
परळीत विजेचा अखंडित खोळंबा: खासदारांच्या कार्यक्रमातही वीज गुल; नागरिकांतील संतापाच्या भावनांची दखल घ्या - ॲड. जीवन देशमुख परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीतील महावितरणाचा ठरलेला नेहमीचा सिरस्ता सुरुच आहे. शहरात रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे खासदार स्वतः परळीत असतांना भर कार्यक्रमात ही वीज खंडित झाली. एवढा गलथानपणा सुरु असुन याची संबंधितांनी दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी दिला आहे. वीजवितरण कंपनीने मात्र नेहमीप्रमाणेच आपला गलथान कारभार सुरूच ठेवलेला आहे.भर उन्हाळा सुरु झाला तसा विजेचा लपंडावही सुरू झाला आहे. असंख्य वेळा नागरिकांनी आमच्या भागातील वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा, विविध ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर कराव्यात, वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी वारंवार मागणी केली पण याची दखल वीजवितरण कंपनीने घेतलेली नाही.याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण कंपन...