे ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, गाव अंतर्गत पांदन रस्त व खडीकरण रस्ते यांची चौकशी करुन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावा., गट-ब व गट-क अंतर्गत झालेल्या रेवली पाटी ते. जिल्हा परिषद शाळा पर्यंत झालेल्या डांबरीकरण रस्...
इमेज
  योगेश्वरी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ टेम्पो चालकांने तीन महिलांना उडवले, एक जागीच ठार तर दोन जखमी अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिराच्या पाठीमागील प्रवेशद्वाराजवळ टेम्पो चालकांने तीन महिलांना उडवल्या नंतर एक महिला जागीच ठार तर दोन महिला जखमी झाल्या आहेत. एम एच 28 बीबी 3227 क्रमांकाचा हा टेम्पो बचत गटाच्या कामा निमित्य येथील योगेश्वरी मंदिर परिसरात आला होता. टेम्पो चालक टेम्पो पार्किंग मध्ये नेत असताना त्याला तो कंट्रोल झाला नाही आणि त्याने बाजूला जोगवा मागत बसलेल्या तीन महिलांना चिरडले यात केशरबाई धोंडीराम जोगदंड (रा परळी वेस, अंबाजोगाई) ही महिला जागीच ठार झाली तर अन्य दोघींना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान ही घटना घडतात टेम्पो चालक त्या ठिकाणहुन फरार झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी टेम्पो पोलीस स्टेशन मध्ये नेऊन जमा केला आहे.