पोस्ट्स

मार्च २, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
शाळेत अभिनव पद्धतीने महिला दिन: नाटिका,चित्रांचे प्रदर्शन,मनोगते;मुलींनीच केले कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन      कर्तृत्ववान महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान सांगणारी हिंदी भाषेतील नाटिका, विद्यार्थिनींनी महिलांचे महत्त्व सांगणारे रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांचे मनोगते आणि मुलींनी केलेले कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन हे वैशिष्ट्य होते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी साजरा झालेल्या महिला दिनाचे!  विद्यार्थ्यांना संधी दिल्यामुळे त्यांच्या विविध गुणांचा विकास होतो हे लक्षात घेऊन शिक्षक आणि सतत मार्गदर्शकाचीच भूमिका बजावली पाहिजे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट या ठिकाणी शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्रिया काळे आणि श्रीमती शुभांगी चट, पूजा गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी महिला दिन उत्साहात साजरा केला.  सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील शिक्षिका तसेच अंगणवाडीतील शिक्षिका राहीबाई सिरसाट यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड, सहशिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श...
इमेज
  विशाल मुंडे या तरुणाचा  विजेचा शॉक लागून मृत्यू  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील इंद्रपवाडी येथील विशाल परमेश्वर मुंडे (२४) या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. दि. ०६ मार्च रोजी ही घटना घडली आहे.           परळी तालुक्यातील येथील इंद्रपवाडी येथील चेअरमन रामभाऊ सिताराम मुंडे यांचे नातू विशाल परमेश्वर मुंडे (२४) यांचा टेबल फॅन ला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. विशाल अतिशय चांगला मुलगा व मनमिळाऊ स्वभावाचा होता. आणि त्याच्या पश्चात आजोबा चुलते  आई-वडील बहीण अनेक भावंड असा भरगच्च परिवारावर आहे.या परिवारावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.    राख सावडण्याचा विधी      विशाल परमेश्वर मुंडे यांचा राख सावडण्याचा विधी रविवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी सात वाजता परळी तालुक्यातील इंदपवाडी येथे होणार असल्याचे मुंडे कुटुंबियांकडून कळवण्यात आले आहे. मुंडे परिवाराच्या दुःखात दैनिक..... परिवार सहभागी आहे.
इमेज
  महिला पालकांनी आपल्या पाल्याच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी अगोदर स्वतःमध्ये बदल करून घ्यावेत !  परळी वैजनाथ....... महिला पालकांनी आपल्या पाल्याच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी अगोदर स्वतःमध्ये बदल करून घ्यावेत असा महत्त्वपूर्ण संदेश डॉ दैवशाला घुगे मॅडम यांनी स्कॉलर केजी स्कूलमध्ये आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या महिला पालकांना दिला.  स्कॉलर केजी स्कूलमध्ये प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर डॉ दैवशाला घुगे व डॉ कल्पना गित्ते यांच्यासह सौ शोभा फुटके उपस्थित होत्या.  सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपपज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी केले. डॉ दैवशाला घुगे पुढे बोलताना म्हणाल्या की, सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी महिलांची जबाबदारी मोठी असते. फुटके परिवाराने आपले लेकींवर उत्तम संस्कार केलेले आहेत आणि आता त्या विविध ठिकाणी पदे भूष...

काव्यशलाका: जागतिक महिला दिन विशेष

इमेज
  जागतिक महिला दिन विशेष               -----    स्त्रीत्व  -----   जबाबदार गृहिणी  शूरवीर रणरागिणी  संघर्षमय कहाणी  तया नाव स्त्रीत्व !                 समर्पण भावना                कष्टाची साधना                प्रेमाची आराधना                 तया नाव स्त्रीत्व ! सहनशीलतेचा महामेरू वात्सल्याचा आगरु कुटुंबासी आधारु तया नाव स्त्रीत्व !                तरल संवेदना                कोमल भावना                स्वाभिमानी बाणा               तया नाव स्त्रीत्व! अहोरात्र राबणं  दुसऱ्यांसाठी जगणं चंदनासम झिजणं  तया नाव स्त्रीत्व!               अश्रू लपवणं     ...

अमोल जोशी / विशेष बातमी.......

इमेज
रचला नवा इतिहास: भारत सरकारतर्फे पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड अमोल जोशी / विशेष बातमी. हिंगोली जिल्ह्यातील तरुण संशोधक, उत्कृष्ट वक्ता आणि धोरण सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्यमित्र जोशीची भारत सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो. हिंगोलीच्या इतिहासात प्रथमच पुष्यमित्र जोशीच्या रूपात राष्ट्रीय पुरस्कार जिल्ह्यातील नागरिकाला प्राप्त होत आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण हिंगोलीत अभिमानाचे वातावरण आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार देशातील युवकांसाठी सर्वोच्च सन्मान मानल्या जातो. देशात १५ ते २९ वर्ष वयोगटात विज्ञान, समाजसेवा, नवोपक्रम, नेतृत्व, संशोधन आणि धोरण आदी क्षेत्रांमध्ये असाधारण कार्य करणाऱ्या युवा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुष्यमित्र जोशीचे विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक प्रशासनातील मोलाचे योगदान लक्षात घेऊन त्याची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव...
इमेज
आता परळीत रस्त्यावर, उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्यांची गय नाही ! नोटीसा बजावल्या आहेत; यापुढे कडक कायदेशीर कारवाई करणार-  न.प. मुख्याधिकाऱ्यांचा गंभीर इशारा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळीतील रस्त्या- रस्त्यांवर उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावर व उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असुन यापुढे उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नगरपरिषद मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी दिला आहे.         गेल्या सहा दिवसापासून परळी शहरातील तीन गोरक्षकांनी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. हे आमरण उपोषण करताना सहा वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे मुख्य रस्त्यांवर उघड्यावरच मांस विक्री केली जाते. यावर निर्बंध असावेत अशा प्रकारची प्रमुख मागणीही करण्यात आली होती. या अनुषंगाने आज या उपोषणकर्त्यांना लेखी आश्...
इमेज
पुरुषांची नकारात्मक मानसिकता बदलणे गरजेचे - वसिमा शेख अमोल जोशी / पाटोदा - आज प्रत्येक क्षेत्र महिलांनी पादाक्रांत करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अधिकाधिक महिला आर्थिकदृष्टया सक्षम होत आहेत तरीही एक गृहिणी असो किंवा उच्चपदस्थ अधिकारी असो, महिलेच्या मनाचा अनादर केला जातो. घरात व घराबाहेरही महिलेच्या इच्छा आकांक्षांना डावलले जाते. तिच्या निर्णयांना पारिवारिक निर्णय प्रक्रियेत महत्व दिले जात नाही. स्त्रिला  भावनिक आधार देऊन तिच्या प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य केल्यास तिचा आत्मविश्वास वाढतो. पुरुषप्रधान संस्कृतीत जोवर पुरुषाची साथ महिलेला मिळत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, म्हणून स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी पुरुषांची महिलांबद्दल असलेली पराकोटीची नकारात्मक मानसिकता आधी बदलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पाटोद्याच्या उपविभागीय दंडाधिकारी वसिमा शेख मॅडम यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. महाविद्...
इमेज
सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरताच प्रशासन खडबडून जागे: अवैध कत्तलखाना लगेचच होणार सील! पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीनंतर गोरक्षकांचे आमरण उपोषण स्थगित  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         गेल्या सहा दिवसापासून परळी नगर परिषदेसमोर तीन गोरक्षकांनी गोहत्या बंदी करावी, परळीतील अवैध कत्तलखाना बंद करावा यासह अन्य सहा मागणीसाठी अमर उपोषण सुरू केले होते. प्रशासन या उपोषणाकडे उदासीनतेने बघत असतानाच आज सकाळी परळी शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रचंड संख्येने मूक मोर्चा काढत या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रशासनाला खडबडून जाग आल्याचे बघायला मिळाले. त्याचप्रमाणे राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रशासनाला कडक निर्देश देत उपोषणकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. उपोषणकर्त्यांशी संवाद साधत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतर हे उपोषण आता स्थगित करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासन तातडीने अवैध कत्तलखाना आजचे आजच सील करणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.       परळी शहरातील कत्तलखाने ...
इमेज
  अल्पवयीन मुलाचे अपहरण ! केज :- एका मजूर महिलेच्या १२ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना पिसेगाव ता. केज येथे गुरुवारी दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास घडली आहे.      अकोला जिह्यातील शिवनी येथील कविता राहुल जाधव ही मजूर महिला ही तिची एक मुलगी व दोन मुलांसह पिसेगाव येथे महादेव सूर्यवंशी यांच्या शेतात वास्तव्यास असून तिचे पती गावी आहेत. ही महिला इसाक अब्बास शेख या ठेकेदाराने घेतलेल्या बांधकामावर मजुरीचे काम करते. गुरुवारी कुंबेफळ येथे मिस्त्रीच्या हाताखाली काम करण्यासाठी गेली होती. ती रात्री ७.३० वाजता ती परत घरी आली असता सायंकाळी ६ वा. पासून तिचा सम्यक नावाचा १२ वर्षाचा मुलगा दिसून आला नाही. तिने आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र त्याचा शोध न लागल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने मुलाचे अपहरण केल्याची तक्रार कविता जाधव यांनी दिल्या वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहाय्यक पोलस निरिक्षक सुरेश बनसोडे हे तपास करीत आहे. दरम्यान, सदर मुलाचा रंग सावळा असून अंगामध्ये चॉकलेटी रंगाचा टि- शर्ट व का...

स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासन करतेय.....!

इमेज
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ना.पंकजा मुंडे यांनी सभागृहात मांडल्या मनातील भावना स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासन करतेय ● मुलींना कर्करोगापासून वाचविण्यासाठी शासनाने लस देण्याचे प्रयोजन करावे ● राजकारणात महिलांचा टक्का वाढायला हवा मुंबई, दि. ७ : शासनाच्या योजना ह्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी असायला हव्यात. स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासनाने केले असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताईद मुंडे यांनी केले.    महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात आयोजित विशेष चर्चेत सहभाग घेताना मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महिला शक्ती विषयी गौरवोद्गार काढून स्त्रीच्या महानतेची, तिच्या सहनशीलतेची गाथाच आपल्या भाषणातून व्यक्त केली. मुली, महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगविषयी चिंता व्यक्त करून श्रीमती मुंडे म्हणाल्या की, मुलींना कर्करोगापासून वाचविण्यासाठी त्यांना शासनामार्फत लस देण्याचे प्रयोजन केले तर त्यांना कर्करोगाच्या धोक्यापासून वाचवू शकू.  महिलांनी स्वतः कमवायला पाहिजे, यासाठी त्यांना शिक्षण गरजेचे आहे. शासनाच्या योजना सशक्त मातांसाठी आहे, तथ...

पुस्तक परिक्षण: प्रा.डाॅ.सिद्धार्थ तायडे

इमेज
"सलतो उरात काटा: अंतर्वेदनांचा कल्लोळ" 'सलतो उरात काटा'हा गझलसंग्रह म्हणजे गझलकार दिवाकर जोशी यांच्या अंतर्वेदनांचा कल्लोळच! एक सुंदर आणि अर्थपूर्ण रचनाकृती असलेल्या या गझल संग्रहातील ८६ गझलेत कवीने मानवी जीवनातील वेदना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे प्रभावी चित्रण केले आहे. कवी दिवाकर जोशी यांच्या गझलेचा मुख्य विषय मानवी जीवनातील दुःख, वेदना,प्रेम ,मानवी मूल्यांची पडझड,आणि एकाकीपणा आहे. कवीने आपल्या भावनांना अत्यंत प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलपणे व्यक्त केले आहे. गझलेतील प्रत्येक शेर मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन घडवतो. गझलेची भाषा साधी, सोपी आणि सहज आहे. कवीने समर्पक उपमा, उत्प्रेक्षा आणि प्रतिमांचा वापर करून गझलेला अधिक आकर्षक बनवले आहे. गझलेतील शब्दरचना आणि गेयता श्रोत्यांना-वाचकांना मंत्रमुग्ध करतात. गझलेतील प्रत्येक शेर एक वेगळा भाव आणि विचार व्यक्त करतो.गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र आणि अर्थपूर्ण आहे.गझलेत भावनांची तीव्रता आणि खोली जाणवते.गझलेतील आशय आणि विचार वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात.  "काढले खरडून त्यांनी सत्व माझे सोडले नाही तर...

गरजवंतानी शिवसेने कडे वधू वरांची नोंदणी करावी

इमेज
  शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन: व्यंकटेश शिंदे  गरजवंतानी शिवसेने कडे वधू वरांची नोंदणी करावी परळी (प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थान चे आराध्या दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त प्रती वर्षी प्रमाणे या ही वर्षी शिवसेनेच्या  वतीने हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले आहे. गरजवंतानी शिवसेने कडे वधू वरांची नोंदनी करावी असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केले आहे.       परळी तालुका शिवसेनेच्या वतीने  शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात करण्यात येतो. परळी तालुक्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, ऊसतोड मजूर अशा गरजवंत कुटुंबातील मुलींचे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचे पवित्र कार्य शिवसेनेच्या वतीने करण्यात येते. आज पर्यंत या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्य...
इमेज
उद्या दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवणार: गोरक्षण सेवा संघाच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व्यापारीही होणार सहभागी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळी वैजनाथ यांच्यावतीने गेल्या पाच दिवसापासून कत्तलखाना बंद करा, गोहत्या बंद करा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. उद्या दि. ८ रोजी परळी शहरात सकल हिंदू समाज एकत्रित होऊन सामुहिकरित्या या उपोषणाला पाठिंबा देणार आहे. या अनुषंगाने परळीतील बाजारपेठ दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवून व्यापारीही उस्फूर्तपणाने पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.           गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळी वैजनाथ सकल व  हिंदूसमाज परळी वैजनाथ यांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.गौ हत्या बंद झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह अन्य सहा मागण्या करिता परळी नगरपरिषद समोर चालू असलेल्या गोरक्षक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल हिंदू समाज परळी तालुका यांच्या वतीने...

शालेय विद्यार्थिनीचा विशेष लेख >>>>>

इमेज
  नाव मोठे लक्षण खोटे!       तुमचं नाव मोठं आहे का ? माझं तर नाहीये. माझं नाव फक्त पाच अक्षरांचे 'कोमल' म्हणजे इंग्लिश मध्ये फक्त five letters! माझ्या मैत्रिणींचे नावे खूप मोठी आहेत जसं की ,चैतन्या ,वैष्णवी त्यांच्या इंग्लिश मध्ये मोठ्या स्पेलिंग्स आहेत ,म्हणजे त्यांचं नाव मोठं आहे. असं असतं का?           असं नसतं! नाव मोठं म्हणजे साऱ्या गावात, साऱ्या जगात, त्यांची ओळख आहे, त्यांचा आदर्श आहे, त्यांना सर्व ओळखतात त्याचे नाव मोठे! आता आपल्याला माहिती नाहीये; पण बिझनेसच्या संदर्भात जे अभ्यास करत असतात त्यांना माहिती आहे की बिझनेस मध्ये कोण जगात बेस्ट आहे, कोण नाही.... म्हणजे, मुळात जो व्यक्ती यशस्वी झालाय आणि आता त्याला सर्व ओळखतात म्हणजे जगात तो बेस्ट आहे तसे त्या व्यक्तीचे नाव मोठे आहे. त्या व्यक्तीने खूप नाव कमावले आहे.  आत्ता मला सांगा तुमचं नाव मोठे आहे का? आजच्या काळात सर्वांना पॉप्युलर व्हायचे आहे.... सर्वांना लोकप्रिय व्हायचे आहे, म्हणजेच सर्वांना नाव कमवायचे... पण असं का हो?  केवळ नाव कमावण्यासाठी मोठे होऊ नका. आपल्या इच्छा पू...
इमेज
धसांच्या 'खोक्याने' जाहीर कार्यक्रमात दिली होती विद्यार्थ्यांना हात - पाय मोडून टाकण्याची धमकी.. प्राचार्य, शिक्षक देखील होते उपस्थित  बीड,  : शिरूर येथील सतीश भोसले यांचे नवनवे कारनामे समोर येत असून यादरम्यान आता एका व्हिडिओ मध्ये तो विद्यार्थ्यांना हात पाय मोडण्याची धमकी देत असल्याचे दिसते. तसेच आधीच माझ्यावर खूप सार्‍या केसेस आहेत आणखी काही केसेस झाल्याने काही फरक पडत नाही असे देखील म्हणत असल्याचे दिसतो. हा व्हिडिओ शिरूर येथीलच कालिकादेवी विद्यालयातील असल्याचे समोर आले असून यामध्ये प्राचार्य व शिक्षक उपस्थित असल्याचे दिसते.. प्राचार्य व शिक्षकांनी अशा व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कसे काय बोलावले असेल असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. शिरूर तालुक्यातील सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ढाकणे पिता पुत्राला देखील अमानुष मारण करत जखमी केले होते. या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून सतीश भोसले यांचे स्वतः पोलिसांची दोन पथके रवाना झाले आहेत. यादरम्यानच आता सतीश भोसले चा एक नवा व्हिडिओ समोर आ...
इमेज
  वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९८% निकाल  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून घेण्यात आलेल्या वार्षिक बेसिक बी.एस.सी. नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे, यामध्ये वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, विद्यानगर परळी वै. चा ९८% निकाल लागला.       याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत मुंढे सरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले.  श्री. शेख सर, सौ. गुणप्रिया मॅडम, श्री. राम होळंबे सर, व शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेछा दिल्या.
इमेज
  बनावट फेरफार रद्द करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या दालनात महिलेचा अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न ! केज :- नवऱ्या पासून विभक्त राहत असलेल्या महिलेला तिच्या माहेरच्या कडून मिळालेली जमीन तिच्या पतीने परस्पर बनावट दान-पत्रा आधारे दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावाने केली. तो बनावट फेर रद्द करावा. या मागणीसाठी एक परित्यक्ता महिला अनेक वर्षा पासून तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे खेटे घालीत आहे. आज त्या प्रकरणी सूनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणी संपल्या नंतर संतप्त आणि त्रस्त महिलेने नायब तहसीलदार यांच्या दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला रोखले. या बाबतची माहिती अशी की १९९० मध्ये दीपा देशमुख यांचा विवाह वरपगाव ता. केज येथील येथील रविंद्र श्रीहरी भोसले यांच्या सोबत झाला होता. विवाहा नंतर त्यांना कोमल नावाची मुलगी झाली. तसेच दिपा भानासुर देशमुख यांची आई रुक्मीण देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मुलगी दिपा देशमुख हिच्या नावाने केली होती. परंतु काही दिवसा नंतर रवींद्र भोसल...

नेमकं काय आहे प्रकरण?

इमेज
  आ.धस ज्याला म्हणतात, तुला ९९ टक्के नाही तर १०० टक्के माझा आशिर्वाद आहे.... राज्यात गाजत असलेला सुरेश धसांचा निकटवर्तीय 'खोक्या' नेमका आहे कोण?      बीडमधील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले ने त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस  यांचा निकटवर्तीय आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसले यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो नोटांचे बंडलं गाडीच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसत आहे. आता सतीश भोसलेचा तिसरा व्हिडिओ व्हायरल होत असून तो थेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सतीश भोसले कोण आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.                एकीकडे संतोष देश...
इमेज
परळी तालुका शिवसेनेवर कौतुकाची थाप आढावा बैठकीत -परशुराम जाधव  शिवसेनेच्या ध्येयानुसार 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण परळी तालुका शिवसैनिकांनी केले  प्रा. सुनील धांडे  परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांनी येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप देऊन परळी तालुक्यातील संघर्ष काळामध्ये येथील शिवसेना संघटना जोपासण्याचे कार्य कौतुकास पात्र आहे असे उद्गार काढले. तसेच पुढे शिवसेना बीड जिल्हा लोकसभा प्रमुख प्रा. सुनील धांडे सर यांनी परळी तालुक्यातील शिवसेनेने शिवसेनेच्या ध्येयाप्रमाणे 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करण्याचे काम केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनाप्रमुख आदित्यजी  ठाकरे यांच्या आदेशानुसार  शिवसेना संपर्क नेते सुनील जी प्रभू मराठवाडा समन्वयक विश्वनाथ शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ...

सोन्नर कुटुंबातील तीन यशस्वितांचाही आई वडिलांसह गौरव

इमेज
  पतीच्या निधनाचे दु:ख पचवून शासकीय सेवेत मिळविले स्थान:वडखेल येथील वैशालीच्या जिद्दीचा सन्मान  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :         शिक्षण सुरू असतानाच तिचं लग्न झालं. लग्नानंतर वर्षभराच्या दुर्दैवाने पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर समोर काळाकुट्ट अंधार दिसत होता. परंतू तिच्या आई-वडिलांनी तिला धीर दिला. तिनेही पुन्हा नव्या आयुष्याची आखणी केली. पुन्हा अभ्यासाला लागली आणि शासकीय सेवेत वरिष्ठ लिपिक म्हणून स्थान मिळविले. ही कहाणी आहे वडखेल येथील वैशाली पद्मिनी मधुकर देवकते या तरुणीची. तिच्या या यशाबद्दल वडखेल ग्रामस्थांनी तिच्या जिद्दीचा सन्मान करण्यासाठी जाहीर सत्कार केला. याच वेळी सोन्नर कुटुंबातील अधिकारी झालेल्या तीन भावंडांचाही सत्कार करण्यात आला.         वडखेल येथील पद्मिनी आणि मधुकर देवकते यांची वैशाली ही मुलगी. तिचे शिक्षण सुरू असतानाच तिचा विवाह नात्यातील एका युवकाशी करून देण्यात आला. परंतू लग्नानंतर काही महिन्यातच त्याचे निधन झाले. तिने न डगमगता पुन्हा अभ्यास सुरू केली. हे करीत असताना तिला आणि तिच्या आई-वडिलांनी खूप टोमणे सहन...
इमेज
शेतकऱ्यांवरील संकट गडद:आत्महत्यांचे प्रमाण वाढले; १९ मार्चला होणार अन्नत्याग अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून दहा ते पंधरा टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जेवढ्या पन्नास ते साठ टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून होते. याचा अर्थ असा की, केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील संकट अधिक वाढले आहे. म्हणून या वर्षी किसानपुत्रांनी १९ मार्चला अन्नत्याग करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केले आहे. प्रतिकुटुंबाला अठरा हजार द्या ज्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न येऊ लागले, त्या कुटुंबातील आत्महत्या टळल्या आहेत असे दिसून येते. राहिलेल्या दहा ते पंथरा टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न कसे येईल याचा तातडीने विचार केला पाहिजे. सरकारी वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासाठी अठरा हजार रुपये महिना ठरवले आहे, तसे अठरा हजार रुपये महिन्याला या कुटुंबांना पोचविण्याची तरतूद सरकारने करावी. यासाठी इतर अनुदान बंद करावी लागली तर ती बंद करावी, अशी सूचना अमर हबीब य...
इमेज
  जालन्याच्या 'त्या' तरूणांवरील अत्याचाराची पालकमंत्री ना. पंकजा मुंडे घेतली गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांशी केली चर्चा ; आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश अत्याचारित तरूणांच्या प्रकृतीची केली आस्थेने चौकशी ; कुटुंबियांनी घेतली मुंबईत भेट जालना ।दिनांक ०५। अन्वा (ता. भोकरदन) येथील कैलास बोराडे या तरूणांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आज दूरध्वनीवरून संपर्क साधून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, त्या तरूणाच्या कुटुंबियांनी ना. पंकजाताईंची मुंबईत भेट घेतली.           महाशिवरात्रीच्या दिवशी अन्वा येथील रहिवासी असलेल्या कैलास बोराडे या तरुणास कार्ला जानेफळ येथील वटेश्वर मंदिरात भागवत दौंड व नवनाथ दौंड यांनी मारहाण करून भट्टीत गरम केलेल्या सळईने सर्व अंगावर डाग देऊन अतिशय अमानुषपणे अत्याचार केले. बोराडे याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज पोलिस अधिक्षकांशी फोन करुन घटन...
इमेज
  आपापली जबाबदारी ओळखून सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता टिकवा - मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)... समाजात एकिकडे सर्वत्र वणवा पेटून सर्व काही बेचिराख होत असताना दुसरीकडे एक माणूस म्हणून माझी काय भूमिका असली पाहिजे हे कळले तरच समाज एकत्रीत राहील अन्यथा सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता भंग होईल असे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. येथील देशमुख कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक राम पडळकर, उद्योजक गणेश देशमुख, सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उद्धव शिंदे, आधार माणुसकी संस्थेचे ऍड.संतोष पवार, सरपंच शितल देशमुख, डॉ.प्रिया मुळे, प्राचार्य संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ.राजेश इंगोले यांनी गुणवंत हा केवळ ज्ञानाने किंवा उच्चशिक्षीत होऊन किंवा मोठ-मोठ्या पदव्या, नोकऱ्या घेऊन होत नाही. तर या सोबत त्याच्या व्यक्तिमत्वाला संस्कार आणि मानवी मूल्यांची जोड असावी लागते. शिक्षण आणि संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्...
इमेज
परळीत उद्या कॅन्डल मार्च ! परळी (प्रतिनिधी).....         मस्साजोगचे सरपंच कै संतोष देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ सूर्यवंशी यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परळी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.            परळी वैद्यनाथ येथे बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता जिजामाता उद्यान येथील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॅण्डल मार्चला सुरुवात होईल पुढे राणी लक्ष्मी टावर, मोंढा मार्केट, स्टेशन रोड मार्गे , बस स्टॅन्ड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग असेल त्यानंतर कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचल्यानंतर त्याठिकाणी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येईल.     या कॅन्डल मार्च व सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी परळी शहरातील व तालुक्यातील सर्व महिला, पुरुष, तरुण लहान थोर मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आ...

'या' सर्व गोष्टींवर असणार बंदी...

इमेज
बीड जिल्ह्यात १७ मार्चपर्यंत मनाई हुकूम जारी बीड:  अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे.  'या' सर्व गोष्टींवर असणार बंदी     महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३) अन्वये काढणाऱ्या आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलन, धरणे आंदोलन यासारख्या ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाहीत. काठ्या लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत.  कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे फोडायची किंवा फेकायची उपकरणे साधे गोळा करून ठेवता येणार नाहीत, ते बाळगता किंवा तयारही करता येणार नाहीत.  आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबानात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक कि...
इमेज
श्रीनिधी देशमुख हिचे एसओएफ आणि आयओएफ ओलिंपियाड परीक्षत घवघवीत यश परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)      येथील पोद्दार लर्न स्कुल मधील पहिलीची विद्यार्थिनी श्रीनिधी प्रसाद देशमुख हिने SOF आणि आणि IOF ओलिंपियाड या कॉम्पिटेटिव स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत पाच सुवर्ण, एक रौप्य  आणि एका कांस्य पदकासह एकुण सात पदकांची कमाई केली.            त्याच बरोबर इंग्रजी आणि ई.व्ही.एस. या विषयांमध्ये तीने शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या क्षमता, प्रतिभा, अभिरुची आणि बुद्धिमत्तेची चाचणी घेतली जाते. श्रीनिधी ही कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.