आज समारोप

 गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ: परळी वैजनाथ ही स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची साधनास्थळी- प.पू.मकरंद महाराज

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रयाचे दुसरे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. परळी वैजनाथ क्षेत्रात त्यांनी काही काळ वास्तव्य केले. आंबा आरोग्य भवानीच्या सानिध्यात त्यांनी साधना केली. त्याचबरोबर दैवी लीलाही केल्या. याचे वर्णन गुरुचरित्र ग्रंथात आले आहे. यामुळे या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी सांगितले.

       वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसापासून परळी येथे दासगणू महाराज रचित गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या सोहळ्यात सायंकाळच्या सत्रात परभणीच्या दत्तधाम चे पिठाधिपती प. पू. मकरंद महाराज यांचे गुरुचरित्रावरील कथामृत भाविक श्रोत्यांना ऐकायला मिळत आहे. गुरुचरित्राच्या विविध पैलूंवर अतिशय भावपूर्ण विवेचन प.पू. महाराजांच्या मुखारविंदातून  हे कथामृत श्रोत्यांना मिळत आहे. आजच्या तिसऱ्या दिवशीच्या कथेत महाराजांनी परम पूज्य स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हे साधारणतःइ.स. १४२०: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ येथे वास्तव्य असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आंबा आरोग्य भवानीच्या सानिध्यात त्यांनी केलेल्या साधनेच्या आणि दैवी लीलांचे वर्णन त्यांनी केले. त्यानंतर गुरु शिष्य संवादातून विविध अध्यात्मिक प्रश्नांवर सविस्तर विवेचन केले. या कथामृत सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 आज समारोप 

       दरम्यान गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या पारायण व कथामृत सोहळ्याचा आज समारोप होणार असून समारोप प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार