
अमृताश्रमस्वामी महाराज यांना श्रीसंत नरहरिनाथ महाराज जीवनगौरव पुरस्कार जाहीर बीड, प्रतिनिधी.... अमृताश्रम स्वामी महाराज जोशी यांना श्रीसंत नरहरीनाथ महाराज जीवन गौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. नवगण राजुरी बीडचे भूमिपुत्र, वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार, धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांना संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या नाथ परंपरेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा श्रीसंत नरहरिनाथमहाराज जीवनगौरव पुरस्कार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या वर्षी शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराजांच्या पुण्यभूमी श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये वैदिक व वारकरी संप्रदायातील विद्वज्जन विभूतींच्या मंगल उपस्थितीत दि २१ मार्च २०२५ रोजी सायं. ५:०० वा. श्री,प,पू मोहननाथ महाराज पैठणकर यांच्या हस्ते संत अमळनेरकर महाराज मठ श्रीक्षेत्र पैठण तेथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे.श्री जोशी महाराज यांना यापूर्वी समता रत्न पुरस्कार,बापू पुरस्कार,एकता पुरस्कार,वारकरी भूषण पुरस्कार,तथा महाराष्ट्र शासना चा कीर्तन प्रबोधन इत्यादी असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झ...