
रा.स्व.संघाला १०० वर्षे पूर्ण:विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप परळी वैजनाथ, प्रतिनिधी... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने परळीत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परळी परिसरात असलेल्या श्री .नागनाथ निवासी विद्यालय येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सर्वश्री रवींद्र वेताळ महाराज, चेतन अयाचित,आशिष काबरा आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.शाळेचे शिक्षकवर्ग,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.