पोस्ट्स

एप्रिल ६, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंकजा मुंडेंच्या निर्देशानंतर प्रशासन खडबडून लागले कामाला

इमेज
परळीतील पुरातन सरस्वती नदीवरील अतिक्रमण घाणीचं साम्राज्य: महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी पंकजा मुंडेंच्या निर्देशानंतर प्रशासन खडबडून लागले कामाला परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील सरस्वती नदीपात्रातील अतिक्रमणे व घाणीचे साम्राज्य पाहून प्रचंड संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले होते.नगर परिषद प्रशासनाने त्यानंतर तातडीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. लगेचच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून तब्बल तीन तास नदीपात्रावर प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली असुन नगर परिषदेकडे याबाबतच्या आवश्यक कागदपत्रांची मागणीही करण्यात आली आहे.        परळी शहरातुन वाहत असलेल्या पवित्र सरस्वती नदीची प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या परभणी उपविभागीय अधिकार्यांनी पाहाणी केली.यावेळी अधिकार्यांनी नगरपालिकेच्या अनेक विभागातील कागदपत्रे मागवत या नदीसंदर्भात आकडेवारी घेत पाहाणी केली.यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असुन सध्या या नदीवर संरक्षण भिं...
इमेज
  भगवान महावीर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी  शहरातुन निघालेल्या शोभायात्रेचे भाविकांनी घेतले दर्शन  परळी (प्रतिनिधी)     शहरातील गणेशपार भागातील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त गुरुवार दि.१० एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.भगवान महावीरांच्या प्रतिमेची रथात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत करत दर्शन घेतले.     भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त गुरुवारी गणेशपार भागातील दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी सात वाजल्यापासुन पारायण,भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी 10 वाजता आकर्षक  रथामध्ये जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची जैन मंदिर येथुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी चढावा घेत महावीर संघई व सौ.मनिषा संघई यांनी घेत शोभायात्रा निघालेल्या भगवान महावीर यांच्या रथामध्ये मान मिळविला. सदरील शोभायात्रा अंबेवेस,नेहरू चौक,राणी लक्ष्मीबाई टॉवर,मोंढा मार्केट,जैन स्थानक,बाजार समिती,मोंढा, राणी लक्ष्मीबाई टॉवर,गणेशपार मार्...

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख>>>>>तृतीय रत्न: शतकानुशतके घुमणारा ज्ञानाचा एल्गार!

इमेज
तृतीय रत्न: शतकानुशतके घुमणारा ज्ञानाचा एल्गार महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे केवळ एक युगपुरुष नव्हते, तर ते एक अत्यंत प्रभावी समाजसुधारक, विचारवंत आणि लेखकही होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील रूढ अंधश्रद्धा, जातीय भेद आणि अन्यायकारक प्रथांवर कठोर प्रहार केले. ‘तृतीय रत्न’ हे त्यांचे 1855 मध्ये प्रकाशित झालेले महत्त्वपूर्ण सामाजिक नाटक याच प्रयत्नांचा ज्वलंत भाग आहे. हे नाटक तत्कालीन सामाजिक वास्तवाचे भेदक चित्रण करते आणि ब्राह्मणी पुरोहितशाहीच्या शोषणावर व समाजाला पोखरणाऱ्या अज्ञानावर कठोर टीका करते. ‘तृतीय रत्न’चा चिकित्सक अभ्यास करणे आजच्या परिस्थितीतही अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या नाटकाने उपस्थित केलेल्या अनेक सामाजिक समस्या आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या समाजात अस्तित्वात आहेत.  ‘तृतीय रत्न’ या नाटकाचा चिकित्सक अभ्यास करून त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि समकालीन महत्त्वाचा शोध घेणे कालसुसंगत आहे. *नाटकाचा सामाजिक-ऐतिहासिक संदर्भ:-* ‘तृतीय रत्न’ ज्या काळात साकारले, तो काळ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासातील एक निर्णायक टप्पा होता. पेशवाई...
इमेज
  किसान पुत्र आंदोलन: ४ मे रोजी एक दिवसिय शिबीराचे आयोजन --------अमर हबीब................   अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-  ४ मे २०२५ हा दिवस राखून ठेवा. त्या दिवशी आपण समजावून घेऊ, नव्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या. कोणते कायदे गळफास आहेत, याची माहिती. शिवाय शेतकरी स्वातंत्र्यासाठी काय करावे लागेल यावर विचारविमार्श. किसानपुत्र आंदोलनाचे एक दिवसाचे शिबीर ४मे रोजी आंबाजोगाईच्या पत्रकार कक्ष (नगर पालिका कार्यालय परिसर) येथे होणार आहे. त्यासाठीची नाव नोंदणी सुरू केली आहे. फक्त ५० शिबिरार्थी भाग घेऊ शकतात. २० जणांनी नावे नोंदवली आहेत. या पुढे फक्त ३० नावे घेतली जातील. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे उशीर करू नका.  शिबीर सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल व सायंकाळी पाच वाजता संपेल. सकाळी व संध्याकाळी चहा दिला जाईल. दुपारी साध्या जेवणाची व्यवस्था केली आहे. शिबिरात पूर्णवेळ सहभाग घेतलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.अमर हबीब 8411909909 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी.पूर्ण नाव- गाव, तालुका, जिल्हा-मोबाईल नंबर-शिबिरात सहभागी होण्याचे कारण-एवढी माहिती पाठवली की न...

गुरुचरित्र सारामृत पारायण व कथामृत सोहळ्याची सांगता !

इमेज
  परळी वैजनाथ ही आदिगुरूंची भूमी: येथील साधनेची अनुभूतीच वेगळी ! प्रत्येक जीव 'दत्त स्वरूप' माना;जीवनाचे कल्याण होणारच- परभणी दत्तधाम पिठाधिपती प.पू.मकरंद महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       सृष्टीतील  प्रत्येक जीव भगवत स्वरूप असतो. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत 'हर कंकर- शंकर' अशी संकल्पना असुन प्रत्येक जीवमात्र हे दत्त स्वरूप माना असे आवाहन करत परळी वैजनाथ ही आदी गुरूंची भूमी आहे. या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामींनी अनुष्ठान केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या साधनेची एक वेगळीच अनुभूती प्रत्येक साधकाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन दत्तधाम परभणीचे पिठाधीपती प.पू. मकरंद महाराज यांनी परळी वैजनाथ येथे केले.        वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री संतदास गणू रचित गुरुचरित्र सारामृत पारायण व गुरुचरित्र कथामृत सोहळ्याचा आज अतिशय उत्साहात व मंत्रून  टाकणाऱ्या वातावरणात समारोप झाला.भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार मांणल्या जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्...
इमेज
माजी सैनिकाच्या विविध प्रश्नाबाबत महत्वपूर्ण बैठक पडली पार       गेवराई  :-(प्रतिनिधी)  आज दिनांक 10 /4/25  गुरुवार रोजी माजी सैनिक यांच्या विविध प्रश्नाबाबत नगरपरिषद गेवराई वाचनालयात जवळील ज्येष्ठ नागरिक कार्यालयात बैठक संपन्न झाली.                                      यामध्ये गेवराई येथील माजी सैनिकाचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्याला गती देण्यासाठी बैठक आयोजित केली होती.            या बैठकीसाठी सतीश कोटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष तथा श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष अनिल बोर्डे यांना व गेवराई ग्राहक पंचायतचे विश्वास चपळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत सर्वप्रथम किसन भारती साहेब यांच्या पत्नी व छत्रभुज सानप यांच्या सुनबाई यांचे अकस्मित निधन झाल्यामुळे दोन मिनिटाचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.      ...
इमेज
जालना:अकोल्यात आगीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ! पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश ; आगीच्या घटनेची माहिती जाणून घेत व्यक्त केल्या संवेदना जालना ।दिनांक १०। अकोला  (ता. बदनापूर) गावातील मठवाडी परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य पिकांचे तसेच जखमी पशूंचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत पालकमंत्र्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे.    अकोला गावातील गट क्रमांक ४१ मधील मठवाडी परिसरात आज दुपारी पोलवरील विजेच्या  तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या धान्याचे तसेच चारा, गाडी बैल, पशू खाद्य, मोटर पाईपलाईन याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेली काही जनावरे देखील आगीत होरपळली.  आग लागल्याचे कळताच  तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आ...
इमेज
 डॉ. अशोक नारनवरे: एका विद्यार्थ्याच्या हृदयातून उमटलेले कृतज्ञतेचे स्वर आदरणीय डॉ. अशोक नारनवरे सर, मी तुमचा विद्यार्थी याचा मला सार्थ अभिमान आहे.विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा हाडाचा शिक्षक कसा असू शकतो हे मी तुमच्या रूपात अनुभवलेले आहे.आपल्यासाठी   पुस्तक म्हणजे जीव की प्राण ! पुस्तकावर अगाध  प्रेम करणारा अवलिया.! साहित्यांचे गाढे अभ्यासक म्हणून तुमची एक स्वतंत्र ओळख आहे.डोळसपणा बरोबरच सर्वस्तरातून निर्माण होणाऱ्या अवस्थेची जाणीव साहित्यात यायला हवी ,असा आपला नेहमी आग्रह असतो. आपल्या माणसाच्या  भावनेचा व अस्तित्वाचा सखोलतेने , संवेदनशीलतेने विचार करणारे तुमचे व्यक्तिमत्व ख-या अर्थाने मराठी साहित्य व समाजाची बांधिलकी अभिव्यक्त करते. सर ,तुम्ही आमच्यासाठी महान आहात. आपण माझ्या सारख्या गरीब, निराधार ,विद्यार्थ्याला नवी दिशा दिलीत आणि त्याला माणूस बनवलत; म्हणून तर आमचा जीवनप्रवास सुखकर झाला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पदवी शिक्षण घेताना मला आपला सहवास लाभला, पुढे तर आवडता विद्यार्थी म्हणून विशेष प्रेम व आपुलकी मला मिळाली, पुस्तक वाचनाची आवड निर्म...
इमेज
  महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सह पतसंस्थेस मार्च २०२५ अखेरपर्यंत  रुपये तीन लक्ष एवढा निव्वळ नफा अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :-  अंबाजोगाई पंचक्रोशीतील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या उदात्त हेतूने केवळ महिलांनी महिलांसाठी  नऊ वर्षा पूर्वी सुरू करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेला ३१  मार्च २०२५ अखेरपर्यंत रुपये ३ लक्ष एवढा नफा झाल्याची माहिती  पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ . सुनीता राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.  .आपला भारत देश हा पुरुष प्रधान  देश आहे . या देशात  महिलांना जरी दुय्यम स्थान देण्यात आले असले तरीही आजची महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करणाऱ्याचा  प्रयत्न करत आहेत. त्यामुळे  नेहमी घर, चूल आणि मूल यामध्येच गुरफटून पडलेल्या  महिलांना काही प्रमाणात आर्थिक स्वायत्तता मिळवून देण्यासाठी व महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्याचा फायदा कुटुंबाला व्हावा याच पवित्र हेतूने केवळ महिलांसाठीच राजकिश...
इमेज
  रामनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीची कार्यकारणी जाहिर अध्यक्ष भास्कर सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण परळी/प्रतिनिधी  रामनगर लिबोनी बौद्ध विहार येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती उत्सव समितीची बैठक  राम नगर येथील जेष्ठ नागरीक आयु. सुभाष कांबळे, माणिक वाघमारे दिलीप जगताप मच्छिंद्र ठेंगे मारोती बदणे बालाजी ढगे रवि ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी मोठया उत्साहात  पार पडली.  यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची नविन कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्ष भास्करभाऊ सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण, कोषाध्यक्ष सचिन ठेंगे, सचिव विशाल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत वाघमारे गोविंद सरवदे लालासाहेब वाघमारे  कुंडलीक कांबळे बिभीषन फड सुग्रीव फड लक्ष्मण कांबळे राजभाऊ बावणे बालाजी बावणे कृष्णा बावणे आनंत लटपटे गौतम जगताप अंकुश नाईकवाडे मनोज कांबळे नवनाथ आचार्य गोविंद  आचार्य निरंजन लटपटे वैजनाथ वाघमारे सुभाष लहाने तर सदस्यपदी रोहीत वाघमारे संतोष ठे...
इमेज
  उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावरील वाहनांमुळे रुग्णवाहिकेस अडथळा -अश्विन मोगरकर  परळी वैजनाथ...     उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या कार, ऑटोरिक्षा मुळे रुग्णाला घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेलाच आत जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने गंभीर रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. बेजबाबदार वाहनचालक व गायब असलेले वाहतूक पोलीस यासाठी जबाबदार ठरवण्यात यावेत व त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची कायम गर्दी असते.  जवळच स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस असल्याने या परिसरात कायम गर्दी असते. बँकेत, पोस्टात जाणारे अनेक ग्राहक रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन लावत असतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी झाली आहे. बुधवार दि 9 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास एक रुग्णवाहिका रुग्णास घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आलेली असताना रुग्णालयात जाण्याच्या वाटेत एक कार व ऑटोरिक्षा उभी असल्याने रुग्णवाहिकेस दवाखान्यात लवकर जाता आले नाही. उपस्थित नागरिकांनी रिक्षा...

आज समारोप

इमेज
  गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ: परळी वैजनाथ ही स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची साधनास्थळी- प.पू.मकरंद महाराज  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रयाचे दुसरे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. परळी वैजनाथ क्षेत्रात त्यांनी काही काळ वास्तव्य केले. आंबा आरोग्य भवानीच्या सानिध्यात त्यांनी साधना केली. त्याचबरोबर दैवी लीलाही केल्या. याचे वर्णन गुरुचरित्र ग्रंथात आले आहे. यामुळे या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी सांगितले.        वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसापासून परळी येथे दासगणू महाराज रचित गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या सोहळ्यात सायंकाळच्या सत्रात परभणीच्या दत्तधाम चे पिठाधिपती प. पू. मकरंद महाराज यांचे गुरुचरित्रावरील कथामृत भाविक श्रोत्यांना ऐकायला मिळत आहे. गुरुचरित्राच्या विविध पैलूंवर अतिशय भावपूर्ण विवेचन प.पू. महाराजांच्या मुखारविंदातून  हे कथामृत श्रोत्यांना मिळ...
इमेज
नवसाला पावणाऱ्या बेनसुरच्या बेणाई देवीची गुरूवारी यात्रा  यात्रा विशेष /अमोल जोशी पाटोदा बिंदुसरा नदीचे उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील बेनाबाई ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून सुपरिचित आहे नव्हे तर बेनसुर गावचे नाव व मंदिराच्या मागील बाजूस उगम पावून बीड शहराचा  पाणीप्रश्न सोडविणाऱ्या नदीची बिंदुसरा म्हणून ओळख झालेल्या बेनाबाई देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदा आज  गुरुवार तारीख १० एप्रिल रोजी म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशी रोजी भरत आहे  माहूरच्या रणुकामातेचा अवतार म्हणून बेनाबाई देवीची ओळख आहे बेना नावाच्या रक्षासाचा वध केल्याने देवीचे हे नाव पडल्याची अख्यायिका आहे या देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात या यात्रे निमित्ताने चैत्र शुद्ध त्रयोदशी दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रम असतात यामध्ये देवीच्या परड्या , दर्शन,भंडारा व रात्री पालखीची मिरवणूक असे कार्यक्रम असतात या यात्रेप्रमाणेच नवरात्रात ही नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम असतात व श्रावणात पालखी असे भरपूर कार्यक्रम असतात नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असल्याने देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाव...
इमेज
  खाजगी रूग्णालयासारखी दर्जेदार सरकारी रूग्णालये बनविण्याची जबाबदारी कोणाची आहे..? सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांचा सवाल अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- सध्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरण खूप गाजत आहे. यामध्ये दोष कुणाचा, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, इथून ही चर्चा वाढत वाढत जाऊन सर्वसामान्य स्तरावर खाजगी रूग्णालये कशी पेशंटची अडवणूक करतात, त्यांना नको त्या तपासण्या करायला लावतात, अव्वाच्या सव्वा फीस आकारतात, डॉक्टर्स हे राक्षस झालेले आहेत. इथपर्यंत पोहचलेली आहे. येणारे काही दिवस ही चर्चा, मीडिया ट्रायल सगळं घडवून आणलं जाईल. लोकांमध्ये डॉक्टर्सविरूद्धच वातावरण तापविण्यात येईल आणि काही दिवसांनी हा विषय संपून राजकारण्यांना सोयीचा असलेला, राजकीय फायदा मिळू शकत असलेला दुसरा विषय पुढे आणण्यात येईल. या प्रकरणाच पुढे काय झालं, पीडितांना न्याय मिळाला का नाही ? याचा मागोवा सुद्धा घेण्याची तसदी काही काळानंतर आता बेंबीच्या देठापासून ओरडणारे घेणार नाहीत.  या विषयावर लिहायचं कारण असं की, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्वातंत्र्या...

मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल !

इमेज
पशूसंवर्धन विभागाचे काम अधिक गतीमान करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल पशुधन विकास अधिकाऱ्यांची 2795 पदे भरणार मुंबई, दि. 8 – पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.  ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृती बंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण 4684 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यःस्थितीत 1886 पदे भरलेली असून 2798 पदे रिक्त आहेत. तसेच 31 डिसेंबर 2025 अखेर 8 पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्...
इमेज
दोघा सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून आवदाच्या पवन चक्कीचे १३ लाख रु चे साहित्याची चोरी केज :- पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून पवन चक्कीचे सुमारे १३ लाख रु. किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा येथे आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीचे पवनचक्की उभारणीचे काम सुर आहे.  दि. ८ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे २:३० वा. च्या सुमारास पवन चक्की उभारणीच्या कामावर काम करीत असलेले सुरक्षा रक्षक तेथे झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांना त्यांच्या चादर फाडून त्याने हातपाय बांधले आणि पवन चक्कीचे केबल व इत्तर साहित्य चोरून नेले आहे.  या प्रकरणी सुरक्षारक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांनी साहित्य चोरीची माहिती आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या नुसार अधिकाऱ्यांच्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इमेज
गुरुसेवेचा भाव सदैव स्थिर असला पाहिजे, त्यात अस्थिरता आली तर साधकाची साधना फळाला येत नाही- प.पू. मकरंद महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        गुरुतत्त्वाचा बोध घ्यायचा असेल तर सेवावृत्ती धारण करावी लागते. जोपर्यंत गुरुचरणी 'सेवेलागी सेवक झालो' या न्यायाने आपण लीन होत नाही तोपर्यंत गुरुकृपा प्राप्त होत नाही. गुरुप्रती असलेला सेवाभाव स्थिर असला पाहिजे. तो भाव अस्थिर झाला तर साधकाला प्राप्त होणारी साधनेची फलश्रुती मिळत नाही असे प्रतिपादन  दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी केले.      बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळा होत आहे.त्याचबरोबर दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांच्या रसाळ वाणीतून सायंकाळ सत्रामध्ये गुरुचरित्र कथामृतही ऐकायला मिळत आहे. आज दुसऱ्या दिवशीच्या कथामृत सोहळ्यात गुरु महिमा विशद करताना प.पू. मकरंद महाराज यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून गुरुचरित्र साराचे विवेचन केले. ग...
इमेज
यादवकालीन सकलेश्वर (बाराखांबी) महादेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश अंबाजोगाई : येथील १२व्या शतकातील यादवकालीन सकलेश्वर (बाराखांबी) महादेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.            आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मंदिराच्या ९,७३७चौ. मी. परिसरातील १९२ चौ. मी. भाग संरक्षित म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिराचे जतन व संवर्धन होणार असून, पर्यटनालाही चालना मिळणार आहे. मंदिराच्या ऐतिहासिक आणि यदृष्ट्या महत्त्वामुळे स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे..

वैद्यनाथ मंदिर येथे अजुन तीन दिवस धार्मिक पर्वणी.....

इमेज
परळीत श्रीगुरुचरित्र सारामृत पारायणाला उत्साहात प्रारंभ: मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग 'गुरुचरित्र' हे चरित्र आणि धर्माधिष्ठित चारित्र्य घडवते -प.पू. मकरंद महाराज दत्तधाम परभणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ व गुरुतत्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगुरुचरित्र सारामृत पारायण व श्रीगुरुचरित्र कथामृत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यास आज (दि.७) रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या पारायणास मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.गुरुचरित्र हे चरित्र आणि धर्माधिष्ठित चारित्र्य घडवते  असे प्रतिपादन प.पू. मकरंद महाराज दत्तधाम परभणी यांनी केले.       परळी वैजनाथ जवळील डोंगरतुकाई हे जाज्वल्य ठिकाण आहे.या मंदिरात गुहेत साधारणत: चार ते पाच पायऱ्या उतरून गेल्यावर खाली तळघर लागते. तळघर साधारणत: पाच फूट लांबी रुंदीचे आहे. याच गुहेत श्री.दत्तात्रय अवतार प.पू.श्री. श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (गाणगापूर)  हे याच गुहेत एक वर्ष वास्तव्यास राहिले होते. या अनुषंगानेच परळी वैजनाथ पवित्र नगरीमध्ये श्री...
इमेज
सरस्वती नदी अतिक्रमण:मंत्री पंकजा मुंडे यांनी कान उघडणी केल्यानंतर नगरपरिषदने २५ जणांना बजावल्या नोटीसा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळी शहरातील पुरातन नदी असलेल्या सरस्वती नदीवर अनाधिकृत प्रचंड अतिक्रमणे झालेले असून या नदीपात्रात भराव टाकून व अनाधिकृत खोदकाम करून या नदीवरच चढाई करण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब पंकजा मुंडे यांनी गांभीर्याने घेत न.प. प्रशासनाची कानउघडण केली होती. त्याच प्रमाणे स्वतः या घटनास्थळी जाऊन प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता न.प. प्रशासन खडबडून जागे झाले असून 25 जणांना नगरपरिषदेने नोटीसा बजावल्या आहेत.  नदीतील अतिक्रमणे स्वतःहून न काढल्यास नप प्रशासन करणार कायदेशीर कारवाई असल्याची मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी माहिती दिली.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील सरस्वती नदीत होत असलेल्या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत त्याची पाहणी केली होती.परळीच्या जुन्या गावातून वाहत असलेल्या सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्याच्या होत असलेल्या कामाबद्दल मंत्री मुंडे यांनी पालिका प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर आता प...
इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन परळी / प्रतिनिधी  महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी परळीत एक वही एक पेन या अभिनव अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक पत्रकार विकास वाघमारे व विकास रोडे यांनी दिली आहे . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . आणि ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालना मिळावी या हेतूने एक वही एक पेन हा उपक्रम १४ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी ९ ते १ या वेळेत राबविण्यात येणार आहे. अवांतर खर्च न करता या समाजोपयोगी अभियानात सहभागी होऊन सकाळी ९ ते १ या वेळेत आपण वही पेन आणून द्याव्यात जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना एक वही एक पेन घेऊन यावे असे आवाहन पत्रकार विकास वाघमारे यांनी केले आहे या वेळी या अभियानाचे संस्थापक विकास रोडे ही उपस्थि...

दोन सत्रात होणार शिबीर

इमेज
शेतकरी विरोधी कायदे समजावून घेण्यासाठी किसानपुत्रांचे ४ मे रोजी अंबाजोगाईत शिबीर ▪️ फक्त ५० शिबीरार्थींचीच व्यवस्था  अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-- शेतकरी आत्महत्यासाठी कारणीभूत ठरणारे शेतकरी विरोधी कायदे नेमके कोणते आहेत आणि शेतकरी स्वातंत्र्याची न्यायालयीन लढाई नेमकी कशी सुरु आहे हे समजावून घेण्यासाठी अंबाजोगाई येथे ४ में रोजी एक किसानपुत्राचे दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात फक्त ५० शिबीरार्थींना प्रवेश देण्यात येणार असून या शिबीरात सहभागी होण्यासाठी किसानपुत्रांनी अगाऊ नांव नोंदणी करावी, असे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार आणि अनिकेत डिघोळकर यांनी केले आहे.  राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे यासाठी किसानपुत्र आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शेतकरी विरोधातील जाचक कायदे रद्द केल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असा दावा किसानपुत्र आंदोलन मागील काही वर्षांपासून सातत्याने करते आहे. हे शेतकरी विरोधी कायदे नेमके कोणते आहेत व ते रद्द करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली न्यायालयीन...