
उपजिल्हा रुग्णालय येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन परळी( प्रतिनिधी) परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते श्री.पप्पू गित्ते दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज 15 फेब्रुवारी 1739 -4 जानेवारी 1773) हे भारतीय समाजसुधारक होते. संत सेवालाल महाराज यांच्या जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील गुटी तालुक्यात गोलाल डोडी गावात झाला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ अरुण गुट्टे साहेब सामाजिक कार्यकर्ते श्री .पप्पू गित्ते ,दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड,श्री .नागरगोजे ,गीताजी, श्री राऊत, श्री शिरोळे ,परिसेविका श्रीमती टाकळकर, श्रीमती कुल...