पिंपळपान गळालं तर म्हणे पिंपळगाव जळालं !

बीड:गृह राज्यमंत्र्यांच्या कथित मोबाईल चोरीचे मिडियाने रेटून चालवलेले प्रकरण: पोलीस अधीक्षकांनी काय केला खुलासा ? परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील घटना, घडामोडी व त्या संदर्भातील चालणाऱ्या बातम्या यामुळे विविध वृत्तवाहिन्यांनी पत्रकारितेचे अनेक वेळा संकेतही मोडल्याचेही समोर आले. कधी कधी काही घटनांमध्ये अतिशयोक्ती तर कधी केवळ ऐकीव माहितीवर आधारित अतिरंजीतपणाने वृत्तांकन, त्याचे वारंवार, पुनर्वार्तांकन, पुनरावृत्ती अशा पद्धतीने बातम्या प्रसारित करण्यात येत आहेत. एक प्रकारे बीड जिल्ह्यातील काडी इकडची तिकडं झालेली घटनासुद्धा प्रचंड व्याप्तीची कशी आहे हेच बिंबवण्याचा प्रयत्न झाल्याचे अनेक वेळा दिसले. घटनांचे गांभीर्यपूर्वक वृत्तांकन ,बातमीचा विश्वासक स्त्रोत, या बाबी अनेकदा मिसिंग दिसतात. उथळपणा, केवळ कॅची मथळे आणि कोणत्याही बातमीला अतिरंजित स्वरुपात प्रदर्शित करुन केवळ बातमी चालते तर चालवा अन् व्हिव्ज मिळवा हेच प्राधान्य यातून दिसते. असाच काहीसा प्रकार गृहराज्यमंत्र्य...