
शाहु, फुले, आंबेडकर, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा शाहू फुले आंबेडकर १६५ अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना VJNT शाळासहिंता लागू करून नियमित वेतनश्रेणी प्रमाणे १०० टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवणे बाबत. 21 मार्च शुक्रवार रोजी शाहू फुले आंबेडकर,अनु.जाती आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री यांना जिल्हाधिकारी सोलापूर समाज कल्याण सोलापूर यांच्यामार्फत संघटनेकडून निवेदन देण्यात आले. शाहु, फुले, आंबेडकर १६५ आश्रमशाळा योजनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे सरांनी १८ वर्षापासून वेतन नसल्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. नागरगोजे सरांना श्रद्धांजली. मृत शिक्षकांच्या कुटुंबाला रू.१०,००,०००/-(दहा लाख रूपये) ची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.शासनाकडून या शाळांना न्याय मिळावा अशी भावना ययेथे व्यक्त करत आहे गेल्या अनेक वर्षापासून शाहू फुले आंबेडकर १६५ निवासी आश्रमशाळा गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात.अनेक वर्ष...