नवसाला पावणाऱ्या बेनसुरच्या बेणाई देवीची गुरूवारी यात्रा 



यात्रा विशेष /अमोल जोशी पाटोदा

बिंदुसरा नदीचे उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील बेनाबाई ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून सुपरिचित आहे नव्हे तर बेनसुर गावचे नाव व मंदिराच्या मागील बाजूस उगम पावून बीड शहराचा  पाणीप्रश्न सोडविणाऱ्या नदीची बिंदुसरा म्हणून ओळख झालेल्या बेनाबाई देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदा आज  गुरुवार तारीख १० एप्रिल रोजी म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशी रोजी भरत आहे 

माहूरच्या रणुकामातेचा अवतार म्हणून बेनाबाई देवीची ओळख आहे बेना नावाच्या रक्षासाचा वध केल्याने देवीचे हे नाव पडल्याची अख्यायिका आहे या देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात या यात्रे निमित्ताने चैत्र शुद्ध त्रयोदशी दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रम असतात यामध्ये देवीच्या परड्या , दर्शन,भंडारा व रात्री पालखीची मिरवणूक असे कार्यक्रम असतात या यात्रेप्रमाणेच नवरात्रात ही नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम असतात व श्रावणात पालखी असे भरपूर कार्यक्रम असतात नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असल्याने देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येत असतात .

"बीड शहराला पाणी पुरवठा करणारी बिंदुसरा नदीचा उगम  पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील बेनाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस होतो. या बेनसुर गावचे नामकरण व बेनसुरा नदीचे नाव हे या बेनाबाई देवीच्या नावावरून पडले आहे.म्हणजेच बिंदूसरा ( बेनसुरा) नदीचा उगम हा बेनसुर येथे होतो मात्र गूगल मॅप वर शोध घेतला असता या नदीचा उगम वघिरा गावा जवळ दाखविला जातो ही चुकीची माहिती या गूगल मॅप द्वारे दिली जाते या मध्ये प्रशासनाने बदल करण्याची गरज आहे."

पोपटराव राऊत , ज्येष्ठ पत्रकार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार